Submitted by devendra gadekar on 27 June, 2012 - 04:30
मी दिलेला तुला तो, नजराणा चुकला होता ?
की देताना दिलेला, बहाणा चुकला होता ?
आई अन बाबा तुझे तसे ज्ञानी होते की,
भेटलो जिथे तुला, तो ठिकाणा चुकला होता?
दोष ना दिला तुला मी, जरी तू फसविले मला,
लोक बोलले मज तूच शहाणा चुकला होता .
माझे नशीब बलवत्तर जखमी झालो नाही
की आज तुझा जरासा निशाणा चुकला होता ?
सांग मला तू प्रेम कमी झाले होते तेंव्हा,
की जन्मलो जिथे तोच घराणा चुकला होता ?.
देवेंद्र गाडेकर
गझल शिकतोय त्यामुळे चुका भरपूर असतील ..
मार्गदर्शन करावे चुकावर हि विनंती
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम. खयाल सुंदर आहेत..
अप्रतिम. खयाल सुंदर आहेत.. बाकी दुरुस्त्या सुचवायला एक्सपर्ट लोक येतीलच.
बाकी दुरुस्त्या सुचवायला
बाकी दुरुस्त्या सुचवायला एक्सपर्ट लोक येतीलच
>>>
गझलकार कुजकट कमला सोनटक्के (ते कु. कुमारी असल्यास कोणत्या पक्षाची तेही लिहावेत)
या रचनेत दुरुस्ती करणे म्हणजे फियाटची जुनी टायर्स आणि मोडके इंजिन प्रिमिअर वाल्यांना देऊन त्यांच्या वर्कशॉपमधून पूर्ण गाडी नवीन करून घेण्यासारखे आहे.
कवी देवेन्द्र गाडेकर,
आपल्याला अनेकोत्तम शुभेच्छा. भटसाहेबांची बाराखडी व एल्गार, तसेच प्रदीप निफाडकरांचे गझलदीप हे पुस्तक वाचल्यावर आपल्या रचना अधिक तंत्रशुद्ध होतील. बाकी या व्यासपीठावर गझल अचूक करण्यासाठी मदतीचा हात अनेक जण देतातच
शुभेच्छा
कळावे
गंभीर समीक्षक
छान गझल्.............मस्त
छान गझल्.............मस्त आवडली..........
दोष ना दिला तुला मी, जरी तू फसविले मला,
लोक बोलले मज तूच शहाणा चुकला होता .
माझे नशीब बलवत्तर जखमी झालो नाही
की आज तुझा जरासा निशाणा चुकला होता ?
हे विशेष आवडले..........
(No subject)
गंभीर समीक्षक साहेब .. आपल्या
गंभीर समीक्षक साहेब ..
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ...
या क्षेत्रात खूप लहान आहे ..लहान म्हणण्या पेक्षा अजून जन्मालाच आलो नाही ...
हं पण गझल मनाला खूप भावली ... त्यामुळे शिकायची फार इछा झाली ..
वृत्त शिकता येतात .. पण गझलीयत रक्तात हवी हे खर ..
आणि गझलीयत शिवाय गझल नाही ...
गझलीयत च्या तर कोसो दूर आहे मी ..
पण तरीही पहले वृत्त शिकावे बारकावे शिकावे आणि नंतर मग लिहायचा अजून प्रयत्न करेलच ...
तोपर्यंत अश्या चुका होतील चुकीने .. कुठे शब्दांची ओढतान वगेरे वगेरे ...
बाकी योगुली आणि कु. कमला सोनटक्के आपलेही आभार चोन्फिदन्चे वाढवल्या बद्दल
नेमक काय चुकतंय ते कळले तर
नेमक काय चुकतंय ते कळले तर मात्र मला खूप मदत होईल शिकायला