पागोळी

Submitted by अज्ञात on 6 June, 2012 - 00:39

घन; वेस ओलांडून
आला सोनियाचा सण
धुळवड आकाशात
ऊर घागर भरून
झरे रेशमाचं पोत
सारे दारूण झाकून
रोमरोम शहारून
गाई अंकुरात धून

थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
सरे चातकाचे ऋण
मोर माना उंचावून
भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन

.........................अज्ञात

गुलमोहर: 

सुरेख.

पोचलेली दिसत्ये त्याच्यापर्यंत...
कसा धावत आला बघा Happy आवडलीच !

वाह!!
प्रत्येक ओळीओळीतून ओथंबलाय पाऊस!!

धुळवड आकाशात
ऊर घागर भरून
झरे रेशमाचं पोत>>>

थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून>>>
खासच!! Happy

खूप आवडली.

फार फार... सुंदर, अज्ञात.
थेंब थेंब फुटे वाळा..... आहा..

भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन....
मनातल्या जलतरंगात... नुस्तं बसून रहावसं वाटतय...