स्वतंत्र देशात जन्मही झाला
प्रत्येक 'दिनी' झेंडाही खिश्याला
कधी हारे-तुरे केली, कधी नारे - 'खा' रे केली
अर्ध्या सुट्टीसाठी भाषणाला टाळीही दिली
पण जरा कुठे देशभक्तीची अंगावर संधी असली ..........तर मी करंगळी दाखवतो...!!!!!...(थोडा बिझी रे...)
सवलत-कायद्यात शाळा
होतकरू फायद्यात गाळा
आयकर ढापून ''माळा''
अस्सल सज्जनतेचा चाळा
पण जरा कुठे फुकटची कौतुक अंगठी दिसली........... तर मी अनामिका दाखवतो..!!!.....(आभार..आभार...)
कधी भासतो बोंबलणारा भ्रष्टाचार
कधी त्रासतो माजलेला हाहाकार
कधी हासतो दैवातला अत्याचार
कधी दिसतो नसत्याचा प्रचार
पण जरा कुठे स्वार्थ-स्वत्वाची आकडेमोड चुकली......तर मी मधलं बोट दाखवतो..!!! ....(...@#$%^& ...)
कोणी प्रहार करावं म्हणतो
ज्वलंत शब्दाची पुकार बनतो
सर्व लाचारांना उठवतो
चांगल्या विचारांनी पेटवतो
पण जर कुठे ''मेणबत्ती'' विश्वासाने दारावर आली.......तर मी तर्जनी दाखवतो.....!!! ......(पुढे जा ना त्या घरी....तो जाणारेय....!!!!! )
मग संप होतात....बंद होतो..
नकळत अन्यायाचा गंध होतो
कोणी पळत..काहीतरी जळत...
आपलंच नुकसान..नंतर कळत..
पण जरा कुठे सर्व पूर्ववत सकाळ-दुपार झाली..........तर मी अंगठा दाखवतो...!!!........(जिंकलो रे..( खरच.?..))
.
.
पण मी काय करणार?..
माझी सर्व बोटे सारखीच...!!!
.
.
तुम्ही आपली बघा जरा....
फरक आहे?..
.
( आयला...तुमची पण...!!!!!!!!!!)
तनवीर सिद्दिकी
( आयला...खरचकी, आमची
( आयला...खरचकी, आमची पण...!!!!!!!!!!)
सुंदर वर्णन सामांन्यांचे.
आवडली.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
वा आवडली मला खयालही आवडले आणि
वा
आवडली मला
खयालही आवडले आणि मांडणीही
छान
छान
(No subject)
विभाग्रजजी, रीयाजी , किरणजी,
विभाग्रजजी, रीयाजी , किरणजी, भरत मयेकरजी सर्वांचे फार फार आभार..
छान आवडली
छान आवडली
झ कास !
झ कास !
मस्त कविता मुक्तछन्द कसा
मस्त कविता
मुक्तछन्द कसा असावा याचे टिपिकल आदर्शवत उदाहरण
मस्त ......
अभिनन्दन
पु ले शु
वेगळेपणाने मांडलेय .......
वेगळेपणाने मांडलेय ....... आवडली.
कल्पना आवडली.
कल्पना आवडली.
तनवीर मियां तुमच्या काही
तनवीर मियां
तुमच्या काही कविता थोपु वर वाचल्या होत्या. तुम्ही सुंदर लिहीता. या कवितेत तुमचा टच अजिबात जाणवला नाही... दुस-या कुणी लिहीली असती तर नक्कीच छान म्हटलं असतं, पण तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
सर्वांचे फार फार आभार. किरण
सर्वांचे फार फार आभार. किरण साहेब, प्रामाणिक मताबद्दल फार आभार. लवकरच नव्या कवितेसोबत परत येतो. यावेळी तुमचा अपेक्षाभंग होवू देणार नाही..
तनवीर.
आवडली !
आवडली !
मस्त !
मस्त !