साद देती हिमशिखरे : भाग-४, धर्मशाला.

Submitted by शोभा१ on 22 June, 2012 - 03:50

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336
http://www.maayboli.com/node/34708
दिनांक, २६.१०.११, आज दिवाळी. लक्ष्मीपूजन. उत्साही वातावरणात आवरणे चालू होते. तरीपण मनात एक रुख रुख होती. ती म्हणजे, ‘या दिवाळीला आपण आपल्या घरी नाही. आपल्या माणसांपासून खूप खूप दूर आहोत आपण’. अशा विचारात असतानाच सौ. ‘आकुमै’ यांचे सळसळते आगमन झाले. आणि वातावरण सुगंधीत झाले. (थांबा. गैरसमज करून घेऊ नका.:डोमा:) दिवाळी पहाट सुगंधीत व्हावी, म्हणून आपण अत्तर लावतो. यानी तर ‘परफ्यूमच’ फवारल. Proud आणि सगळ्याना एक एक अळिवाचा लाडू खायला लावला. एकमेकाना शुभेच्छा देऊन, पटापट आवरायला सुरुवात केली. तरी घरची आठवण मनातून जात नव्हती. आकाशकंदील, फ़टाके, फ़राळ, सर्व डोळ्यासमोर येत होते. आवरून, नाश्ता करून बाहेर आलो. आज आमचा मुक्काम धर्मशाला इथे होणार होता. नेहमीप्रमाणे ‘चक्रधर बेपत्ता’ होते. . मग बागेत एक चक्कर मारली. आणि ही विविध रंगाची फुले कॅमेरयात बंद करून तुमच्यासाठी आणली.:फिदी:
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

आमचे सारथी आले, आणि प्रवासाला सुरूवात झाली. पण मनाली सोडताना फ़ार वाईट वाटले. ही सुंदर विविध रंगी फ़ुले, हे बर्फ़ाच्छादित डोंगर, हिरवीगार वृक्षराजी पुन्हा कधी पहायला मिळेल की नाही? म्हणून गाडीतून जाताना एक शब्दही न बोलता हे सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवून घेण्याच प्रयत्न केला.
वाटेत काढलेले हे काही फोटो.
११. .
१२.

१३.

रानात एकटे पडलेले फूल.
१४.

१५.

प्रथम शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आणि दिवाळीची सुरुवात देवदर्शनाने केली.
अपुरया वेळामुळे नंतर मनिकरणला न जाता ‘वसिष्ट कुंड’ येथे गेलो. इथे गरम पाण्याची कुंड आहेत. या गंधकाच्या पाण्यामुळे, त्वचेचे आजार नाहीसे होतात.(अशीच गरम पाण्याची कुंड, राजापूर जवळ उन्हाळे या गावी आहेत.) तिथे पुरूषांसाठी, व स्त्रियांसाठी आंघोळीची वेगवेगळी सोय केलेली आहे. कुंडालाच नळ बसवून, अंघोळीची सोय कुंडाच्या खालच्या बाजूला केलेली आहे. पण तिथलं दृष्य पाहून, फक्त पाय धूऊन परत आलो. (अनेक स्त्रिया त्या कुंडाजवळच अंघोळ करत होत्या.)तर काही स्त्रिया नळावर कपडे धूत होत्या.

नंतर बैजनाथला पोहोचलो. हे एक प्राचीन शिवमंदीर आहे. इथे माकडे मनसोक्त भटकत होती. त्यांची पिल्ले बघून तर त्यांच्याशी खेळण्याची इच्छा होत होती. पण ती आवरली. Proud (मी पिल्लांशी खेळताना, त्यांच्या ‘आया’ (आनंदयात्री नाही :फिदी:) आल्या असत्या, तर त्यांनी माझंच खेळणं केल असत. मला खेळण्यातला ’ख’ ही उच्चारता आला नसता. आणि हे सगळं लिहिताच आलं नसत. :डोमा:) मंदिरात प्रवेश करणार तर, हे महाशय दिसले. ते टेहळणी बुरूजावर बसून कामात (टेहळणीच्या) दंग असतानाच फोटो काढला.
१६.

आत एक छोट देऊळ होत. एक माकड वर चढून त्या देवळात गेलं. तिथला प्रसाद खाल्ला आणि निघून गेल. (एखाद्या लहान मुलाने, त्याच्यासाठी वाटीत ठेवलेला खाऊ जितक्या शांतपणे खावा, अगदी तितक्या सहजपणे ते प्रसाद खाऊन गेलं.)
मंदिराच्या पटांगणातून आत नजर गेली आणि कोणीतरी ओळखीच जाणवल. म्हणून पुन्हा पाहिलं तर, आमच्या सोसायटीतील जाधवांच्या, तीन पिढ्या हास्यवदनाने आमच्यासमोर उभ्या होत्या. काय आनंद झाला म्हणून सांगू. एखाद्या अपरिचीत ठिकाणी, आपल्या ओळखीच माणूस भेटल्यावर काय वाटत, ते शब्दात सांगण अवघड आहे. (अनुभवच घ्यावा. :डोमा:) इथे तर सहा माणसं भेटली. (ओळखीची) Proud
त्या काकूना तर इतका आनंद झाला, कि त्यानी मला जवळ घेऊन, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (त्या खूपच मायाळू आहेत. :स्मित:) मग भगवान शंकराच्या समोर आम्ही ‘सोसायटीकरानी’ एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आणि मग गाभारयाकडे लक्ष गेल, तर पुजारी काका आम्हाला "लवकर चला, लवकर चला," म्हणत होते. पटकन पुढे जाऊन देवाच दर्शन घेतल. प्रसाद घेऊन बाहेर आलो. प्रदक्षिणा पूर्ण करून परत गप्पा मारायला सुरुवात झाली. काकांचा मुलगा आर्मीत आहे. त्यांची पोस्टींग ‘योल’ येथे होती. ते आई-वडीलांना घेऊन दर्शनाला आले होते. त्यांनी (दोन्ही उभयतांनी)त्याच्या घरी येण्याबद्दल फ़ार आग्रह केला. जाता जाता येतो. म्हणून सांगून सटकलो. तिथून आम्ही चामुंडा
देवीच्या मंदिरात गेलो. पहातो तर ही मंडळी तिथेही होती. परत त्यांचा घरी येण्याचा आग्रह, आमच “येतो, येतो.” झालं. दर्शन घेऊन, प्रसाद खाऊन पुढे निघालो. इथेही फोटो काढायला बंदी होती. Uhoh
प्रवासात वेळ फारच जात होता. संध्याकाळी ५.२५-५.३०, वाजता अंधार पडत होता. त्यामुळे आता सगळ्यानाच लवकर जायचे होते. म्हणून जाधवांकडच्या चहाच आमंत्रण रद्ध कराव लागलं. Sad
अजून काही ठिकाणी बर्फ़ाच दर्शन होत होतं.
१७.

१८.

अचानक गाडी थांबली. कारण शोधण्यासाठी गाडीबाहेर पडलो तर दर्शन झाल ते यांच.
१९.

२०.

२१.

२२.

हा आहे ५.२६ वाजता काढलेला फ़ोटो.
२३.

आणि हा ५.२७ ला.
२४.

या प्रवासात बरीच शंकराची व मारूतीची मंदिरे आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला पण मारूतीच्या अनेक मूर्ती पाहिल्या.
सगळीकडे लक्ष्मीपूजनाची खरेदी चालू होती. पण इथे दिवाळीला जास्त महत्व नाही. त्यांचा मुख्य सण वेगळा आहे. आत्ता नाव आणि वेळ आठवत नाही.(आज्जे :डोमा:)
थोडेसे फटाकेही दिसले.पण आश्चर्य म्हणजे, खूप शोध घेऊनही एकही आकाशकंदील दिसत नव्हता. Sad मन उदास झालं. आपल्याकडचे सगळे आकाशकंदील डोळ्यासमोर फ़ेर धरून नाचू लागले. मनाने मी पुण्यात पोहोचले होते.
इथे बहुतेक आकाशकंदील लावण्याची प्रथा नाही.
आम्ही तपोवनात पोहोचलो. इथे असलेली मारूतीची महाकाय मूर्ति.
२५.

ही आहे शंकराची पिंडी.
२६.

ही दिपमाळ.
२७.

हा पहा लाल रंगाचा पर्वत. आणि ही पर्वताची दुहेरी रांग.
२८.

हिमचल प्रदेश विधान सभा धर्मशाला.
२९.

इथे (तपोवन)एक राम मंदिर आहे. ते ६.०० वाजता बंद होत. म्हणून धावत पळत मंदिर गाठल. प्रथम एक शंकर मंदिर आहे, तिथे आरती सुरू होती. खूपच आनंद झाला. तिथली आरती झाल्यावर राममंदिरात आरती झाली. तिथल्या मंडळीनी नित्यस्तोत्रे म्हटली. हे सर्व ऐकतना खूप प्रसन्न आणि छान वाटलं. इथे राम, लक्ष्मण, सिता, यांची एक काळ्या पाषाणातील उभी, सुबक व भव्य मूर्ती आहे. आणि आणखी एक राम, लक्ष्मण, सिता, यांची लहान मूर्ती आहे. इथे फोटो काढायला बंदी आहे. पुन्हा एकदा दर्शन घेऊन, तिथून बाहेर पडलो आणि मग हॉटेलकडे प्रयाण केलं. (कुणाकडे हा फोटो, असेल तर कृपया मला पाठवा. किंवा कोणी तिकडे गेलात, तर माझ्यासाठी फोटो आणा.)

हेच ते हॉटेल (याला आम्ही ’भूतबंगली’अस नाव ठेवल. पुर्वी इथे राजवाडा होता. अशी माहिती मिळाली.)
३०.

३१.

या खोलीत अस्मादिकानी मुक्काम केला होता. याच्या भिंती म्हणजे काचा आणि काचेच्या खिडक्याच होत्या. :फिदी:. या अंगणात उभं राहून, फटाक्यांचा थोडासा आनंद घेतला
३२.

ही आणखी एक खोली.
३३.

दिवसभरच्या प्रवासाने सगळेच खूप दमले होते. जेवण करून, आणि काचा नीट बंद आहेत, हे तपासून झोपी गेलो.

.

गुलमोहर: 

२००७ मधे सिमला, कुलू-मनाली ट्रिप केली होती त्यावेळी धरमशाला करायचा विचार होता पण जमलच नाही.
आज तुमच्या सोबत ही व्हर्च्युअल ट्रिप करुन मजा आली Happy

Happy Happy

छानच !