साद देती हिमशिखरे : भाग-५, खज्जियार.

Submitted by शोभा१ on 22 June, 2012 - 03:50

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957
http://www.maayboli.com/node/31336
http://www.maayboli.com/node/34708
http://www.maayboli.com/node/35870

दिनांक २७.१०.११. लवकर लवकर उठून आवरलं आणि बरोबर घेतलेल्या फराळाचा समाचार घेतला. आणि चहा सुद्धा घेतला. Happy
हा आमचा नाश्ता आणि चहा. बघा काय काय आहे ते. Wink
१.

ही हिरवळ आणि तेथे असलेल्या टेबल-खुर्च्या. (चहाची सोय.)
२.
आणि हे आहे पायरयांमध्ये उगवलेले पिटुकलं रोपटे. (खास निग.मि.मै.साठी)
३.

हा भूत बंगलीतला जिना. या गोल गोल जिन्यावरून खाली जाऊन परत वर आलो.:फिदी:
४.

सामान घेऊन निघालो. गाडीत बसलो तर एक छोटा मुलगा, वडीलांच्या कडेवर बसून आम्हाला ’टाटा’ करत होता. आम्ही त्याच्याशी हिंदीत बोलायला सुरुवात केली.(अपरिचीत ठिकाण + अपरिचीत व्यक्ती = हिंदी भाषा Wink )तेवढ्यात त्याचे वडील, त्यांच्या नातलगांशी मराठीत बोलले. आणि आमच्या वाक्-गाडीने रूळ बदलले. आमची हिंदी रुळावरची गाडी मराठी रुळावर विसावली. तो छोटा तर आमच्या बरोबर येण्यासाठी, वडीलांच्या कडेवरून, गाडीच्या खिडकीत झेपावला. आत येऊन माझ्या मांडीवर बसून खेळायला लागला. एकमेकांची चौकशी केल्यावर तेही पुण्याचेच, व कर्वेनगरला रहणारे असल्याचे समजले. पुन्हा एकदा आनंद झाला. मी हळूच मायबोलीकरांची काही खूण (मायबोलीचा टीशर्ट-टोपी, ओळखीचा चेहरा) सापडते का ते तपासले.:फिदी: पण व्यर्थ ते प्रयत्न. मग त्या छोटूला, भूभू, काऊ दाखवण्याच्या आमिषावर, हळूच त्याचा वडीलांच्या ताब्यात दिले. आणि एकमेकांचा निरोप घेतला.

ही पायरया शेती.
५.
इथे हे पिवळ्या रंगाच, त्रिकोणी काय आहे हे कळलं नाही. शेतात सगळीकडे ठराविक अंतरावर हे होतच.
६.

पुढे आम्ही ‘शक्ती पिठ जगदंबे धाम’ येथे गेलो. इथे असलेली ही ८१ फूट उंच शंकराची मूर्ती.
७.
ही माता जगदंबा.
८.
जगदंबा.
इथून आम्ही खज्जियारला गेलो.
इथे एक मोठ्ठ हिरवगार गोल पटांगण आहे.
९.

आणि त्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. आमच्या सारथ्याने तर मला आव्हान केले. "रात्री मला या पटांगणावर जाऊन दाखवा".(श्वापदांचा वावर असू शकतो ना.:फिदी:) पण मी ते कानामागे टाकले.
१०.

११.

इथे काही खेळ पण होते. पॅराशूट वगैरे. ह्या पहिल्या फोटोत जे गोगलगाईंच्या शंखासारख आहे ते काय आहे? तो पण काहीतरी खेळच आहे. त्याच नाव माहित नाही. Uhoh
पण आम्ही हॉटेलमध्ये सामान ठेऊन, आवरून बाहेर आलो तर सगंळ्यानी गाशा गुंडाळला होता.
ह्या जंगलातून थोडासा फेरफटका मारण्यासाठी खास मार्ग तयार केला आहे.

१२.

हा पाढरा रस्ता दिसतोय ना? तोच आपल्याला जंगालातून फ़िरवून आणणारा रस्ता.
मला ह्या रस्त्यावरून, जंगलात थोडासा फेरफटका मारण्याची खूप इच्छा होती. पण माझ्या इतकं धीट कोणीच नव्हत.:डोमा: म्हणून मलाही जाऊ दिलं नाही Sad कारण अंधार पडायला सुरुवात झाली होती. (ह्याला जबाबदार आमचे चक्रधर :राग:)
ही झाडं बघा किती एका उभी रांगेत आहेत.
१३.

१४.

आम्ही ह्या पटांगणावरच कडे कडेने एक फ़ेरी मारली. (दुधाची तहान ताकावर भागवली) पण ते जंगल मला खूणावत होते. ते राहिलचं. Sad (कुणाला जायचं असेल तर मला मार्गदर्शक म्हणून घेऊन जा.:डोमा:)

१५.

१६.

ही गगनचुंबी झाडं.
१७.

रम्य संध्याकाळ अनुभवणारे पर्यटक आणि उदरभरण करणारया मेंढ्या.
१८.

दिवसभर काम करून, आता पोटाची सोय पाहिलीच पाहिजे.
१९.

इथली हॊटेलही जंगलातच वसलेली आहेत.
२०.

२१.

२२.

ज्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता ते हे ‘देवधर’..........................नाही हो, ‘देवदार’ हॉटेल. आजूबाजूला वसलेल्या देवदार वृक्षांचच नाव.
२३.

२४.

खूप वेळ आल्हाददायक गारठयात कुडकुडत, कुरकुरे खात, गप्पा मारल्या. शेवटी नाईलाजाने आम्ही हॉटेलमध्ये प्रवेशलो. आणि काही उत्साही लोकाना पत्ते खेळण्याची हुक्की आली. त्यामुळे सगळे एकाच खोलीत जमलो. एकीकडे ‘गड्डाझब्बू’चा खेळ, कोण किती पायांच गाढव झालं? हे मोजत रंगात आला होता. तर तिथेच काका मोठ्ठया आवाजात टी.व्ही.लावून पहात होते. एकंदरीत सगळा आनंदी आनंद होता. ह्या हॊटेलचा वरहांड्यात अर्धीच गॅलरी होती आणि वरचा अर्धा भाग उघडाच होता. आजूबाजूला गडद अंधार, आणि घनदाट जंगल. इथे उभे राहून, आम्ही ’रात्री कोणीही ’श्वापद’ येथे येऊ शकते’या विषया वरून सुरुवात करून, ‘कुठेतरी रात्री अस्वलाने येऊन (माणसासारखे) दार कसे वाजवले, आणि दार उघडल्यावर कसे घरात घुसले’ वगैरे भितीदायक विषयाने शेवट केला. Proud
गरम गरम जेवण आणि गरम गरम पाणी सेवन करून गुडुप झोपलो. पण झोप काही येईना. येईलच कशी? ’कोल्हेकुई’चा आवाज एवढा मोठा होता, की शेवटी मी उठून, काचेला (इथेही भिंती काचेच्या होत्या) नाक लावून पटांगणावर, कोल्हे किंवा इतर प्राणी दिसतात का हे पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ह्या हॉटेलसाठी जास्तीत जास्त लाकूड वापरलेले आहे. जमिनीवरही लाकूडच आहे. त्यामुळे दाराबाहेर कुणाच्या चालण्याचा आवाज झाला, की ’कोणीतरी’ आपला पाहुणचार झोडायला आले असेच वाटत होते.
नाईलाजाने झोपेची आराधना करत राहिले. नंतर केव्हा तरी झोप लागली.

गुलमोहर: 

डिसेंबरात जाऊन आले खूपच छान! भारतातील सिव्त्झर्लंड! असंच एक स्वित्झर्लड जम्मुतही आहे सनासार नावाचे खूप गर्दी नसलेलं. फोटो अपलोड केले की टाकीन.

मस्तच.

इथे हे पिवळ्या रंगाच, त्रिकोणी काय आहे हे कळलं नाही. शेतात सगळीकडे ठराविक अंतरावर हे होतच<< मला वाटत, धानाचि कापणी आणि मळणी केल्यानंतर, जमा केलेलि तनस (नक्कि माहित नाहि) Happy

धानाचि कापणी आणि मळणी केल्यानंतर, जमा केलेलि तनस (नक्कि माहित नाहि) स्मित>>>>>>>>असेल. आम्ही फ़ार दूरून पाहिलं. त्यामुळे नीट दिसल नाही काही. Uhoh

मस्त प्र. चि.

बर्याच वर्षापुर्वी खज्जियारला गेले होते आणि त्याच्या प्रेमातच पडले होते.

मस्तच