बीज तुझ्या रे आठवणींचे
मनी लागले रुजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
ओल्या ओल्या मनास वाटे
सरून जावा अता दुरावा
तुझ्या संगती जगता जगता
क्षणात माझा ग्रिष्म विरावा
मिठीत तुझिया, रोमांचाने
अधीर झाले सजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
ऋतू बदलती क्रमास अपुल्या
तू येण्याचे निमित्त साधुन
वारा घाली शीळ अशी की
कोकिळकंठी भासे ती धुन
बारा महिने श्रावण देइन
मनात ये तू रहावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
कडाडणार्या विजेप्रमाणे
तुझे क्षणातच येणे जाणे
सुरू व्हायच्या अधीच माझे
कसे संपते जीवन गाणे?
एक क्षणाच्या लखलखण्याने
प्रीत थरथरे फुलावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
रंगामध्ये असे रंगले
वेगवेगळे कधी न दिसले
तो सार्या विश्वाचा होता
कळूनही तिज नव्हते वळले
मुग्ध राधिका कृष्णासाठी
मनी लागली झुरावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
श्रावण वांझोटा गेल्यावर
मनास माझ्या मीच सांगते
पुढील वर्षी येइल तो हे
गोड मधाचे बोट लावते
भ्रामक आशा मनी बाळगत
शिकले आहे जगावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
कविता आवडली. "रंगामध्ये असे
कविता आवडली.
"रंगामध्ये असे रंगले..........मस्त निघाले भिजावयाला"
हे कडवं अधिक आवडलं.
बारा महिने श्रावण देइन मनात
बारा महिने श्रावण देइन
मनात ये तू रहावयाला>>
सुरेख.. आवडली..!
कविता आवडली. वेगवेगळ्या रंगात
कविता आवडली. वेगवेगळ्या रंगात रंगवत शेवटी जे कडवे "समजावले "आहे न ते केवळ अप्रतीम!
.
सुंदरच!!
सुंदरच!!
छान. आवडली.
छान. आवडली.
नितांतसुंदर........
नितांतसुंदर........
निशिकान्त्जी मस्त ... मूड
निशिकान्त्जी
मस्त ...
मूड फ्रेश झाला
धन्यवाद
सर्वांचे मनापासून अभार
सर्वांचे मनापासून अभार प्रतिसादासाठी.
खूपदा वाचली. खूप आवडली...
खूपदा वाचली. खूप आवडली...
ही कविता हुकलोच होतो मी सुंदर
ही कविता हुकलोच होतो मी
सुंदर आहे कविता, आवडली
फार सुंदर कविता आहे
फार सुंदर कविता आहे निशिकांतजी.
शेवटपर्यंत कवितेने स्वभाव सोडला नाही आहे. मस्त!!
निशिकांतः नैसर्गिक सुंदर
निशिकांतः नैसर्गिक सुंदर कविता.