जन्म दाखला कुठे मिळेल?

Submitted by लिलि on 21 June, 2012 - 05:08

माझा जन्म नगरचा आहे. पण मि सध्या पुण्यात रहाते. माझ्याकडे जन्म दाखला आहे पण तिच्यावर माझे नाव नाहिये. मला नविन दाखला माझे नाव टाकुन पुण्यात कुठे मिळेल का? कि मला नगरलाच जावुन जुना दाखला दाखवुन त्यावर नाव टाकुन घ्यावे लागेल?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली नोंदणी ज्या जन्म-मृत्यु कार्यालयात झाली असेल (म्हणजे नगर), तिथून योग्य ती माहिती दिल्यावर आपल्याला नवा दाखला मिळू शकतो. त्यावर तुमचे नाव हवे असेल तर तुमची आणि पालकांची योग्य ती ओळखपत्रे (वोटर कार्ड, आधार, पॅन, राशन, रहिवासाचे पुरावे इ.) लागतील असा माझा अंदाज आहे. मी यातला तज्ञ नाही, पण सरकारी कार्यालयांत वणवण बरीच केली आहे.

शक्यतो त्या ऑफिसात एखाद्याशी ओळख निघाल्यास पहा. ओळखीने कामे लौकर होतात.

मूळ गावीच दाखला मिळेल.पण हल्ली वयाच्या १५ वर्षांपर्यंत दाखला काढला नाही तर नाव घालता येत नाही असा काहीतरी कायदा ऐकण्यात आला आहे.असे का आहे माहित नाही.कोणी नुकताच नावासकट जन्म दाखला काढला असेल तर त्यांचे अनुभव सांगावेत.

ज्या हॉस्पिटलमधे जन्म झाला त्यांना नगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात कळवणे भाग असते. हॉस्पिटलच नाव, जन्मदिनांक, आणखी काही पुरावे (जसे आई, वडील भाऊ यांचे ओळखपत्र ) वगैरे घेऊन जा. पुण्यात यादी दिलेली असते त्याप्रमाणे सकाळी अर्ज दिला कि संध्याकाळी लगेच दाखला मिळतो. पुण्यात पहिल्या कॉपीला अंदाजे साठ कि सत्तर रु. घेतात आणि पुढच्या प्रत्येक कॉपीला पाच रुपये. नीट लक्षात नाही. पण हव्या तितक्या कॉपीज सही शिक्क्यानिशी मिळत असल्याने भरपूर प्रती घेउन ठेवाव्यात. नगरला अशी सुविधा आहे किंवा नाही हे पहावे लागेल मात्र तुम्हाला.

किरण, हे जन्म नोंदणी करणार्‍यांसाठी ठीक आहे.पण मोठ्या माणसांसाठी ज्यांची नोंदणी आहे पण आजवर दाखला काढला नाही अश्यांसाठी इतकी सोपी प्रोसिजर नाही असा अनुभव आला आहे.नाव तर आता घालतच नाहीत.नाव नसेल तर त्या जन्म दाखल्याचा काय फायदा असा प्रश्न मला पडला आहे.

जन्म दाखल्यात नांव नसते असे मलाही वाटते. माझ्या जन्मदाखल्यात नाही. ती तुमच्या जन्माची फक्त नोंद असते.
माझ्या तरी माहितीप्रमाणे, अमुक एक जोडप्यास अमुक दिवशी स्त्री/पुरुष लिंगी अपत्य जन्मले, ते जिवंत जन्मले अथवा उपजत मेले, कोणत्या दवाखान्यात/घरी/स्थळी जन्मले व ही माहिती नगरपालीका/ग्रा.पं/इ. स्थानिक स्वराज्य संस्थेस कुणी दिली याचाच उल्लेख त्या दाखल्यात असतो.
नगरच्या मनपात तुम्हाला दाखला मिळेल. किरण यांनी सांगितल्याप्रमाणे २०-३० ओरिजिनल डुप्लिकेट्स घेउन ठेवा. (जन्ममृत्यू रजिस्टरच्या पानाचा तो उतारा असतो. नाममात्र किमतीत मिळत असल्याने सगळेच दाखले ओरिजिनल डुप्लिकेट असतात. मूळ पहिला दाखला तुमच्या प्रायमरि शाळेत जमा झाला होता. त्यामुळे स्कूल लिविंग सर्टिफिकेटवर काम चालावे असे वाटते.)

हे वाचा..
http://ekikrat.in/How-Get-Birth-Certificate

यातील महत्वाचे
The inclusion of name of the child is an important procedure while applying birth certificate. When registering the birth if parents include the name in the form then the birth certificate will be issued in the same name as in the municipal records. If the name is not being included immediately after the birth then parents have apply for affidavit as a supporting documents along with residence proof.

बहुतेक तुम्हाला नगरला जाउन तुमच्या आई-वडीलांकडुन एक अ‍ॅफिडेविट तयार करुन घेउन मुळ बर्थ सर्टिफिकेट मधे तुमचे नाव समाविष्ट करुन घ्यावे लागेल. थोडा वेळ (कदाचित थोडे पैसेही) लागेल पण तिथेच नीट होइल.

ऑल द बेस्ट!

नाव ठेवायच्या आधी नोंदणी केली असेल तर मुलगा किंवा मुलगी इतकाच उल्लेख असतो.. नाव ठेवलेले असेल तर त्या नावाची नोंद होते.

हेच @ घबाड.
आजकाल जन्माची माहिती जिथे बाळंतपण झाले ते डॉक्टर सुमारे २४ तासांत देऊन टाकतात. त्यामुळे बारसे झालेले नसते, अन दाखल्यावर नोंदही नसते.

माझ्या बंगलोरच्या जन्मदाखल्यावरती माझे नाव आहे. भावाचा जन्म बार्शीचा होता, त्याच्यावरती नाव नाही.

माझ्या लेकीचा जन्म २ वर्षापूर्वी झालेला आहे.
जन्मदाखल्यामधे तिचे नाव आहे. त्याशिवाय दाखला देत नाहीत. (हे मी रत्नागिरी नगरपालिकेबद्दल बोलत आहे) हॉस्पिटलने जन्माची नोंद केलेला कागद जन्म मृत्यू विभागाकडे पाठवलेला असतो. त्यावरती नाव नसते. मात्र जन्मानंतर पालकानी एक अर्ज करावा लागतो. ज्यामधे बाळाचे नाव द्यावे लागते. (बाळाचे नाव फर्स्टनेम- मिडलनेम- सरनेम या पद्धतीत न ठेवता दुसर्‍या पद्धतीने ठेवायचे असेल तर तसे अर्जात नमूद करावे लागते.

अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जन्मदाखल्यातील प्रत्येक कॉलम देवनागरी आणि इंग्रजीमधून आहे. रत्नागिरी न.प. एवढी सुधारित असेल असे कधी वाटले नव्हते Happy

माझ्या आणि मुलींच्या प्रत्येकीच्या जन्मदाखल्यावर आमची नावे आहेत. पुणे महानगरपालिका Happy जन्म झाल्यानंतर २४ तासात हॉस्पिटल जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात (शहरात महानगरपालिका, गावात नगरपालिका) नोंदणी करते. तिथुन एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. तुम्हाला जेंव्हा हॉस्पिटलातुन डिस्चार्ज मिळतो त्या डिस्चार्जकार्डवर तो नंबर टाकुन दिला जातो. ते डिस्चार्ज कार्ड तुम्ही घेऊन गेलात की तुम्हाला जन्मदाखला मिळतो (२००६ साली मुलीच्या मुळ प्रतिला ३० + अधिक प्रतिंना प्रत्येकी ५रु ). जन्मानंतर साधारणतः १०-१५ दिवसात दाखला आणल्यास नाव घातलेले असतेच.
माझ्या केसमधे तर लेक १ महिना एन आय सी यु मधे होती तेंव्हा मला दाखला ३ महिन्यांनतर काढता आला.

नंदिनी पुण्यात पण अशीच सोय आहे नावे सगळी देवानगरी आणि इंग्रजीतुन आहेत. जन्मदाखल्यावर मातेचे आणि पित्याचे दोघांचे नाव असते. आणि मुळातच कॉम्प्युटराईज्ड प्रत असल्याने कुठे काही बदलाची शक्यता नाही.
पुर्वीचे दाखले हाताने लिहिलेले असायचे.

मला माझा जन्मदाखला पुण्यात काढायचा आहे.पण आता जो जन्मदाखला मिळेल त्यावर माझे नाव असणार नाही कारण वयाच्या १५ वर्षांपर्यंतच जन्मदाखल्यात नाव घालून घेता येते असा सवाई नियम पुणे म.न.पा मध्ये समजला.कोणाला असा अनुभव आहे का?
असा जन्म दाखला मिळाल्यास अमेरिकेत 'नाव नसलेला जन्म दाखला+आई-वडिलांचे अ‍ॅफिडेविट' ग्राह्य धरले जाते का?

असा जन्म दाखला मिळाल्यास अमेरिकेत 'नाव नसलेला जन्म दाखला+आई-वडिलांचे अ‍ॅफिडेविट' ग्राह्य धरले जाते का? >> बाकी ठिकाणी माहित नाही पण ग्रीनकार्ड अर्जासाठी हवे असल्यास 'नाव नसलेला जन्म दाखला+आई-वडिलांचे अ‍ॅफिडेविट (अटेस्टेड)' चालते.

आणी जर जन्मदाखला देवनागरीत असेल तर स्वतः इंग्रजीत भाषांतर करुन स्वतःचे अ‍ॅफिडेविट (अटेस्टेड) पण चालते.

मी या वर्षि माझा दाखला नविन बनवुन घेतला. त्यावर आता माझे नाव आहे. पण मला असा दाखला (या वर्षिचि तारिख असलेला) अमेरिकेत ग्रीनकार्ड अर्जासाठी वापरता येईल का? कि त्यासोबत परत अ‍ॅफिडेविट जोडावे लागेल?

लिलि माझ्या मूळ जन्मदाखल्यात आईच्या नावाचं स्पेलिंग चुकलं होतं. त्यामुळे आयत्या वेळी असाच नवीन दाखला काढून ग्रीन कार्ड साठी दिला होता. कुठलंही अ‍ॅफेडेविट करावं लागलं नाही आणी कुठलीही अडचण आली नाही.

धन्यवाद prady आणि श्री.

बहुतेक तुम्हाला नगरला जाउन तुमच्या आई-वडीलांकडुन एक अ‍ॅफिडेविट तयार करुन घेउन मुळ बर्थ सर्टिफिकेट मधे तुमचे नाव समाविष्ट करुन घ्यावे लागेल. थोडा वेळ (कदाचित थोडे पैसेही) लागेल पण तिथेच नीट होइल. >>> +१
मी आताच १-१.५ महिन्यापुर्वी माझ्या दाखल्यावर नाव टाकुन घेतले.हे काम नगरला जाउनच केले. आधिच्या नाव नसलेल्या दाखल्याची कॉपि, आई चे एक अ‍ॅफिडेविट आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि ६०-७० रु. (नक्कि आठवत नाहि) सोडले तर काहिहि लागले नाहि. १-२ तासातच नविन दाखला बनवुन मिळाला. काहिहि जास्त पैसे द्यावे लागले नाहित. आणि असे बरेच लोक मी थांबले असताना दाखल्यावर नाव टाकण्यासाठि आले होते. प्रॉसेस अगदि सुरळित आणि सोपि होति. नगरच्या पालिकेत हे बघुन चांगले वाटले.

मित्रानो जर तुम्हाला जन्म प्रमाण पत्र बद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या वेबसाईट ला सुद्धा भेट देऊ शकतात.
जन्म प्रमाण पत्र https://www.birthcertificateinfo.com/birth-certificate-for-newborn-baby/

माझ्या मुलीच्या जन्मदाखल्यावर तिचे नाव आहे. तिच्या जन्मानंतर पालिकेतून दाखला घेतला तो हस्तलिखित आहे, तिचे नावही त्यावर आहे. माझी वहिनी नंतर त्याच खात्यात बदलून गेल्यावर तिने मुलीचा कॉम्पुटराईज्ड दाखलाही आणून दिला. Happy दोन्ही दोन्ही भाषांत आहेत - मराठी व इंग्रजी.

माझा दाखला मात्र नाहीय. मी शाळा सोडल्याचा दाखला हाच जन्मतारखेचा पुरावा म्हणून आजवर पुढे केलाय. (हॉस्पिटलचे बिल मात्र अजूनही जपून ठेवलेय, रु. 15 इतका भुर्दंड पडला तेव्हा माझ्या आईबाबांना Happy Happy )
यापुढच्या आयुष्यात यामुळे अडचण येईल असे वाटत नाही.

मात्र आता अमुक एक वर्षानंतर जन्म असल्यास जन्मदाखलाच हवा असा नियम आहे असे कुठेतरी वाचलेय.