मायबोलीकरांच्या व्यक्तिगत लेखनाची यादी आणि सुचवलेले लेखन (हे पण पहा)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१)प्रत्येक मायबोलीकराने केलेले लेखन त्यांच्या व्यक्तिरेखेत जाऊन पहायची सोय नेहमीच होती. पण त्या पानाची मांडणी बरेच लेखन असेल तर शोधायला तितकीशी सुलभ नव्हती. प्रत्येक लेखनाचा थोडा भाग दिसायचा पण हवे ते लेखन शोधण्यासाठी बरेच आत जावे लागायचे. बर्‍याच मायबोलीकरांनी आपआपल्या विचारपूस पानाच्यावर वेगळी यादी ठेवायला सुरुवात केली.

आजपासून या यादीच्या मांडणीत बदल केला आहे. नवीन लेखनात ज्याप्रमाणे थोडक्यात शीर्षक आणि लेखन प्रकार दिसतो, तश्याच प्रकारे तुमच्या व्यक्तिरेखेबरोबरच्या "लेखन" या टॅबमधे ही यादी दिसेल. या आपोआप होणार्‍या यादीमुळे विचारपूस पानाच्यावर वेगळी यादी ठेवायची गरज नाही.

२) प्रायोगिक तत्वावर, बहुतेक सगळ्या पानांवर उजव्या स्तंभात खाली "हे पण पहा" या मथळ्याखाली तुम्ही असलेल्या पानाशी संबंधीत मायबोलीवर इतरत्र असलेले लेखन सुचवले आहे. या सुविधेमुळे डाटाबेसवर कितपण ताण येतो याचे काही दिवस निरक्षण करून ते कायम ठेवायचे का ते ठरवले जाईल. यापूर्वी अशी सोय द्यायचा प्रयत्न केला होता पण डाटाबेसवर होणार्‍या परिणांमामुळे ती बंद करावी लागली.

"हे पण पहा" ची सध्याची जागा ही तात्पुरती आहे (उजव्या बाजूला सगळ्यात खाली). सोय कायमची करायचे ठरले तर योग्य जागी हलवता येईल.

विषय: 
प्रकार: 

हे पण पहा हे थोडे दिवस पुन्हा बंद केले आहे. मायबोलीवरच्या तांत्रिक अडचणीचा आणि याचा संबंध नसावा असे वाटते पण शंका नको म्हणून ती सुविधा परत बंद केली आहे.

नवीन लेखनात ज्याप्रमाणे थोडक्यात शीर्षक आणि लेखन प्रकार दिसतो, तश्याच प्रकारे तुमच्या व्यक्तिरेखेबरोबरच्या "लेखन" या टॅबमधे ही यादी दिसेल. >>>
हे खरंच बेस्ट झालं आहे Happy

<< नवीन लेखनात ज्याप्रमाणे थोडक्यात शीर्षक आणि लेखन प्रकार दिसतो, तश्याच प्रकारे तुमच्या व्यक्तिरेखेबरोबरच्या "लेखन" या टॅबमधे ही यादी दिसेल. >>

हे खरंच छान झालंय. आता जुने धागे खणून काढायलाही सोप्पं जाईल. Happy

नवीन लेखनात ज्याप्रमाणे थोडक्यात शीर्षक आणि लेखन प्रकार दिसतो, तश्याच प्रकारे तुमच्या व्यक्तिरेखेबरोबरच्या "लेखन" या टॅबमधे ही यादी दिसेल. >>>
>> वाह, ते अ‍ॅस्थेटिकलीही फार छान दिसते आहे, अनुक्रमणिकेसारखे जरासे Happy
धन्यवाद अ‍ॅडमिन Happy

आता जुने कोणकोणते प्रयोग अर्धवट सोडून दिले आहेत ते लगेच दिसते. धन्यवाद.
(म्हणजे ते प्रॉजेक्ट्स पूर्ण होतीलच असे नाही, पण)

कृपया 'हे पण पहा' लवकरच सुरु करा पुन्हा.