Submitted by shilpa mahajan on 13 June, 2012 - 02:54
अंतर राखून
सख्या मला जवळ घे
पण श्वासापुरती फट ठेवून
माझ्यावरती रागाव सुद्धा
मनधरणी ची जागा राखून
पाठ फिरवून रुसून बैस
पण वळवण्याची संधी ठेवून
वळवल्यावर हसून बघ
पुन्हा रुसण्याचा मोका राखून
गुलमोहर:
शेअर करा
थोडक्यात चांगलं
थोडक्यात चांगलं मांडलंय.

-------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : इतक्या अटी घातल्यानंतर त्या ’सख्या’चं कसं होणार ? ... कठीण आहे ....
थोडक्यात चांगलं मांडलंय. >>+
थोडक्यात चांगलं मांडलंय.
>>+ १
इतक्या अटी घातल्यानंतर त्या ’सख्या’चं कसं होणार ? ... कठीण आहे .... >>> इथेही + १
सुंदर, सुंदर आणि सुंदरच.....
सुंदर, सुंदर आणि सुंदरच.....
छान आणि सुटसुटीत. ऊल्हास तरी
छान आणि सुटसुटीत.

ऊल्हास तरी अटी कमीच आहेत.
ऊल्हास तरी अटी कमीच
ऊल्हास तरी अटी कमीच आहेत.>>>>>अरे बापरे!मग अजून घालनारकी काय?
छान कविता.
मला तुम्ही मान्डलेले काव्य
मला तुम्ही मान्डलेले काव्य खुप आवडले, आपोआप या अटी निर्माण होतात अश्यच काही ... मस्त खुप छान....
एक टच आहे.. खोल असे वाटते...