" A Lot Can Happen Over Coffee"

Submitted by स्मितहास्य on 11 June, 2012 - 23:43

आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं..

मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात....

आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)... आणि एक दिवस अचानक "ती" भेटली. तशी माझी आणि तिची भेट एका लग्नातली. ना मी तिला ओळखत होतो, ना ती मला. पण म्हणतात ना, कोणी आपल्या आयुष्यात येणार असेल तर, काही का होईना, ती व्यक्ती येतेच येते.

तर अशाच एका मित्राच्या लग्नात ती दिसली. साधी, सरळ, निटनेटकी. केस "बडे अच्छे लगते है" टाईप एका खांद्यावर घेतलेले, कसलाही भपकेबाजपणा नाही. सहजंच अशी नजर गेली आणि सर्रकन एक विचार मनात आला, बास्.. लाईफ पार्टनर असावी तर अशी. बोलणं तर लांबच होतं कारण ओळख नव्हती. मग फक्त नजर भिरभिरू लागली. मित्राचं लग्न लागलं, जेवणं झाली, आणि मीपण निघालो. आलो घरी. पण काही केल्या तिचा चेहरा नजरेसमोरून जात नव्हता. असेच मग दोन-तिन दिवस तिची ओळख कशी काढू या विचारात गेले, पण सत्यानाश सगळा. एकही क्लू लागत नव्हता.

असाच मग संध्याकाळी ऑफीसातून लवकर घरी आल्यावर त्या मित्राचे लग्नातले काही फोटो फेसबुकवर अप केले, आणि त्या मित्राला टॅग केल. आणि म्हणतात ना, की एखाद्याचा खरंच मनापासून विचार केला तर नसलेले मार्गही समोर येतात.. तसंच झालं. "ती" माझ्या मित्राच्या फ्रेंडलिस्टमधे होती आणि त्याला मी टॅग केलेल्या फोटोवर तिची कमेंट आलेली. आणि नंतर चक्क मला तिने पाठवेलेली रिक्वेस्ट हे सांगून की सुंदर फोटोग्राफ्स. हवेत उडायचा बाकी होतो फक्त. अहो बरोबर आहे ना, कसलाही दुवा नसतांना समोरून तिने अ‍ॅप्रोच होणं हे कसलं भन्नाट आहे.. Happy

तर, असेच दिवस सुरू झाले, मग चॅट, नंबर दिले गेले आणि मस्त एका रिलेशनशिपला सुरूवात झाली. फुलऑन खुशीत होतो मी. मग तिचाच विचार, काय आवडेल काय नाही... मग एक-दोन वेळा भेटलो. लाईफ सुसाट एकदम. हो पण तरी ते CCDचं वाक्य मात्र डोक्यात पिंगा घालतंच होतं.

असंच एका रात्री एक मस्त आयडीया डोक्यात आली. दुसर्‍या दिवशी तिला फोन करून सांगितलं की, या आठवड्यात ऑफिसला दांडी मार आणि चल माझ्याबरोबर. अर्थातंच पुढचा प्रश्न होता, कुठे?
मी: कॉफी प्यायला
ती: अख्खा दिवस का मग?
मी: तू चल गं. प्रश्न विचारत नको बसू.
ती: पण अगोदर कुठे ते तरी सांग, नाहीतर येणार नाही मी (टिपीकल बायकांची डोकी)
मी: तू भेट. मग सांगतो.
ती: ठिक आहे. सांगते पण आता नाही. नंतर

दोन-तीन दिवस असेच हा......... मग ही म्हणाली की, १ जूनला जाऊया. झालं. ठरलं होतं तर. आदल्या रात्री सगळी तयारी केली आणि हिच्या कन्फर्मेशन मेसेजची वाट बघत बसलो. वेळः रात्री १०.३० अंदाजे आणि मेसेज आला. उद्या सकाळी ९.३० ला गोरेगाव चेक नाका. मेसेज वाचला, रिप्लाय दिला आणि दिली पडी मारून. पण झोप खरंच लागणार होती का :). सकाळी अस्मादिक ९ला हजर. तीपण लवकरंच आली (बरं झालं, नाहीतर ट्रॅफिक वाट लावणार होतं). ती आली, भेटली आणि मग मारली बाईकला किक. निघालो.

आता मात्र सगळीकडे हायवेज दिसायला लावल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू,
ती: कुठे चाललोय आपण?
मी: कळेल ना गं. शांत रहा.
ती: अरे पण कुठे??
मी: थांब जरा. धीर धर. समजेल
ती: तू सांग आधी.
मी: थोडं पुढे गेलो की सांगतो नक्की.
ती: शांत.

पनवेल आल्यावर मात्र तिचा धीर सुटला आणि म्हणाली की अरे हे तर पनवेल आलंय, आतातरी सांग आपण कुठे चाल्लोय
मी: कॉफी प्यायला
ती: अरे.............. हो पण कुठे
मी: खंडाळा
ती: किंचाळून खंडाळा????????
मी: हो. तू कॉफी म्हणाली होतीस. कुठे.. ते थोडीच सांगितलंस
ती: शांत...............................

सुसाट बाईक मारत होतो. ही मागे शांत एकदम :). खंडाळा आलं पण हवा तो स्पॉट मिळेना. तसेच पुढे लोणावल्याला गेलो. ९.३० ला निघालेलो आम्ही १२ ला लोणावळ्यात होतो. तिथे एका होटेलमधे थोडा स्नॅक्स घेतला. बसलो जरावेळ. फ्रेश झालो. पाय दुखत होता कारण आदल्या दिवशी डाव्या पायाच्या अंगठ्याला खाच्च्कन काच कापून गेली होती. स्टिचेस होते आणि त्यामुळे गिअर टाकायला थोडा त्रास होत होता. सहज म्हणून शूज काढला तर चांगला व्यासभर इंचाचा रक्ताचा डाग सॉक्सवर दिसत होता. पण एनिवेज. तिच्यासाठी वाट्टेल ते.
पण माझा प्लॅन???
बाहेर आल्यावर एका काकांना विचारलं की, इथे लायन्स व्ह्यू पॉईंट कुठे आला? ते म्हणाले की पुढून डावीएकडे सरळ जा. हिला म्हटलं चल. लोणावळ्यापसून पॉईंट २४कीमी वर. मस्त रोड होता.

ती: अरे हा रोड कधी संपणार रे
मी: मलापण माहीत नाही गं. पण थांब संपेल.

एकदाचा पॉईंट आला. दुपारचा १ वाजला असतांनाही तिथला सोसाट्याचा वारा मी म्हणत होता. मस्त हिल पॉईंट, बोटावर मोजण्याइतकी माणसं आणि आम्ही दोघे. बाईक लावली आणि पॉईंटवर गेलो. तर तिथे असलेल्या एका टपरीतून एक १५-१६ वर्षांचा मुलगा चट्कन धावत आला
तो: साहेब काय घेणार? भजी, चहा, कॉफी, भुट्टा?
मी: अरे काही नको फक्त तिथे (एक टपरीच होती. पण दुकान वगैरे नव्हतं. आणि वर ताडपत्री अंथरल्याने सावली होती) दोन खुर्च्या ठेव.

मग आम्ही दोघे, रेलिंगजवळ गेलो. जाम खुश दिसत होती. तिच्या केसांशी खेळणारा वारा आणि तिची आपली केस सावरण्याची धडपड मी एंजॉय करत होतो.
ती: इथे??
मी: कॉफी
ती: ??
मी: बॅगपॅक उघडली, त्यातून थर्मोस काढला, दोन कप आणि दोन सॉसर्स काढले आणि कॉफी मॅटवर ठेवले. ती फक्त बघत होती. एका खुर्चीवर ती असल्याने साहजिकंच मी माझ्या खुर्चीवर माझं दुकान? मांडलं होतं.
कॉफी कपमधे ओतल्यावर जेव्हा मी म्हणालो, कॉफी... आणि त्यावर तिने नुसतं हसून दिलेलं उत्तर जाम वेड लावणारं होतं.

ती: हे एवढं??
मी: तुझ्यासाठी
ती:पाय इतका दुखावलाय तरी का आलास?
मी: हे बघ यावेळी माझ्या दुखण्यापेक्षा, तुझं सुख जास्त महत्वाचं आहे. सो लेट इट बी. एम् ओके.
ती: परत एकदा शांत....

कोणी नव्हतं त्यावेळी तिथे. फक्त मी, ती आणि तो पॉईंट. विचार करत होतो की वेळ इथेच थिजली तर किती बरं होईल.

मग गप्पा सुरू झाल्यावर मी म्हणालो;
मी: इतकी गप्प का आहेस?
ती: अरे मी कधी इतक्या लांब आलेले नाही ना. ठरवलं होतं की, कितीही जवळचा मित्र असला तरी मुंबई बाहेर जायच नाही. आणी आज माझाच विश्वास बसत नाहीए की मी इथे तुझ्याबरोबर लोणावळ्यात आहे.
मी: शांत
मी: काहीतरी वेगळं करायच होतं जेणेकरून तू आजचा दिवस नेहमी लक्षात ठेवशील. म्हणून इथे आणलं
ती: फक्त हसली

साधारण ३ वाजता तिथून निघालो कारण घरच्यांसाठी ती ऑफिसात होती ना. मग वेळेत घरी सोडायला नको.
निघतांना बाईकला किक मारली तर ती सुरूच होईना (मनात म्हटलं, झाली काशी. आता बस बोंबलंत. खाज होती ना इतकं महागलेलं Sad पेट्रोल भरून इतक्या लांब यायची) पण झिडकारला तो विचार आणि मनातच म्हणालो कि तिच्यासाठी काहीही.. नशीब बाईक सुरू झाली. आणि परतीचा रस्ता धरला. प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यभराची एक सुंदर आठवण तिला दिली होती.

६ला पवई ला परत थोडं खाल्लं आणि मग आरे रोडने गोरेगाव चेक नाका शार्प ७ ला. म्हणजे परफेक्ट होत एकदम. तिला जरी सोड्लं तरी मी मात्र अजून तिथेच त्या पॉईंटवर होतो. तिचा अजूनही विश्वास नव्हता की आम्ही लोणवळ्याहून आलेलो होतो यावर.

घरी आलो, आंघोळ केली रिलॅक्स झालो. एकदा मेसेज करून विचारलं, बॅक पेन वगेरे??? ति म्हणाली की आहे थोडं पण वुड बी फाईन.

नंतर काही दिवसांनी प्रपोज केलं, अपेक्षेप्रमाणेच उत्तर मिळालं :). आता ते कसं, हे सांगेन सविस्तर पुढे कधीतरी.
सध्या वाट बघतोय तिची. ती माझी होईल ही खात्री आहेच. ती माझी, ती माझी म्हणतांना, मी तिचा कधी झालो तेच कळालं नाही. आणि झालो तो पण असा की, यापुढचे सगळे जन्म, फक्त ती आणि तिच्यासोबतंच.

दरवेळी ती विचारते की अरे काय हे.... आणि मी फक्त एवढंच म्हणतो, "तुमच्यासाठी काहीही"

Now i understand, "What can happen over COFFEE!!!!"

गुलमोहर: 

वॉव खूपच सही लिहिलस स्मित..........मस्तच आणि स्वतःचा अनुभव म्हनजे संपुर्ण आयुष्य एक थ्रिल असा वेडा क्षण असेच वाटुन जाते नै......... Happy

छान खूपच छान अनुभव नि त्यांच वर्णनही सुरेख जमलयं !!!

जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी ही घेऊन गेलेलो एका मुलीला मुंबई ते लोणावळा बाईकवर वेळ हीच ९ ते ६
पण तारीख होती. २५ जुलै ............ होय तीच २५ जुलै ज्या नंतर दुसर्‍या दिवशी २६ जुलै ला मुंबई पाण्यात होती.

ती मुलगी सध्या बायको आहे माझी.

तुलाही शुभेच्छा!!!

मी फक्त एवढंच म्हणतो, "तुमच्यासाठी काहीही".............>>> किति मस्त.... प्रत्येकालाच हवा असतो असा पार्टनर' .

आवडली...

सेम सीन.. आणि जवळजवळ सेम डायलॉग कार्तिक कॉलिंग कार्तिक मधे आहेत >>> करेक्ट. मी प्रत्यक्षात उतरवली ती थीम. फक्त स्पॉट वेगळा होता. Happy

सेम सीन.. आणि जवळजवळ सेम डायलॉग कार्तिक कॉलिंग कार्तिक मधे आहेत >>> करेक्ट. मी प्रत्यक्षात उतरवली ती थीम. फक्त स्पॉट वेगळा होता. >>>> वाह मग मस्तच अभिनंदन Happy

(मी म्हणूनच आत्तापर्यंत पोष्ट टाकली नव्हती मला पण कार्तिक कॉलिंग कार्तिक सिनेमाची आठवण आली )

मी प्रत्यक्षात उतरवली ती थीम>>

बरं झालं तुमच्या 'तिने' तो सिनेमा बघितला नव्ह्ता Happy नाहीतर तिला सगळा प्लॉट आधीच लक्षात आला असता Happy

नाहीतर तिला सगळा प्लॉट आधीच लक्षात आला असता>>> देवाची क्रुपा. म्हणूनच घाई करत होतो. नशीब काही आयडीया नाही आली तिला ते. अजूनही माहीत नाहीए तिला. पण जेव्हा KKK एकत्र बघू. तेव्हा तिची रिअ‍ॅक्शन बघायला आवडेल.. Wink

इन फॅक्ट, तो स्पॉट शोधायची बरीच मेहनत घेतली. आता नविन बजाज डिस्कवरच्या अ‍ॅडमधेपण तो सीन आहे. खूप प्रयत्न केले पण नाही जमलं म्हणून मुपो. लोणावळा.

मी: कॉफी प्यायला
ती: अरे.............. हो पण कुठे
मी: खंडाळा
ती: किंचाळून खंडाळा????????
मी: हो. तू कॉफी म्हणाली होतीस. कुठे.. ते थोडीच सांगितलंस
>>>
अगदी कार्तिक कॉलिंग कार्तिक टाईप्स Happy

जियो!
ऑल द बेस्ट Happy

मस्त. मी एक्दम नॉस्टल्जिक.
लग्नाआधी असंच सगळ असतं म्हणजे "तुझ्यासाठी काहीही " टाइप Proud

धन्स लोक्स.
मस्तच आणि स्वतःचा अनुभव म्हनजे संपुर्ण आयुष्य एक थ्रिल असा वेडा क्षण असेच वाटुन जाते नै.........>>>> अगदी. म्हणूनच तर ती आयुष्यभर तो क्षण लक्षात ठेवेल. Happy

ती मुलगी सध्या बायको आहे माझी.>>>> क्या बात है दोस्त. जबरी.

किति मस्त.... प्रत्येकालाच हवा असतो असा पार्टनर' .>>>> बरोबर. पण हे असं फक्त बोलून फायदा नाही. मी खरंच तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. आणि राहीन.

किती मस्त!

मुंबैत असेपर्यंत आमच्याकडे बाईक नव्हती त्यामुळे कधिच अशी मजा करता आली नाही. लग्नानंतर बाइकच काय कार जरी असली तरी अशी मजा येणार नाही. Wink

Pages