आपल्यापैकी बर्याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं..
मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात....
आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)... आणि एक दिवस अचानक "ती" भेटली. तशी माझी आणि तिची भेट एका लग्नातली. ना मी तिला ओळखत होतो, ना ती मला. पण म्हणतात ना, कोणी आपल्या आयुष्यात येणार असेल तर, काही का होईना, ती व्यक्ती येतेच येते.
तर अशाच एका मित्राच्या लग्नात ती दिसली. साधी, सरळ, निटनेटकी. केस "बडे अच्छे लगते है" टाईप एका खांद्यावर घेतलेले, कसलाही भपकेबाजपणा नाही. सहजंच अशी नजर गेली आणि सर्रकन एक विचार मनात आला, बास्.. लाईफ पार्टनर असावी तर अशी. बोलणं तर लांबच होतं कारण ओळख नव्हती. मग फक्त नजर भिरभिरू लागली. मित्राचं लग्न लागलं, जेवणं झाली, आणि मीपण निघालो. आलो घरी. पण काही केल्या तिचा चेहरा नजरेसमोरून जात नव्हता. असेच मग दोन-तिन दिवस तिची ओळख कशी काढू या विचारात गेले, पण सत्यानाश सगळा. एकही क्लू लागत नव्हता.
असाच मग संध्याकाळी ऑफीसातून लवकर घरी आल्यावर त्या मित्राचे लग्नातले काही फोटो फेसबुकवर अप केले, आणि त्या मित्राला टॅग केल. आणि म्हणतात ना, की एखाद्याचा खरंच मनापासून विचार केला तर नसलेले मार्गही समोर येतात.. तसंच झालं. "ती" माझ्या मित्राच्या फ्रेंडलिस्टमधे होती आणि त्याला मी टॅग केलेल्या फोटोवर तिची कमेंट आलेली. आणि नंतर चक्क मला तिने पाठवेलेली रिक्वेस्ट हे सांगून की सुंदर फोटोग्राफ्स. हवेत उडायचा बाकी होतो फक्त. अहो बरोबर आहे ना, कसलाही दुवा नसतांना समोरून तिने अॅप्रोच होणं हे कसलं भन्नाट आहे.. 
तर, असेच दिवस सुरू झाले, मग चॅट, नंबर दिले गेले आणि मस्त एका रिलेशनशिपला सुरूवात झाली. फुलऑन खुशीत होतो मी. मग तिचाच विचार, काय आवडेल काय नाही... मग एक-दोन वेळा भेटलो. लाईफ सुसाट एकदम. हो पण तरी ते CCDचं वाक्य मात्र डोक्यात पिंगा घालतंच होतं.
असंच एका रात्री एक मस्त आयडीया डोक्यात आली. दुसर्या दिवशी तिला फोन करून सांगितलं की, या आठवड्यात ऑफिसला दांडी मार आणि चल माझ्याबरोबर. अर्थातंच पुढचा प्रश्न होता, कुठे?
मी: कॉफी प्यायला
ती: अख्खा दिवस का मग?
मी: तू चल गं. प्रश्न विचारत नको बसू.
ती: पण अगोदर कुठे ते तरी सांग, नाहीतर येणार नाही मी (टिपीकल बायकांची डोकी)
मी: तू भेट. मग सांगतो.
ती: ठिक आहे. सांगते पण आता नाही. नंतर
दोन-तीन दिवस असेच हा......... मग ही म्हणाली की, १ जूनला जाऊया. झालं. ठरलं होतं तर. आदल्या रात्री सगळी तयारी केली आणि हिच्या कन्फर्मेशन मेसेजची वाट बघत बसलो. वेळः रात्री १०.३० अंदाजे आणि मेसेज आला. उद्या सकाळी ९.३० ला गोरेगाव चेक नाका. मेसेज वाचला, रिप्लाय दिला आणि दिली पडी मारून. पण झोप खरंच लागणार होती का :). सकाळी अस्मादिक ९ला हजर. तीपण लवकरंच आली (बरं झालं, नाहीतर ट्रॅफिक वाट लावणार होतं). ती आली, भेटली आणि मग मारली बाईकला किक. निघालो.
आता मात्र सगळीकडे हायवेज दिसायला लावल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू,
ती: कुठे चाललोय आपण?
मी: कळेल ना गं. शांत रहा.
ती: अरे पण कुठे??
मी: थांब जरा. धीर धर. समजेल
ती: तू सांग आधी.
मी: थोडं पुढे गेलो की सांगतो नक्की.
ती: शांत.
पनवेल आल्यावर मात्र तिचा धीर सुटला आणि म्हणाली की अरे हे तर पनवेल आलंय, आतातरी सांग आपण कुठे चाल्लोय
मी: कॉफी प्यायला
ती: अरे.............. हो पण कुठे
मी: खंडाळा
ती: किंचाळून खंडाळा????????
मी: हो. तू कॉफी म्हणाली होतीस. कुठे.. ते थोडीच सांगितलंस
ती: शांत...............................
सुसाट बाईक मारत होतो. ही मागे शांत एकदम :). खंडाळा आलं पण हवा तो स्पॉट मिळेना. तसेच पुढे लोणावल्याला गेलो. ९.३० ला निघालेलो आम्ही १२ ला लोणावळ्यात होतो. तिथे एका होटेलमधे थोडा स्नॅक्स घेतला. बसलो जरावेळ. फ्रेश झालो. पाय दुखत होता कारण आदल्या दिवशी डाव्या पायाच्या अंगठ्याला खाच्च्कन काच कापून गेली होती. स्टिचेस होते आणि त्यामुळे गिअर टाकायला थोडा त्रास होत होता. सहज म्हणून शूज काढला तर चांगला व्यासभर इंचाचा रक्ताचा डाग सॉक्सवर दिसत होता. पण एनिवेज. तिच्यासाठी वाट्टेल ते.
पण माझा प्लॅन???
बाहेर आल्यावर एका काकांना विचारलं की, इथे लायन्स व्ह्यू पॉईंट कुठे आला? ते म्हणाले की पुढून डावीएकडे सरळ जा. हिला म्हटलं चल. लोणावळ्यापसून पॉईंट २४कीमी वर. मस्त रोड होता.
ती: अरे हा रोड कधी संपणार रे
मी: मलापण माहीत नाही गं. पण थांब संपेल.
एकदाचा पॉईंट आला. दुपारचा १ वाजला असतांनाही तिथला सोसाट्याचा वारा मी म्हणत होता. मस्त हिल पॉईंट, बोटावर मोजण्याइतकी माणसं आणि आम्ही दोघे. बाईक लावली आणि पॉईंटवर गेलो. तर तिथे असलेल्या एका टपरीतून एक १५-१६ वर्षांचा मुलगा चट्कन धावत आला
तो: साहेब काय घेणार? भजी, चहा, कॉफी, भुट्टा?
मी: अरे काही नको फक्त तिथे (एक टपरीच होती. पण दुकान वगैरे नव्हतं. आणि वर ताडपत्री अंथरल्याने सावली होती) दोन खुर्च्या ठेव.
मग आम्ही दोघे, रेलिंगजवळ गेलो. जाम खुश दिसत होती. तिच्या केसांशी खेळणारा वारा आणि तिची आपली केस सावरण्याची धडपड मी एंजॉय करत होतो.
ती: इथे??
मी: कॉफी
ती: ??
मी: बॅगपॅक उघडली, त्यातून थर्मोस काढला, दोन कप आणि दोन सॉसर्स काढले आणि कॉफी मॅटवर ठेवले. ती फक्त बघत होती. एका खुर्चीवर ती असल्याने साहजिकंच मी माझ्या खुर्चीवर माझं दुकान? मांडलं होतं.
कॉफी कपमधे ओतल्यावर जेव्हा मी म्हणालो, कॉफी... आणि त्यावर तिने नुसतं हसून दिलेलं उत्तर जाम वेड लावणारं होतं.
ती: हे एवढं??
मी: तुझ्यासाठी
ती:पाय इतका दुखावलाय तरी का आलास?
मी: हे बघ यावेळी माझ्या दुखण्यापेक्षा, तुझं सुख जास्त महत्वाचं आहे. सो लेट इट बी. एम् ओके.
ती: परत एकदा शांत....
कोणी नव्हतं त्यावेळी तिथे. फक्त मी, ती आणि तो पॉईंट. विचार करत होतो की वेळ इथेच थिजली तर किती बरं होईल.
मग गप्पा सुरू झाल्यावर मी म्हणालो;
मी: इतकी गप्प का आहेस?
ती: अरे मी कधी इतक्या लांब आलेले नाही ना. ठरवलं होतं की, कितीही जवळचा मित्र असला तरी मुंबई बाहेर जायच नाही. आणी आज माझाच विश्वास बसत नाहीए की मी इथे तुझ्याबरोबर लोणावळ्यात आहे.
मी: शांत
मी: काहीतरी वेगळं करायच होतं जेणेकरून तू आजचा दिवस नेहमी लक्षात ठेवशील. म्हणून इथे आणलं
ती: फक्त हसली
साधारण ३ वाजता तिथून निघालो कारण घरच्यांसाठी ती ऑफिसात होती ना. मग वेळेत घरी सोडायला नको.
निघतांना बाईकला किक मारली तर ती सुरूच होईना (मनात म्हटलं, झाली काशी. आता बस बोंबलंत. खाज होती ना इतकं महागलेलं
पेट्रोल भरून इतक्या लांब यायची) पण झिडकारला तो विचार आणि मनातच म्हणालो कि तिच्यासाठी काहीही.. नशीब बाईक सुरू झाली. आणि परतीचा रस्ता धरला. प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यभराची एक सुंदर आठवण तिला दिली होती.
६ला पवई ला परत थोडं खाल्लं आणि मग आरे रोडने गोरेगाव चेक नाका शार्प ७ ला. म्हणजे परफेक्ट होत एकदम. तिला जरी सोड्लं तरी मी मात्र अजून तिथेच त्या पॉईंटवर होतो. तिचा अजूनही विश्वास नव्हता की आम्ही लोणवळ्याहून आलेलो होतो यावर.
घरी आलो, आंघोळ केली रिलॅक्स झालो. एकदा मेसेज करून विचारलं, बॅक पेन वगेरे??? ति म्हणाली की आहे थोडं पण वुड बी फाईन.
नंतर काही दिवसांनी प्रपोज केलं, अपेक्षेप्रमाणेच उत्तर मिळालं :). आता ते कसं, हे सांगेन सविस्तर पुढे कधीतरी.
सध्या वाट बघतोय तिची. ती माझी होईल ही खात्री आहेच. ती माझी, ती माझी म्हणतांना, मी तिचा कधी झालो तेच कळालं नाही. आणि झालो तो पण असा की, यापुढचे सगळे जन्म, फक्त ती आणि तिच्यासोबतंच.
दरवेळी ती विचारते की अरे काय हे.... आणि मी फक्त एवढंच म्हणतो, "तुमच्यासाठी काहीही"
Now i understand, "What can happen over COFFEE!!!!"
मस्त...डोळ्यांसमोर घडतंय सगळं
मस्त...डोळ्यांसमोर घडतंय सगळं असं वाटलं.
शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि लिखाणासाठी !
<< लग्नानंतर बाइकच काय कार जरी असली तरी अशी मजा येणार नाही>> +१००
****************************************************************************************************************
मेरे मन ये बता दे तू, किस और चला है तू ?
क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू ?
निवडक १०त !!
निवडक १०त !!
कसल गोड आहे हे अस सगळं
कसल गोड आहे
हे अस सगळं झाल्यावर कस काय अपेक्षित उत्तर मिळणार नाही बर................
माधव, हे वाचत असताना जर मी
माधव,
हे वाचत असताना जर मी ही कथा लिहिली असती तर कशी लिहिली असती हे डोक्यात येऊन गेलंच माझ्या!!!
स्मितहास्य, छान लिहिले आहे.
आठवणिंच्या राज्यात घेऊन गेलास
आठवणिंच्या राज्यात घेऊन गेलास लेका.
लग्ना आधि असले बरेच उद्योग केले आहेत.
पावसाळ्यात लोणावळा आणि नागांव (अलिबाग) हे तर फेव्हरेट स्पॉटस.
ती पण अशी बिंधास्त की मी बस म्ह्टल्यावर टुनकन उडी मारुन बाईकच्या मागच्या सिट वर पोहोचलेली असायची. का, कुठे, कधी परत येणार? असले प्रश्नच नाही. मग सगळा दिवस चिंब चिंब होऊन जायचा प्रेमाच्या वर्षावात.
उफ्फ. वो भी क्या दिन थे यार!!!
महत्वाच - मस्त लिहिलं आहेस
आभार मंडळी.. हे अस सगळं
आभार मंडळी..
हेतू हा होता की तिच्या आयुष्यभर आठवणीत राहील असं काहीतरी करावं.
हे अस सगळं झाल्यावर कस काय अपेक्षित उत्तर मिळणार नाही बर................>>>> रीया, पण अपेक्षीत उत्तर मिळावं हा हेतू अजिबात नव्हता बरं..
ती पण अशी बिंधास्त की मी बस म्ह्टल्यावर टुनकन उडी मारुन बाईकच्या मागच्या सिट वर पोहोचलेली असायची. का, कुठे, कधी परत येणार? असले प्रश्नच नाही.>>>>> क्या बात है बॉस. मग तर फुल्ल उनाड दिवस असतील ते तुमचे.
अर्थात काहीजणांना त्यांच्या भूतकाळात घेऊन जाऊन त्यांच्या काही चांगल्या आठवणी या माझ्या लेखाने उजळल्या गेल्या हे ही नसे थोडके...
(No subject)
अरे खरच खुपच छान लिहल
अरे खरच खुपच छान लिहल आहेस
सगळा प्रसंग डोळ्यासमोरुन गेला
गोड आहे लेखन. आणि ते शेवटचे
गोड आहे लेखन.
आणि ते शेवटचे वाक्य बहुतेक "देवयानी" वरुन इन्स्पायर झालेले वाटते आहे
खुपच छान... मला वाचताना व.पु.
खुपच छान... मला वाचताना व.पु. टच जाणवला
मस्त लिहीले आहे! आवडले!
मस्त लिहीले आहे! आवडले!
स्मितदा सगळ कित्ती मस्त जमून
स्मितदा सगळ कित्ती मस्त जमून आले आहे नाही का? कॉफी, बाईक, आवडत्या व्यक्तीची साथ, लोणावळ्या सारख थंड हवेच ठिकाण.......सगळ कस अगदी हळुवार, अगदी स्वप्नातल्या सारख फक्त एकच कमी आहे पावसाची ओल्या चिंब मन भिजवणार्या पावसाची!!!
मस्त फुलवली आहे कथा, छानच,
मस्त फुलवली आहे कथा, छानच, खुप आवडली.
छान!
छान!
मस्त !!! पुढील वाटचालीसाठी
मस्त !!!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
धन्यवाद मंडळी.. सगळ कस अगदी
धन्यवाद मंडळी..
सगळ कस अगदी हळुवार, अगदी स्वप्नातल्या सारख फक्त एकच कमी आहे पावसाची ओल्या चिंब मन भिजवणार्या पावसाची!!!>>> ह्म्म्.... पण पावसाचा गारवा एका गोळ्यावाल्याकडे जाऊन एक थंड गोळा खाऊन भागवला
खुप सुंदर लिहीलयत. आता ते
खुप सुंदर लिहीलयत.
आता ते कसं, हे सांगेन सविस्तर पुढे कधीतरी.
लवकरच लिहा.
तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
<< << लग्नानंतर बाइकच काय कार
<< << लग्नानंतर बाइकच काय कार जरी असली तरी अशी मजा येणार नाही>> +१
मस्तच लिहिलंय.
पु.ले.शु.
A Lot Can Happen Over
A Lot Can Happen Over Coffee>> True
स्मित, ललित मस्त! कॉफीच्या खमंग दरवळासारखे!!
खुप सुंदर लिहीलयत. आता ते
खुप सुंदर लिहीलयत.
आता ते कसं, हे सांगेन सविस्तर पुढे कधीतरी.
लवकरच लिहा. << Lihinyaarkah barach kahi aahe.... pan shabd apure padatil....mhanun aata itakach sangu shaken ki manapasun ekhadi gosht magitali tar dev ti gosht nakki deto....bhale thoda vel jast lagto... pan ti gosht nakki milate... ani devavar mazi puri shraddha aahe...<<
Thank u sooo much for your wishes......
>>याचा मराठी अनुवाद असा, (कोणालातरी माबोकर नसल्याने मराठी नही जम्या टायपायला :))
लिहिण्यासारखं बरंच काही आहे.... पण शब्द अपुरे पडतील... म्हणून आता इतकंच सांगू शकेन की मनापासून एखादी गोष्ट मागितली तर देव ती गोष्ट नक्की देतो.... भले थोडा वेळ लागतो... पण ती गोष्ट नक्की मिळते... आणि देवावर माझी पुर्ण श्रद्धा आहे...<<
थँक्यू सो मच फॉर युअर विशेस......
(आता इंग्रजीत हे कोणी टायपलं (माझ्या आयडीतून) हे सुज्ञाना मी काय सांगावं...........;))
(No subject)
सुरेख!
सुरेख!
स्मितहास्य.....लकी आहेस
स्मितहास्य.....लकी आहेस बाबा...नाहितर आम्च्या life मधे कित्येक पोरी CCD ची महाग कॉफी प्यायल्या आणि दुसर्या बरोबर केळवण खात निघून गेल्या...
:).....माबोकर....grammer बघू नका please!!
तुमच्यासाठी काहीही >> देवयानी
तुमच्यासाठी काहीही >> देवयानी या मालिकेतल वाक्य
पण कथा खुप छान
पण त्याचे स्टोरी परत कधीतरी.
A Lot can happen over a coffee, हे माझ्या ही बाबति खर ठरलेल वाक्य आहे
झकास...
झकास...
'तुमच्यासाठी कायपण' हे वाक्य
'तुमच्यासाठी कायपण' हे वाक्य आठवत राहिलं वाचताना. खुप छान लिहिलय.
मस्त लिहिले आहे.. गोड आहे
मस्त लिहिले आहे.. गोड आहे आठवण.. सरप्राई़ज असल्यामुळे.. लक्षात राहील.. देणार्याच्याही.. आणि कॉफी पिणार्याचाही..
आय हाय... मला आमचं लग्नं
आय हाय...

मला आमचं लग्नं ठरल्यावर नवर्याने अशीच एक दिवस पळवली होती... लग्नाला २४ वर्ष झालीत... तरीही त्या दिवशी नवर्यानं जमवलेले ब्राऊनी पॉइंन्ट्स अजून त्याच्या खात्यावर आहेत
स्मीतहास्यं, ... गोड आहे हे सगळं... अगदी अगदी तुमच्या मनासारखे गोळा होऊदेत तुमचेही ब्राऊनी पॉइन्ट्स... खूप उपयोगी पडतात लग्नानंतर
सुरेख.................. आम्हि
सुरेख..................
आम्हि ही ह्यांच्या ह्या बर्थडेला लोणावळा जमवला होता. वनडे ट्रीप. खुप मज्जा आली. जुलै एंडिग. तिथलं धुक आठवली कि नुसत्या गुदगुल्या होतात. त्याच्या मिठीत राहुन राजमाजी पॉईंट्ला खालेला गोळा, भुट्टा, शेंगा सगळचं कसं गोडाहुन गोड लागतं. स्वारी ते वेदर बघुन इतकी खुश झाली की सगळ मिळवल मी त्या एका क्षणात. कारण प्लेस आणि प्लान माझा होता. फक्त ड्राईव्ह तो करतं होता. काहीही प्रीप्लान्ड नव्हत. फुल ऑन सरप्राईझ होत त्याला. खुप एंजॉय केलं......................
लोणावळा इझ माय फेवरेट प्लेस........................
आमच कुलदैवत असल्याकारणाने आम्ही दरवर्षी तिथे जातो.
Pages