प्राचीन विद्यापीठे

Submitted by RISHIKESH BARVE on 11 June, 2012 - 12:54

रामायणाप्रमाणे भरताने [रामाचा भाऊ] भारतवर्ष दिग्विजय केल्यावर उत्तर भारतात दोन शहरे वसविली ' तक्ष ' नावाच्या मुलासाठी तक्षशिला आणि पुष्कल नावाच्या मुलासाठी गान्धारात [सध्याच्या अफगाणिस्तानात ] पुष्कलव्रत.
महाभारतात उल्लेख सापडतो की जनमेजयाने तक्षशिला येथे सर्पसत्र यज्ञ केला आणि मुनी वैशम्पायनानी व्यासरचित महाभारत जगाला प्रथम तक्षशिलेत ऐकवले.
इ.स. पूर्व ७०० मध्ये तक्षशिला हे शिक्षणाचे मोठे क्षेत्र असल्याचे उल्लेख शिलालेखात मिळतात ज्यात हे ज्ञानपीठ ६०० ते ७०० वर्षे भरभराटीत असून ज्ञान प्रदान करत आहे असे लिहले आहे.
तसेच या बाबतीत अतिशय जीव ओतून संशोधन केले आहे 'मोहमद रफिक मुघल ' या पाकिस्तानी पुरातत्व संशोधकाने.

थोडे विषयांतर :
तक्षशिला येथील वस्तुसंग्रहालायाची लिंक खाली देत आहे.त्यात खाली पुस्तकांची यादी पण आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Taxila_Museum

तसेच संशोधन परके लोक कसे करतात यासाठी गिल रहीम खान या ब्रिटीश [मूळ पाकिस्तानी ] याने तक्षशिला येथे मिळालेली नाणी आणि त्यातल्या त्यात कुशाण [इ.स. पहिले शतक]काळातली नाणी यावरच्या संशोधन प्रबंधाची लिंक देत आहे ,वेळ मिळाला तर गम्मत म्हणून चाळा ,आनंद मिळेल.
http://eprints.hec.gov.pk/4220/1/Comprehensive_Report_AA.pdf

फक्त तक्षशिला विद्यापीठाचे उदाहरण घ्या हे इ.स.पूर्व १४व्या शतकात अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडतात. सर्व साधरण आता ज्याला postgraduate studies म्हणतो ते तक्षशिला विद्यापीठात होत असत .इथे विद्यार्थी वयाच्या १६व्या वर्षी येत असे.वेद,वेदांगे,१८ विद्या ज्यात हत्तीयुध्द ,धनुर्विद्या ,शिकार आणि राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र इ.शिकविले जात असे.त्याशिवाय या विद्यापीठात आयुर्वेद,शल्यक्रिया,कायदा आणि घटना इ.विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम होता.
आर्य चाणक्य [इ.स.पूर्व ३४०] हा इथे प्राध्यापक होता आणि त्याने आपले अर्थशास्त्र इथे शिकविताना लिहिले.पाणिनी ज्याच्यामुळे व्याकरण आले तो पण इथे प्राध्यापक होता.
तक्षशिला विद्यापीठ हे oxford प्रमाणे बऱ्याच मोठ्या परिसरात होते जिथे वेगवेगळी गावे वेगवेगळ्या विषयाची colleges चालवत होते.बहुतेक सर्व प्राध्यापक आपला स्वताचे संशोधन करत असत.
विद्यार्थ्यांकडून काहीही शुल्क [ फी ] घेतली जात नसे .राहणे ,जेवणे, खाणे आणि शिकणे सर्व पूर्णतया निशुल्क होते.या विद्यापीठात परिक्षा नसत पण विषयाचे ज्ञान घोटून घेतले जात असे.
तक्षशिला विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तानातील भीर,सीरसुख,सीरकाप,धर्माजीका,जौलीयान आणि मोहरा या शहरातून पसरलेले होते.
---------------------------

तक्षशिला पाकिस्तानात गेले आणि आपले एक अतिशय महत्वाचे विद्यापीठ सध्याच्या आझाद काश्मीरमधले शारदापीठ.हे अतिशय महत्वाचे विद्यापीठ होते. इथे स्वतः आदी शंकराचार्य येऊन गेले आणि इथल्या विद्वानासमोर त्यांनी आपले ज्ञान दाखविल्यावर त्याना जगदगुरु ही पदवी आणि सर्वज्ञानपीठावर बसण्याचा अधिकार मिळाला. इथून त्यांनी शारदेची जी मूर्ती नेली ती श्रुन्गेरीला स्थापन करून शारादाम्बेचे मंदिर बांधले.आचार्य हेमचंद्र[इ.स.११००] ज्याने संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्हीची व्याकरणे लिहिली तो इथे येऊन इथली व्याकरणाची आणि जुनी संस्कृत पुस्तके खास परवानगी घेऊन अभ्यासून गेला.
शारदापीठ हे विद्यापीठ म्हणण्यापेक्षा अतिशय उच्च ज्ञानाचे केंद्र आणि अतिशय पुरातन आणि दुर्मिळ पुस्तकाचे संग्रहालय होते. चीनी प्रवासी ह्युएन संग [इ.स. ६०२] इथे राहून इथली बौध्द प्राचीन पुस्तके अभ्यासून गेला. इथे आयुर्वेदाचे संशोधन [Ph.D .च्या ही पुढच्या दर्जाचे.] शेकडो वर्षे चालू होते.शारदापीठ हे सध्याच्या भाषेत एक Research Laboratory and books & manuscript depository होती .हतभागी आपण की ही विद्यापीठे तर गमवून बसलोच पण त्याची स्मृतीही आपला समाज विसरला आहे.जर आपल्यामध्ये थोडेही ब्राह्मणत्व बाकी असले तर ही ज्ञान उपासना वाढवा,देश आपोआपच वर येईल....

---------------------------

पाकिस्तानात गेलेली दोन विद्यापीठे आपण बघितली आता बांगलादेशात गेलेले एक विद्यापीठ बघू.
बौध्द धर्माचे फार मोठे विद्यापीठ हे सध्याच्या बांगलादेशात नावगाव जिल्ह्यात पहारपूर इथे होते.त्याचे नाव होते " सोमपूर महाविहार " अर्थात जरी बौध्द राजांनी हे विद्यापीठ आपल्या आश्रया खाली चालू केले होते तरीही इथे बौध्द ,हिंदू आणि जैन या तीनही धर्माचा अभ्यास चालायचा सध्याचे बांधकामाचे अवशेष हे २७ एकर जमिनीवर पसरले आहेत .
या महाविहाराची स्थापत्यशैली ही भारतीय नसून पूर्णपणाने बाली,जावा आणि कंबोडिया इथली आहे त्यामुळे इथे तेथील भारतीय साम्राज्याच्या लोकाना वेगवेगळ्या विषयात प्रशिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ असावे असेही म्हणतात.पूर्ण भारतात ही स्थापत्यशैली फक्त या विहारात आहे......
हा विहार कधी बांधला हे माहित नाही इथे इतक्या हिंदू मूर्ती आहेत की हे आधी हिंदू विद्यापीठ असावे आणि नंतर राजे बौध असल्याने बौध्द विद्यापीठ पण झाले असावे. पण इथे दुसरा पाल घराण्यातला सम्राट धर्मपाल [इ.स.७८१ ते ८२१] याचे शिलालेख मिळाले आहेत.हे सगळे बांधकाम त्या काळात "जगतांग नेत्रैका विश्राम भूः " अर्थ पूर्ण जगाच्या डोळ्याला सुखविणारे असे मानले जात असे.
दीपंकर श्रीज्नन ज्याने बरीच बौध धर्माची पुस्तके तिबेटी आणि चीनी भाषेत भाषांतरीत केली तो इथेच राहून आपले काम करीत असे.९व्या ते १२व्या शतकात रत्नाकर शांती , महापंडीताचार्य बोधीभद्र,कालामःपाद , विरयेन्द्र आणि करुणाश्रीमित्र हे महापंडित इथे शिकवत आणि संशोधन करत होते.
मुसलमान राज्य आल्यावर हळू हळू याचा राजाश्रय जाऊन हे विद्यापीठ बंद पडले.
---------------------------

नालंदा विद्यापीठ जेंव्हा ऐन वैभवात होते तेंव्हा ह्युएन संग [इ.स ६०२ ते ६६४ ] इथे येऊन गेला होता त्याने लिहिलेली वर्णन वाचण्यासारखे आहे.
तो लिहितो की विद्यापीठाच्या इमारती ५६ एकरावर पसरल्या आहेत आणि त्यात १२,००० विद्यार्थी,१५१० शिक्षक आणि १५०० इतर नोकर होते.इथे तिबेट , चीन , जपान , कोरिया , सुमात्रा , जावा आणि श्रीलंका येथील विद्यार्थी होते. प्रवेश हा तोंडी परिक्षेनंतर होता.ही परिक्ष घेणारा जो पंडित होता त्याला "द्वार पंडित"असे म्हणत .संस्कृत मध्ये प्राविण्य ही अट होती कारण शिक्षण संस्कृतमध्ये होते.त्यामुळे चीनी आणि जपानी विद्यार्थी नालन्दाला येण्याआधी जावा अथवा बालीला जाऊन संस्कृत शिकत.
ह्युएन संग लिहितो की प्रवेश परिक्षेला बसणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यापैकी फक्त २० % आणि भारतीय विद्यार्थ्यापैकी फक्त ३० % पास होत असत.विद्यार्थ्याना रहाणे,जेवण,शिक्षण इ. सर्व मोफत होते.खालील अभ्यासक्रम उपलब्ध होते १] बौध्द धर्माची १८ शाखा आणि तत्त्वज्ञान २]वेद ,वेदांगे ३] जैन धर्म ४] सहा हिंदू दर्शने ५] पदार्थविज्ञान ६] रसायन शास्त्र ७] खगोलशास्त्र ८]ज्योतिष 9]आयुर्वेद आणि वैद्यक १०] प्रशासन आणि राज्यकारभार.
विद्यापीठाची वेद्शाला टेकडीवर बांधलेल्या उंच इमारतीत होती.
विद्यापीठात मुख्यत्वे भाषण,संभाषण,वादविवाद आणि चर्चा यावर भर होता,परिक्षेवर नाही.
तीन वाचनालये/पुस्तकालये होती ज्यांची नावे होती रत्नसागर, रत्ननिधी आणि रत्नरंजन.सगळ्यात मोठे वाचनालय ९ मजल्याचे होते.
बख्तियार खिलजीने अतिशय क्रूरतेने या विद्यापीठाचा नाश केला.पेर्शियन इतिहासकार मिन्हाज -इ -सिराज हा तबाकत -इ -नासिरी या पुस्तकात लिहितो की या निशस्त्र विद्यापीठात हजारो बौध्द साधुना जिवंत जाळले गेले आणि हजारोंचे मुंडके उडविले गेले.कारण बख्तियार खिलजीला फक्त हे सगळे मूर्तिपूजक इतकेच कळत होते.
विद्यापीठाची ही संकल्पना भारतातून अरबांनी बगदादला नेली आणि बगदाद ,स्पेन, इजिप्त इ. ठिकाणी पहिल्या अरब विद्यापीठांची स्थापन झाली आणि ही कल्पना पुढे युरोपियन लोकांनी अरबाकडून उचलली आणि १० व्या शतकानंतर युरोप मध्ये विद्यापीठे अरबांची नक्कल करून सुरुवात झाली.
आपल्याला जर अभिमान बाळगायचा असला तर या ज्ञानोपासनेचा बाळगा ,उगीच आपल्या पुर्वाजाना अणुबॉम्ब आणि विमाने माहिती होती अशा खोट्या आणि भ्रामक कल्पनाचा नाही.

---------------------------

जुन्या भारतीय विद्यापीठात ओदान्तपुरी अथवा उड्डाणपूरचे नाव फारसे कुणाला माहित नाही कारण बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ अति क्रूरतेने कत्तली करत नष्ट केले या शिवाय फारशी माहिती उपलब्ध नाही .पण चीनी प्रवाशांनी लिहुन्ठेव्लेल्या माहितीप्रमाणे या विद्यापीठात १२,००० विद्यार्थी होते.
हे उड्डाणपूर मगधाची राजधानी होते.आता हे गाव बिहार शरीफ या नावाने ओळखले जाते, कारण इथे" शेख शरफुद्दीन याह्या मणेरी " या सुफी अवलीयाचा दर्गा आहे आणि फार मोठा उरूस [जत्रा] दर वर्षी भरतो.
कालाय तस्मे नमः ,दुसरे काय ......
---------------------------

सौराष्ट्रात भावनगरजवळ पश्चिम भारतातले सगळ्यात मोठे विद्यापीठ " वल्लभी " या गावी होते.इ.स. ४५३ ते ४६७ या काळात इथला राजा जैन होता आणि त्याने धर्मचर्चा करण्यासाठी जैन अभ्यासकाची मंडळ [मीटिंग ] बोलाविली ज्या चर्चेतून श्वेतांबर जैन पंथाचा उदय झाला.
मैत्रक या बौध्द राजघराण्याने [इ.स. ४७५ ते ७६७ ] वल्लभी हे शहर आपली राजधानी बनविली आणि तेथे विद्यापीठ केले.
नालंदा हे महायान बौध्द पंथाचे केंद्र होते तर वल्लभी हे हीनयान पंथाचे.
चीनी प्रवासी हुएन संग लिहितो,
वल्लभी हे फार मोठे आणि श्रीमंत शहर आहे.इथे कमीतकमी १०० तरी कोट्याधीश नगरशेठ आहेत.
इथल्या विद्यापीठाखाली गावातली १०० colleges आहेत ज्यात ७००० विद्यार्थी शिक्षण घेतात.
यात बौध्द आणि हिंदू धर्म ,प्रशासन ,राज्यकारभार,रसायन ,गणित याचे उच्च शिक्षण दिले जाते.महत्वाचे विषय होते नीती[ political science,Statesmanship,] वर्ता [business and agriculture],administratio
n,theology,law,economics and accountancy...
या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याना देशभरातील राज्यात उच्च नोकरी मिळत असे जसे IAS ओर I .I .T .
या राज्यातील प्रमुख बंदर" खंबात " होते त्यामुळे फार मोठा व्यापार परदेशाशी चालत असे आणि हुएन संग लिहतो की खूप चैनीच्या गोष्टी या परदेशातून आयात केल्या जात असत

गुणमती आणि स्थिरमती हे दोन महान पंडित इथे शिकवत होते. .......

---------------------------
संदर्भ- श्री Ajit Pimpalkhare & Harsha Parchure in कोब्रा Vs देब्रा ...फक्त टोमणेगिरी ·

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेच एक मोठे विद्यापीठ मांडू येथे देखील होते. नंतर त्याचा "अशरफी मदरसा" झाला.. धारच्या पवारांनी मालवा जिंकल्यावर तिथले राममंदिर परत उभारले, पण विद्यापीठ काही सुरु झाले नाही.

छान धागा..