लो कॅलरी बनाना ब्रेड

Submitted by मनःस्विनी on 5 September, 2010 - 00:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ कप कणिक,
३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी,
१/२ कप कनोला ऑइल्/वेजीटेबल ऑइल/क्रिस्को,
१/२ कप घट्ट दही,
२ मध्यम अंडी(१ व्हाईट १अक्खे (लो फॅट आहे ना)),
१ चमचा बेकींग सोडा, १ चमचा बेकींग पावडर,
सिनामन,
वॅनिला इसेन्स,
अर्धा कप साखर/मेपल सिरप,

क्रमवार पाककृती: 

( मी आधी इथे लिहिलेली कारण ब्लॉग वर संकलित करायची होती पण बर्‍याच मायबोलीकरांनी विचारली म्हणून परत इथे लिहिली.)

आधीच ओवन ३७५ वर ओवन चालून करून ठेवा.
१) कणीक बेकिंग पॉवडर व बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या.
२) केळी सोलून 'हातानेच' मॅश करून घ्यायची. त्यातच सिनामन, मीठ किंचीत व दही टाकून मिसळायचे. मग साखर टाकून मग ऑईल टाकून एकजीव करा व बाजूला ठेवायचे.
३) एक आक्खे अंडे वेगळ्या बोल मध्ये फेटून घ्यायचे दर दुसरे अंड्याचे पांढरे फक्त घ्यायचे. इसेन्स टाकून दोन्ही मस्त फेटून घ्यायचे व वरील मिश्रणात मिक्स करा.
४) हळूहळू कणीक मिक्स करून घ्या व अलगद हाताने ढवळा मिश्रण. आता त्यात अक्रोड, बेदाणे वगैरे टाका.
ओवन मध्ये २५ मिनीटे बेक करा. सुइ घालून पहा झालाय का मग थंड होवून काढा. एक स्लाईस बरोबर वॅनीला आईसक्रीम व स्लाईसवर चॉकलेट सॉस टाका, मस्त लागते. हे खाल्ले तर लो कॅलरी रहाणार नाही मग. Happy

चॉकलेट सॉस:
कुठल्याही आवडती डार्क चॉकलेट घेवून अर्थ बॅलेन्स मध्ये विरघळून मग त्यात साखर व क्रीम/एवापोरेटेड मिल्क पॉवडर जराशीच घालून डबल बॉइलर मध्ये विरघळून घ्यायचे. जर लहान मुलांना द्यायचे नसेल तर ह्या मिश्रणात जरासे थंड झाले की त्यातच cognac नाहीतर expresso टाकायची. एकदम रिच टच येतो साध्या केकला. थंडीत एकदम मस्तच. Happy
कोणी केलाच हा ब्रेड तर फोटो टाका इथे. मला आवडेल. माझे फोटो हरवलेत ह्या ब्रेडचे.

अधिक टिपा: 

१.मिश्रण खूप घट्ट झालेच तर जरासे दूध मिक्स करा.
२. बे़कींग सोड्याला वास येतो असे बर्‍याचदा एकले म्हणून त्याल ऑप्शन म्हणून " डबल अ‍ॅक्टींग बेकींग पॉवडर वापर". ती वापरत असाल तर फक्त वरील मिश्रणात दिड चमचाच घ्या.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे पाकृ Happy

यात थोडा अक्रोड किंवा बदामाचा भरड चुरा घालायचा मस्त नटी फ्लेवर येतो Happy

बनाना ब्रेड बरोबर कॅरॅमल सॉस किंवा व्हॅनिला कस्टर्ड किंवा दोन्ही पण खुप मस्त लागत Happy

आशु, कुरिअर करते.

मनु, तुझ्या इतर रेसिपीज पण जमतील तर टाक ना इथे. नाहीतर ब्लॉग सुरू करुन लिंक तरी दे Happy

धन्यावाद सगळ्याना.

हळूहळू टाकते इथे सर्व रेसीपी. पण ब्लॉगचे म्हणाल तर त्याला लॉगीन करूनच ५-६ महिने झालेत. ४-५ रेसेपी लिहिल्या मग कामामूळे फिरत होते व आता बरे नसल्याने बहुधा वेळ लागेल. त्याआधी इथेच लिहिते रेसीपी व ब्लॉग झाला पुर्ण की देते लिंक.

मनःस्विनी, तुझ्या बर्याच रेसिपी वाचल्या आहेत आणि काहि करूनहि पाहिल्या आहेत. सगळ्याच रेसिपी छान असतात तुझ्या. मागे एक eggplant hummas ची रेसिपी दिली होतीस ती देशिल का परत? मी करुन बघावी म्हणुन खुप शोधली पण सापडत नाहीये..

दिप्ती, तू हे म्हणतेस का?
http://www.maayboli.com/node/12332

http://www.maayboli.com/node/4983
(तुला विपू कशी बघायची माहीती आहे का? नाही तिथे दिली नाही कारण मला तरी मी नवीन असताना विपू माहित न्हवती काय प्रकार तो. ):)

..

..

ही कृती लिस्ट् वर आहे....झेपणेबल वाट्तेय....:)
वरचा फोटु पण मस्तच आहे.....
मागे फु ने वरून एक झुकिनी ब्रेड केला होता....
अवांतर या प्रकाराला सरळ केक का नाहि म्हणत? चव अल्मोस्ट तशीच असते निदान ब्रेड इतकी तरी अगोड नसते...असो ब ब दे मे छो छो बा...;)

phphtYRJLAM.jpg

छान झाला ब्रेड. फक्त एक प्रश्न हा खूप स्पाँजी होत नाही का? माझा थोडा दडसल्यासारखा झालाय पण चव मस्स्स्त Happy धन्यवाद इतक्या सोप्या रेसिपीसाठी.

छान झालाय. मेपल सिरप वापरल.थोडा कमी गोड झालाय. पण ब्रेकफास्टसाठी मस्तच.