Submitted by सुप्रिया जाधव. on 11 June, 2012 - 09:23
मनाजोगते एवढे हेच झाले....
नको वाटले, नेमके तेच झाले!
असे वाटले उत्तरे गवसली, ....पण.....
दिल्या उत्तरांचे नवे पेच झाले
मिळवले, घटवले, गुणाकार केला...
समिकरण बिघडले नि भलतेच झाले.
किती कोळसे राख झाले, जळाले.....
चमकत्या हि-यांचेच शिरपेच झाले
धपांडी कुणी घातली ऐनवेळी?
'प्रिया' राज्य खेळात अर्धेच झाले
-सुप्रिया.
गुलमोहर:
शेअर करा
वाह सुप्रियाताई जबरदस्त गझल
वाह सुप्रियाताई
जबरदस्त गझल (............चझल )
सगळेच शेर खूप खूप आवडले
मतला आणि खासकरून माक्त्यासाठी दंडवत स्वीकारा ...........
___________/\____________
("समिकरणा"त एक लघु-गुरू कमी-जास्त झाला आहे का........ लयीत म्हणता येत नाहीय जरा अडखळल्या सारखे होतेय .........)
धन्यवाद
धन्यवाद वैवकु...
<<<<("समिकरणा"त एक लघु जास्त झाला आहे का तपासून पाहावे असेल तर दुरुस्त करावे .........)>>>>
स मिक रण
ल गा गा
ओके ओके सुप्रियाताई धन्यवाद
ओके ओके सुप्रियाताई
धन्यवाद ........
आधी अगदीच चुकले आहे असे लिहिले मग माझा प्रतिसाद एडीट केला तोवर आपला प्रतिसाद आलेला पाहिला
पण लयीत वाचता येत नाही असे का होतेय मग .......तज्ञान्ना विचारीन म्हणतो माझी शंका दूर होईल इतकेच
मनाजोगते एवढे हेच
मनाजोगते एवढे हेच झाले....
नको वाटले, नेमके तेच झाले! >> वाह! आवडला
समिकरणात एक लघू जास्त असावा.. पुलेशु
स मिक रण ल गा गा >> अरेच्चा!
स मिक रण
ल गा गा >> अरेच्चा! होच की..!! पण लयीत वाचताना थोडं अडखळायला झालं म्हणुन वाटलं असं.. असो..
असे वाटले उत्तरे गावली,
असे वाटले उत्तरे गावली, पण.....
दिल्या उत्तरांचे नवे पेच झाले
>>>
गावली ऐवजी गवसली चालणार नाही का?
धन्स निंबुडा ...आणि हो तुझा
धन्स निंबुडा ...आणि हो तुझा फंडा वापरला अन गझल दिसली एकदाची "नविन लेखन" मधे
स मिक रण । बि घड ले
स मिक रण । बि घड ले । नि भल ते । च झा ले.
ल लल लल । ल लल गा । ल लल गा । ल गा गा
ल गा गा । ल गा गा । ल गा गा । ल गा गा
लघु गुरू सूट प्रामाणाबाहेर झाली आहे म्हणून अक्षरसंख्या कितीतरी अधिक( १२ ऐवजी १६ )
यतीस्थान भरकटले आहे असे वारंवार झाले आहे (ज्या अक्षरसंख्येवर यायला हवे तिथे नाही इतरत्र आहे )
त्यामुळे अक्षरगणवृत्ताची(भुजंगप्रयात) नैसर्गिक लय बिघडली आहे.
या गझलेत इतरत्र असा प्रकार एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे त्यामुळे ही ओळ तेवढी खटकते
उपाय : अक्षरगणवृत्तात लगावली सोबत अक्षरसंख्या तितकीच महत्त्वाची आहे (यतिस्थानही अक्षर संख्येवर ठरते शब्दावरून नव्हे )पण प्रत्येक वेळी ती पाळणे सहजसाध्य नसते म्हणून बव्हंश कवी आशाप्रकारच्या र्हस्वदीर्घाची सूट मान्य करू लागले(यतिस्थानाचीही)
........आताशा ही सूट असून नियम नाही हे लक्षातही येत नाही अशी स्तिथी झाली आहे
असो उपरोक्त ओळीत किमान दोन 'लल' चे 'गा' असे शुद्धरूपांतर करावेत अक्षरसंख्या दोनेक अक्षरांनी कमीजास्त झालेली चालेल अगदीच ४ / ५ अक्षरे नको
असो !!!
शेवटी हा फक्त एक मतप्रवाह आहे नियम नाही
या ओळीपुरती ही गझल मात्रावृतात आहे बाकी अक्षरगणवृतात.... असेही म्हणता येतेच म्हणा
लोभ असावा राग नको
प्लीज गैर्समज करून घेवू नये ही कळकळीची विनन्ती !!
आपला नम्र
वैवकु
असे वाटले उत्तरे गवसली,
असे वाटले उत्तरे गवसली, ....पण.....
दिल्या उत्तरांचे नवे पेच झाले
मस्त!!
वैवकुंशी सहमत.
समिकरण बिघडले नि भलतेच
समिकरण बिघडले नि भलतेच झाले.
या ओळी बरोबरच
असे वाटले उत्तरे गवसली, ....पण.....
या ओळीतही थोडीसी ओढाताण होते आहे..
बाकी गझल आवडली.
सुप्रिया _/\_ संपूर्ण गझल
सुप्रिया _/\_
संपूर्ण गझल आवडली!!
सर्वच शेर छान!! आवडली गझल
सर्वच शेर छान!!
आवडली गझल
धन्यवाद!
धन्यवाद!
ठिकठाक...!
ठिकठाक...!
धपांडी कुणी घातली
धपांडी कुणी घातली ऐनवेळी?
'प्रिया' राज्य खेळात अर्धेच झाले
>>>
व्व्वा व्व्व्वा
किती वर्षांनी हा शब्द ऐकला आणि किती अर्थपूर्णरीत्या तो या शेरात आला आहे
वा वा
मस्त्......संपुर्ण गझल
मस्त्......संपुर्ण गझल आवडली......
सुप्रिया..सुंदर गझल!! आवडली .
सुप्रिया..सुंदर गझल!! आवडली .
अप्रतीम.. आम्ही तुमचे फ्यान
अप्रतीम..
आम्ही तुमचे फ्यान झालो.
नविन प्रतिसादकांचे मनःपुर्वक
नविन प्रतिसादकांचे मनःपुर्वक धन्यवाद!
छान
छान
एकदम मस्त
एकदम मस्त