फ्रेंच ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 23 May, 2012 - 03:58

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच

अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उप्स राफा....:( घोडा नं दोन रेसमध्ये आल्यामुळे आता सपोर्ट ज्योकोकडे.....:P
उद्या मात्र गो मारिया......:)

<एकंदरीत राफाबरोबर कोणीही फायनला आले तरी या रविवारचा फ्रेंच ओपन फायनलचा दिवस सार्थकी लागणार हे नक्की>

मुकुंद यांचे हे वाक्य वाचताना ते शुक्रवारबद्दल लिहायला कसे विसरले असे वाटले होते. पण आता त्यांना दूरदृष्टी लाभली आहे हे समजले.

निओ स्पोर्ट्स वर मॅच बघणे बोssर आहे. युरो कप पण निओवरच. विम्बल्डन तरी स्टारवर आहे का? मर्डॉक्स इथला गाशा गुंडाळणार आहेत का?

फेडरर फारच किरकोळीत हरला की ! काहीच झेपत नव्हतं.
आता बास करा म्हणावं.. Wink

पोव्हाबाई चांगल्या खेळ्ल्या पाहिजेत. हीच संधी आहे.. !

करियर स्लॅमबद्दल शारापोव्हाचे अभिनंदन !
एकंदरीत शारापोव्हा मस्त खेळली. जोरदार बॅकहँड आणि फोरहँड विनर्स मारले. शॉट मारल्यानंतरचा किंवा सर्व्ह केल्यानंतरचा रिकव्हरी टाईम खूप कमी होता. त्यामुळे रॅलीज चांगल्या झाल्या... एकंदरीत ढेपाळलेगिरी केली नाही!

इर्रानीचेही उपविजेतेपदासाठी अभिनंदन....

मोनिका सेलेस कित्ती दिवसांनी दिसली आणि कसली क्युट दिसत होती.. Blush Proud

कुंथाकुंथी>>>>> Lol

योको स्ट्राईक्स बॅक!

नदालवर ब्रेक मध्ये कॅमेरा क्लोज अप घेतला नाही पाहिजे आजिबात. मला तर त्याला पुरुषांच्या ट्रंक्स च्या एक दहा जोड्या भेट म्हणून पाठवायची फार इच्छा आहे! स्पगेटी अंडरवेअर घालून कशाला ते शिंचं नॅशनल टेलिविजन वर ग्रोसपणा करायचा?

मारिया .................विजेतेपदा सोबत.......
.
.
maria.jpg

मॅच बोअर चालली होती काल. दोघांनाही लय सापडत नव्हती. त्यात पावसाचा इतका व्यत्यय Sad एकदमच कंटाळवाणा अंतिम सामना झाला हा, आज कोणीही जिंकलं तरी.

मारियाचा ड्रेस असा काय आहे? Uhoh मैदानावरचा बरा होता ह्यापेक्षा!

>> मॅच बोअर चालली होती काल. दोघांनाही लय सापडत नव्हती.
Uhoh

मॅच सॉलिड इंटरेस्टिंग मोड मधे आहे. फायनल मॅच जशी असायला हवी तशीच! इट इज अँड विल बी अ‍ॅन अल्टिमेट बॅटल ऑफ नर्व्हस! थोड्या थोड्या वेळानं पारडं फिरत होतं. अजून काय पाहीजे?

बर Happy

मॅच बोअर चालली होती काल. >>>> अनुमोदन! राफा आणि ज्योकोमधली ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल, राफा आणि फेडरर मधल्या विंबल्डन फायनल्स, फेडरर आणि रॉडीकची विंबल्डन फायनल, राफा आणि फेडररची गेल्या फ्रेंच ओपनची सेमी फायनल किंवा फॉर दॅट मॅटर आत्ताची ज्योको-त्सोंगा ह्या सगळ्यांच्या तुलनेत कालची मॅच ठिक ठिकच होती.. पण ज्योको आणि नंतर राफा फार चुका करत होते. विनर्स पेक्षा एरर्स जास्त होत होत्या.. कॉर्ट खराब झाल्यानंतर राफाची हालचाल मंदावली होती !

एकंदरीत स्कोर बघता इंटरेस्टींग असेल पण क्वालिटी ऑफ टेनिस ठिकठिकच होती.. ! Happy

Pages