यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.
मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच
अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
आता ज्योको सर्व्हिंग फॉर मॅच
आता ज्योको सर्व्हिंग फॉर मॅच आहे का? ३-२ वरून अचानक ५-३ दाखवायला लागलेत! तसं खरंच असेल तर ग्रेट! गो ज्योको!
ज्योको जिंकला, तेही स्ट्रेट
ज्योको जिंकला, तेही स्ट्रेट सेट्स मध्ये!!!
ज्योको, हार्दिक अभिनंदन! गो ज्योको!
बरं आता रवि वारची मॅच पॅसिफीक
बरं आता रवि वारची मॅच पॅसिफीक वेळेत कुठे पहाता येईल ह्याबद्दल कोणाला काहि माहिती आहे का?
गो राफा!!
लोला, सांत्वन ..
लोला, सांत्वन ..
सोमवारी भेटू.
सोमवारी भेटू.
ज्योको जिंकला! डॉक्टर श्रीपाद
ज्योको जिंकला! डॉक्टर श्रीपाद खेडेकरांची कमाल!
-गा.पै.
उप्स राफा.... घोडा नं दोन
उप्स राफा....:( घोडा नं दोन रेसमध्ये आल्यामुळे आता सपोर्ट ज्योकोकडे.....:P
उद्या मात्र गो मारिया......:)
काल कच्चा खाल्ला फेडीला
काल कच्चा खाल्ला फेडीला जोकोनी...
<एकंदरीत राफाबरोबर कोणीही
<एकंदरीत राफाबरोबर कोणीही फायनला आले तरी या रविवारचा फ्रेंच ओपन फायनलचा दिवस सार्थकी लागणार हे नक्की>
मुकुंद यांचे हे वाक्य वाचताना ते शुक्रवारबद्दल लिहायला कसे विसरले असे वाटले होते. पण आता त्यांना दूरदृष्टी लाभली आहे हे समजले.
निओ स्पोर्ट्स वर मॅच बघणे बोssर आहे. युरो कप पण निओवरच. विम्बल्डन तरी स्टारवर आहे का? मर्डॉक्स इथला गाशा गुंडाळणार आहेत का?
फेडरर फारच किरकोळीत हरला की !
फेडरर फारच किरकोळीत हरला की ! काहीच झेपत नव्हतं.
आता बास करा म्हणावं..
पोव्हाबाई चांगल्या खेळ्ल्या पाहिजेत. हीच संधी आहे.. !
जोकोच्या मैतरणीला टपलीत मारून
जोकोच्या मैतरणीला टपलीत मारून गपगुमान बस असे सांगावेसे वाटते असे आधी कुणी लिहिले असेल तर त्यास अनुमोदन.
मयेकर
मयेकर
शारापोव्हाचे अभिनंदन. मयेकर
शारापोव्हाचे अभिनंदन.
मयेकर
तुम्ही मला अनुमोदन दिले आहे.
हे पहा - http://www.maayboli.com/node/31836?page=2
धन्यवाद.
करियर स्लॅमबद्दल शारापोव्हाचे
करियर स्लॅमबद्दल शारापोव्हाचे अभिनंदन !
एकंदरीत शारापोव्हा मस्त खेळली. जोरदार बॅकहँड आणि फोरहँड विनर्स मारले. शॉट मारल्यानंतरचा किंवा सर्व्ह केल्यानंतरचा रिकव्हरी टाईम खूप कमी होता. त्यामुळे रॅलीज चांगल्या झाल्या... एकंदरीत ढेपाळलेगिरी केली नाही!
इर्रानीचेही उपविजेतेपदासाठी अभिनंदन....
मोनिका सेलेस कित्ती दिवसांनी दिसली आणि कसली क्युट दिसत होती..

तयारी झाली का ????
तयारी झाली का ????
चालूये..
चालूये..
वा वा मस्तच ! आमच्या इथे पण
वा वा मस्तच !
आमच्या इथे पण स्नॅक्स, चहा, कॉफी सगळं तयार आहे.
कुंथाकुंथी सुरू झाली ..पहिला
कुंथाकुंथी सुरू झाली ..पहिला सेट गेला .. गो ज्योको!
जा रे जा रे पावसा तुला देते
जा रे जा रे पावसा
तुला देते पैसा
पैसा ठरू दे खरा
पाउस लांबच बरा
कुंथाकुंथी>>>>> योको
कुंथाकुंथी>>>>>
योको स्ट्राईक्स बॅक!
नदालवर ब्रेक मध्ये कॅमेरा क्लोज अप घेतला नाही पाहिजे आजिबात. मला तर त्याला पुरुषांच्या ट्रंक्स च्या एक दहा जोड्या भेट म्हणून पाठवायची फार इच्छा आहे! स्पगेटी अंडरवेअर घालून कशाला ते शिंचं नॅशनल टेलिविजन वर ग्रोसपणा करायचा?
राफा नडाल को गुस्सा क्यों आता
राफा नडाल को गुस्सा क्यों आता है?
<नॅशनल टेलिविजन वर> नॅशनल?
<नॅशनल टेलिविजन वर> नॅशनल? वर्ल्ड टेलिव्हिजन म्हणा
तसं काहीतरी करणारा तो काही एकटाच नाही.
मारिया
मारिया .................विजेतेपदा सोबत.......

.
.
मॅच बोअर चालली होती काल.
मॅच बोअर चालली होती काल. दोघांनाही लय सापडत नव्हती. त्यात पावसाचा इतका व्यत्यय
एकदमच कंटाळवाणा अंतिम सामना झाला हा, आज कोणीही जिंकलं तरी.
मारियाचा ड्रेस असा काय आहे?
मैदानावरचा बरा होता ह्यापेक्षा!
मारियाला मुक्ता बर्वे (राधा)
मारियाला मुक्ता बर्वे (राधा) भेटली असेल............म्हणुन तिन तीन रंगातुन एकच ड्रेस बनवला
>> मॅच बोअर चालली होती काल.
>> मॅच बोअर चालली होती काल. दोघांनाही लय सापडत नव्हती.

मॅच सॉलिड इंटरेस्टिंग मोड मधे आहे. फायनल मॅच जशी असायला हवी तशीच! इट इज अँड विल बी अॅन अल्टिमेट बॅटल ऑफ नर्व्हस! थोड्या थोड्या वेळानं पारडं फिरत होतं. अजून काय पाहीजे?
मॅच सॉलिड इंटरेस्टिंग मोड मधे
मॅच सॉलिड इंटरेस्टिंग मोड मधे आहे.>> +१ मी वाट पहातेय परत कधी सुरु होणार याची. भारी चालू होती मॅच काल.
बर
बर
मॅच बोअर चालली होती काल. >>>>
मॅच बोअर चालली होती काल. >>>> अनुमोदन! राफा आणि ज्योकोमधली ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल, राफा आणि फेडरर मधल्या विंबल्डन फायनल्स, फेडरर आणि रॉडीकची विंबल्डन फायनल, राफा आणि फेडररची गेल्या फ्रेंच ओपनची सेमी फायनल किंवा फॉर दॅट मॅटर आत्ताची ज्योको-त्सोंगा ह्या सगळ्यांच्या तुलनेत कालची मॅच ठिक ठिकच होती.. पण ज्योको आणि नंतर राफा फार चुका करत होते. विनर्स पेक्षा एरर्स जास्त होत होत्या.. कॉर्ट खराब झाल्यानंतर राफाची हालचाल मंदावली होती !
एकंदरीत स्कोर बघता इंटरेस्टींग असेल पण क्वालिटी ऑफ टेनिस ठिकठिकच होती.. !
Pages