वितंडगड (तिकोना) - भाग १

Submitted by राज जैन on 8 June, 2012 - 04:06

लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे.

समोर तुंग तर, उजवीकडे दिसणारे लोहगड आणि विसापूर! व मध्ये पवनाचा भलामोठा जलाशय! अत्यंत रम्य असे ठिकाण असून तिकोनापेठ गावातून चालत जरी गेले तरी गडावर पोहचण्यासाठी एक तास पुरेसा आहे. गड चढण्यास खूपच सोपा आहे (पावसाळ्यात तेवढाच धोकादायक देखील). गडावर पाहण्यासारखे खूप काही आहे व गडाची निगा राखण्याचे काम शिवदुर्ग संवर्धन ही संस्था अतिशय उत्तम प्रकारे करत आहे.

tikona1.jpgलांबून दिसणारा तिकोना, याच्या अगदी समोर तुंग आहे.

tikona2.jpgतिकोनावर चढाई मार्ग.

tikona3.jpgचढाईच्यावेळी डावीकडे येणारी खोलवर दरी, येथे पाऊलवाट थोडी धोकादायक आहे,मुरूम असल्यामुळे निसरडी आहे ही वाट.

tikona4.jpgपहिल्या टप्पातील प्रवेशद्वार (भुयारी मार्ग असे देखील याचे नाव आहे.)

tikona5.jpgवेताळ दरवाजाच्या वरील भाग.

tikona6.jpgवेताळ दरवाजा

tikona7.jpgवेताळ मंदिर अवशेष

tikona9.jpg"पनवती"वर पाय देऊन उभा असलेला चपेटदान मारूती.

tikona10.jpgtikona11.jpg
गडावर ५ लेणी आहेत, त्यातील एक लेणं अपुर्ण असून ४ पुर्ण आहेत. आता तेथे तुळजाभवानी मंदिर आहे. समोर स्वच्छ पाण्याचं टाकं देखील आहे.

tikona12.jpgसुस्थितीतील चुन्याचा घाना.

tikona13.jpgबालेकिल्ला चढाईमार्ग

tikona14.jpgtikona15.jpgtikona16.jpgगडावर प्रवेश

क्रमशः

गुलमोहर: 

राज जैन, खूपच छान प्रचि!
लोहगड आणि विसापूर पण दाखवा ना तिकोन्यावरून कसे दिसतात ते! Happy
आ.ण.,
-गा.पै.

मस्त Happy