संगणकावर सोप्पी मराठी लिहिणे

Submitted by आदित्य खरे on 7 November, 2011 - 00:39

आपल्या संगणकावर सोप्या मार्गाने मराठी लिहिण्यासाठी युक्ती :
http://www.google.com/ime/transliteration/ या वर जाऊन मराठी भाषा निवडावी. 32 bit निवडून Download IME वर टिचकी मारावी...!!!
Download पूर्ण झाल्यावर IME install करावे. जर installation झाले नाही तर परत वर नमूद केलेल्या site वर जाऊन 64 bit select करावे आणि download करावे.

IME application work करण्यासाठी आपल्याला siddhanta.ttf लागेल. हा font http://siddhanta.svayambhava.org/siddhanta.ttf या site वर गेल्यावर आपोआप download होईल.
या font ला आपल्या control panel वरच्या Fonts फोल्डर मध्ये paste करा.

IME install झाल्यावर तुम्हाला तुमच्या taskbar वर खालच्या उजव्या कोपऱ्यात एक language bar दिसेल. जर तो alreay तिथे असेल तर ठीक आहे नाहीतर Taskbar वर right-click करून Toolbars मध्ये जाऊन Language Bar निवडा. आता त्या बार वरच्या EN ला click करून मराठी निवडा.
आता तुम्हाला एक छोटासा अ लिहिलेला बर दिसेल, त्या वरील सगळ्यात शेवटच्या option " open menu" ला निवडा आणि Suggestion font मध्ये जाऊन akshar unicode निवडा (हे siddhanta चे टोपण नाव आहे).
मग झाले तुमचे काम सरळ MS Word किवा Notepad उघडा language bar मध्ये जाऊन MA निवडा आणि लिहिणे सुरु करा. तुम्ही इंग्लिश मध्ये जो शब्द type कराल तो मराठी मध्ये तुम्हाला दिसेल उदाहरण: maayboli---मायबोली, Marathi---मराठी......
थोडक्यात तुम्ही इंग्रजी font वर mobile वर मराठी SMS लिहीत त्या प्रमाणे.....

अधिक मदती साठी : http://www.google.com/ime/transliteration/help.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Download पूर्ण झाल्यावर IME install करावे. जर installation झाले नाही तर परत वर नमूद केलेल्या site वर जाऊन 64 bit select करावे आणि download करावे.

IME application work करण्यासाठी आपल्याला siddhanta.ttf लागेल. हा font http://siddhanta.svayambhava.org/siddhanta.ttf या site वर गेल्यावर आपोआप download होईल.
या font ला आपल्या control panel वरच्या Fonts फोल्डर मध्ये paste करा.

IME install झाल्यावर तुम्हाला तुमच्या taskbar वर खालच्या उजव्या कोपऱ्यात एक language bar दिसेल. जर तो alreay तिथे असेल तर ठीक आहे नाहीतर Taskbar वर right-click करून Toolbars मध्ये जाऊन Language Bar निवडा. आता त्या बार वरच्या EN ला click करून मराठी निवडा.
आता तुम्हाला एक छोटासा अ लिहिलेला बर दिसेल, >>>>>

EN ला click करून ... छोटासा अ लिहिलेला दिसतो... ति थे click होत नाहि.. परत EN दिसतो....( माझा PC WINDOWS EXP आहे )

जिज्ञासुंकरता उपयुक्त माहिती आहे Happy (मला नाही, कारण मी यातले काहीच वापरत नाही Sad )
पण असो.
शीर्षक वाचून इकडे आलो, तेव्हा शीर्षक वाचल्यावाचल्या खरे तर झक्किन्ची आठवण होऊन, >>> "संगणकावर सोप्पी मराठी लिहिणे" याकरता वेगळा धागा कशाला हवा, पूर्वी मायबोलीवर जसे नुस्ते रोमन स्क्रिप्ट मधे मनाला येईल त्या स्पेलिन्गा करीत, तसेच मिन्ग्लिश नामक धेडगुजरी प्रकारात लिहीले तरी पुरेसे आहे की"<<< असे झक्किन्नी आधीच येऊन सान्गितले आहे की नाहि ते तपासायला खरे तर आलो होतो. Proud
वाचतायकाहो झक्की तुम्ही? हजेरी द्या! Happy

मस्त आहे..............पण मी इथे मायबोलीवर लिहितो............मग कॉपी पेस्ट माझ्या वर्ड फाईल मधे करतो....... ही जरा प्रोसेस मला सोप्पी वाटते Happy

नाही........ दिसत....आणि दिसले तरी Arial Unicode MS हा फँट सिलेक्ट करायचा त्यात बघायचे.....मग दिसेल Happy

एक शन्का आहे, मराठी/संस्क्रुत मी पूर्वीच उतरवुन घेतले होते मात्र मायबोली/बरहा हे पर्याय असल्याने त्याकरता वापरले नाहीयेत. परन्तु अन्य भाषान्चेही उतरवुन घेतलेत की कधी उपयोगी पडतील, असुद्यावेत जवळ. तर मुद्दा असा की, सर्व/अनेक भाषान्चे इन्स्टॉल केलेले चालते का? (याक्षणि हापिसातल्या पीसीवर कोणतीच इएक्ससी रन करण्यास बन्दी असल्याने इथेच प्रयोग करुन बघु शकत नाही.

दुसरे असे की तो सिद्धान्त फॉण्ट उतरवणे गरजेचे आहेच का? एरिअल युनिकोड असेल तर काम भागणार नाही का?
धन्यवाद.

आदित्य खरे,

उत्तम सूचनाक्रम! मीही गूगल मराठी आयेमी वापरतो. 'विंडोज एक्सपी'वाल्यांसाठी एक सूचना. ती म्हणजे language optons.

1. Please go to : Control Panel --> Regional and Language Options
2. Select 'Languages' tab.
3. Tick the box for 'Install files for complex script and...'
4. Then click the 'Details' button in 'Text services and input languages'. A new window with 'Text services and input languages' pops up.
5. You shouls see Marathi as a language in 'Installed Services' box. If you son't, you need to 'Add'. Rest is self explanatory. Click 'ok' to return to 'Text services and input languages'.
6. Then click 'Language Bar' button in 'Preferences' area.
7. Make sure that the box 'Show the Language Bar on Desktop' is ticked. Click ok to return to 'Text services and input languages' window.
8. Now choose 'Advanced' tab. MAke sure the option 'Turn off advanced text services' is not ticked.

यातले काही पर्याय दिसंत नसल्यास मशीन रीबूट करावे. विंडोज विस्टा किंवा ७ असल्यास साधारणत: वरील पर्याय उपलब्ध असावेत. मात्र ते वेगळ्या प्रकारे अवतीर्ण होतील (अ‍ॅक्सेस कदाचित वेगळ्या प्रकारे होतील).

मला वाटतं shrushti14@gmail.com यांची हीच समस्या आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>IME install झाल्यावर तुम्हाला तुमच्या taskbar वर खालच्या उजव्या कोपऱ्यात एक language bar दिसेल. जर तो alreay तिथे असेल तर ठीक आहे नाहीतर Taskbar वर right-click करून Toolbars मध्ये जाऊन Language Bar निवडा. आता त्या बार वरच्या EN ला click करून मराठी निवडा.------------------हे होत नाहीये
आता तुम्हाला एक छोटासा अ लिहिलेला बर दिसेल, >>>>>

EN ला click करून ... छोटासा अ लिहिलेला दिसतो... ति थे click होत नाहि.. परत EN दिसतो....( माझा PC WINDOWS EXP आहे )
>>
जमत नाहीयेमाझा विन्दो ७ आहे

नुकतेच माझ्याकडे वर्ड मधे देवनागरीत लिहिलेला एक लेख आला होता त्याचा फॉन्ट होता मिलेनिअम पुजा. मी तो फॉन्ट download करून install केला आणि ती फाईल उघडली तेव्हा लेख निट वाचता आला, पण जेव्हा मी तो लेख Ctrl+A करून "मंगल रेग्युलर" फॉन्ट निवडला तेव्हा देवनागरीत न दिसता गार्बेज दिसू लागले, जेव्हा मिलेनिअम पुजा निवडला तेव्हा पुन्हा निट दिसू लागले. असे का ? एका देवनागरी फॉन्ट मधे लिहिलेले दुसर्‍या देवनागरी फॉन्ट मधे निट दिसत नाही का ?

मॅक वापरण्यार्‍यांसाठी या सारखी कोणती उपयुक्त संगणकप्रणाली उपलब्ध आहेत का? >>
System Preferences -> Language and Text -> Input Sources -> Select Devanagari and Devangari QWERTY

मग वरच्या टास्क बार मधून जेव्हा हवे तेव्हा "Input source" US English च्या ऐवजी devanagari select करायचा.

महेश.. दोन फॉण्ट वेगवेगळ्या लोकांनी तयार केलेले असल्याने त्यात एकाच अक्षराचा ascii code वेगवेगळा असतो.. त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो.. श्री लिपी, लोकसत्ता फॉण्टफ्रीडम ह्यांच्या मराठी फॉण्टला पण हाच प्रॉब्लेम येतो.. एका फॉण्टमधे असलेले लिखाण दुसर्‍या फॉण्टमध्ये गारबेज दिसते...
इंग्रजी अक्षरांच्या ascii values जश्या ठराविक आहेत तश्या अजून मराठीसाठी झालेल्या नाहियेत बहुतेक..

गुगल IME इन्स्टॉल केल तरी ते प्रोसेस कम्प्लीट झाली असं सांगत पण ते कुठेच दिसत नाहीये. इथे दिलेले सगळे उपाय करून झालेले आहेत मी एक्स पी वापरतो कृपया कुणी उपाय सुचवेल का?? नाहीतर एका चांगल्या ट्रांसलिटरेटरला मुकाव लागेल मला.

हिम्सकूल, धन्यवाद, पण असे असेल तर वेगळ्या फॉन्ट मधे टाईप करण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही ना ? Sad

अलीकडील बरहा व्हर्शन्स सगळे पेड आहेत. नॉर्मली बरहा १० मिनिटे मोफत चालते. पुन्हा ६०० सेकन्द डिसेबल होते पुन्हा १० मिन. चालते. याला उपाय काय?

याला उपाय म्हणजे तुमच्याकडे जे व्हर्जन आहे ते अन इनस्टॉल करणे, अगदी रजिस्ट्रीमधे जाऊन बरहाच्या सगळ्या एन्ट्रीज काढून टाकणे. आणि पीसी रिस्टार्ट करून जुने व्हर्जन (९.०) इन्स्टॉल करणे.

महेश सध्य तरी दुसरा काही मार्ग नाही... फॉण्ट तयार करणार्‍यांनी योग्य वेळीच काळजी घेतली असती तर तो प्रश्न आला नसता.. पण सध्या काही पर्याय नाही..

अतीशय उत्तम व्हर्जन आहे.
(फुकट ते सर्वोत्तम)
नवे घ्यायच्या फंदात पडू नका...

>>> (फुकट ते सर्वोत्तम) <<<<
तुम्हीच म्हणताय ना हे इब्लिसराव? Proud मी लक्षात ठेवणारे, याचा सन्दर्भ द्यायची वेळ येईलच कधीनाकधीतरी! Wink

मी जेव्हा windows10 download केले तेवहा मायबोली वरिल काही पाने देवनागरी लिपीत दिसत नाहीत. काय करु ?