तुम्हाला आवडलेलं लेखन, मायबोलीबाहेरच्या मित्रमंडळींना सांगायची सोय.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवरचं आवडलेलं लेखन, मायबोलीकर वेगवेगळ्या पद्धतीने मित्रमंडळीना कळवत असतातच. आता ते थोडं सोपं झालंय. प्रत्येक लेखनाखाली आता फेसबुक आणि गुगलवर टिचकीसरशी आवडलेलं लेखन कळवायची आणि अगोदर किती लोकांना ते आवडलंय ते पहायची सुविधा उपलब्ध आहे.

या सुविधेसाठी मायबोलीवर प्रवेश करायची (लॉगीन) गरज नाही. त्यामुळे जे मायबोलीकर नाहीत किंवा वाचनमात्र आहेत त्यांनाही लेखन आवडले तर कळवता येईल. फेसबुकावर किंवा गुगल मधे मात्र प्रवेश करावा लागेल.

मायबोलीवरच्या इतर सुविधांप्रमाणे याही सुविधेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि मायबोलीकरांचं तुम्हाला आवडलेलं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी असं आवाहन तुम्हा सर्वांना करतोय.

त्यामुळे आता नुसतं प्रतिसादात "माझं पण प्लस १" किंवा "अगदी सुपर लाईक" न म्हणता प्रत्यक्षातच ते करता येईल. आणि तुम्ही स्वतःच ते लेखन केलं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची आणखी एक संधी तुम्हाला उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

@aschig
जवळ जवळ सगळ्या !
ज्या पानांवर मायबोलीकरांकडून लेखन होतं त्या सगळ्या. मायबोलीवरची काही पाने ही संगणकाकडून लिहली जातात त्या पानांवर नाही. उदा. "नवीन लेखन" हे पान. किंवा "गुलमोहरची" अनुक्रमणिका. या पानांवर ही सुविधा नाही.

वाह...

धन्यवाद.

'लाईक्स' कोणी केले आहेत हे पण पाहता येईल का?
त्याचप्रमाणे एखादे ऑटो पान जिथे कोणत्या पानाला किती लाईक्स आहेत हे दिसेल? (सॉर्टेड)

(भटाला दिली ओसरी ...)

प्रशासक,

या सुविधेबद्दल आपले आभार! हेच प्रतिसादांच्या बाबतीतही करता येईल का?

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : तंबूतल्या उंटाची गोष्ट आठवल्यास राग मानू नये. Wink

छान आहे सुविधा. कधी कधी लेखन खुप आवडलेले असते पण प्रतिक्रियेत लिहिण्यासारखे खास काही नसते.
त्यावेळी हा पर्याय वापरता येईल.

Pages