Submitted by निशिकांत on 15 May, 2012 - 00:51
मजला फुलावयाला जमले कधीच नाही
चुरगाळले कळीला सजले कधीच नाही
पदरास शुभ्र माझ्या दिधला कलंक ज्यांनी
लुटले मला असे की हसले कधीच नाही
उदरात माउलीच्या ठरवून वार केले
बिनजन्मताच सरले उडले कधीच नाही
मज घातल्यात बेड्या इतक्या परंपरेच्या !
कुजले, थकून गेले उडले कधीच नाही
वनवास भोगणार्या सीतेवरीच शंका !
पुरुषोत्तमा मना हे पटले कधीच नाही
म्हणतात देव धावे मदतीस भाविकांच्या
निघते कशास दिंडी? कळले कधीच नाही
चटके दिलेस देवा म्हणते मनी तरी मी
"ऋण ईश्वरा तुझे रे फिटले कधीच नाही"
असता जिवंत, माझ्या कबरीस खोदले मी
दुसर्यास त्रास देणे रुचले कधीच नाही
"निशिकांत" दु:ख माझे दडवून ठेवले मी
व्रत मौन पाळण्याचे तुटले कधीच नाही
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
गुलमोहर:
शेअर करा
वाह वाह अत्यंत
वाह वाह अत्यंत सुरेख.......
वनवास भोगणार्या सीतेवरीच शंका !
पुरुषोत्तमा मना हे पटले कधीच नाही
म्हणतात देव धावे मदतीस भाविकांच्या
निघते कशास दिंडी? कळले कधीच नाही>>>>>>>>हे तर अप्रतिम.........
असता जिवंत, माझ्या कबरीस
असता जिवंत, माझ्या कबरीस खोदले मी
दुसर्यास त्रास देणे रुचले कधीच नाही >>> व्वा..! खूप खूप आवडला.
म्हणतात देव धावे मदतीस
म्हणतात देव धावे मदतीस भाविकांच्या
निघते कशास दिंडी? कळले कधीच नाही>> रोखठोक चांगला शेर
म्हणतात देव धावे मदतीस
म्हणतात देव धावे मदतीस भाविकांच्या
निघते कशास दिंडी? कळले कधीच नाही>>
ग्रेट शेर ..........................काय दर्जेदार खयाल आहे हा...................
_______/\________
सर्वांचे अभार प्रतिसदासाठी..
सर्वांचे अभार प्रतिसदासाठी..