लिम्बीच शेत आणि बन्धार्‍याच पाणी

Submitted by limbutimbu on 25 June, 2008 - 07:15

इथल्या माझ्याच बर्‍याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.

१ हा इथे असा तम्बु उभारला होता
Photo0424.jpg

२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
Photo0434.jpg

३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
Photo0446.jpg

४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
Photo0436.jpg

५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
vlcsnap-128434.jpg

६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
vlcsnap-44789.jpg

आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. Happy
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्‍या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.

_____xXx______

July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्‍या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
Photo0174.jpgPhoto0180.jpgPhoto0182.jpgPhoto0184.jpgPhoto0187.jpgPhoto0189.jpgPhoto0207.jpgPhoto0210.jpgPhoto0185.jpg

गुलमोहर: 

इथल्या माझ्याच बर्‍याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.

१ हा इथे असा तम्बु उभारला होता
Photo0424.jpg

२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
Photo0434.jpg

३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
Photo0446.jpg

४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
Photo0436.jpg

५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
vlcsnap-128434.jpg

६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
vlcsnap-44789.jpg

आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. Happy
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्‍या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.

वा एकदम झकास.

एक (मुर्ख) शंका - त्या पोत्यातील माती तशीच रहाते का? वाहुन नाही जात? व पाण्याच्या प्रेशरमुळे ती पोती पडत नाही का?

<<त्या पोत्यातील माती तशीच रहाते का? वाहुन नाही जात? व पाण्याच्या प्रेशरमुळे ती पोती पडत नाही का?>>
मलाही तीच शंका आली. पाणी पडल्यावर मातीची पोती टिकुन राहातील का?
तुमचा प्रयत्न आणि मेहनत ह्याला सलाम!

लिंबू आणि परिवारास सलाम!
काय चिकाटीचं, कष्टाचं आणि मुख्य म्हणजे किती महत्वाचं काम करताय तुम्ही.
आम्ही सध्या पेपरात वाचतो या शेततळ्यांबद्दल आणि मनातल्या मनात कौतुक आणि आश्चर्य व्यक्त करतो.
तुमचं शेततळं तुम्ही स्वता: मेहेनतीनं तयार केलं आहे हे वाचून/पाहून खरंच खूप कौतुक वाटलं.

लिंबू, हे तंत्र कुठले ? त्याचा खास फायदा काय (खर्च कमी, जास्त क्षमता असे काही ?)
सविस्तर वाचायला आवडेल.
शिवाय पावसाळ्यानंतर जमा झालेल्या पाण्याचा पण फोटो पाहिजे.

चला; आता येत्या पावसानंतर श्री व सौ लिम्बू याना " माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जात... गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत..." अस गाण म्हणताताना आपल्याला बघायला मिळेल. Happy माझ्या एका साहेबांनी अशीच शेती करायची ठरवली. त्यांचे वडील म्हणाले आधी मला एक साधा एक तीन फूट बाय तीन फूट खड्डा खणून दाखव मग शेती करायची की नाही ते ठरव!! Lol

लिम्बू दांपत्याचे एक अतिशय कष्टाचे काम पूर्णत्वाला नेल्याबद्दल अभिनंदन. मी अलिबाग हून मस्त पैकी वाल घेउन येतो झकास पोपटी करू तुमच्या शेतात. Happy

लिम्बुभाव तयार केलेला प्लॅन पुर्णत्वास नेल्याबद्दल अभिनंदन.
मी लकी होतो. लिम्ब्या शेतावर जायच्या आदल्याच दिवशी त्याच्या घरी अचानकच गेलो.
लिम्ब्याने सर्व पुर्वतयारी दाखवली होती. (मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारुन घेतला होता. एवढं कष्ट कस झेपायच म्हणुन.)

बाकी गाडीने काही किस्सा केला की नाही?? Happy

अरे हो मे रैवारी अचानकच लहर आल्याने पाबेघाटातुन तोरण्याच्या पायथ्याला जाउन आलो.
तेव्हा राजगड नजरेसमोरच होताच. तुझी आठवण काढलेली.
अचानक येवुन तुला भेटाव वाटलेल पण वेळेअभावी परतलो.

प्रतिसादाबद्दल सर्वान्ना मनःपूर्वक धन्यवाद Happy अशाने हुरुप येतो, अन अस काम करत बसणारे आपण अगदीच काही वेडे नाही आहोत याची खात्री पटत जाते.
>>> त्या पोत्यातील माती तशीच रहाते का? वाहुन नाही जात? व पाण्याच्या प्रेशरमुळे ती पोती पडत नाही का? <<<
शन्का रास्त आहे. उत्तर जरा सविस्तर आहे. हे तर केवळ जाड भिन्तीचे तळे आहे, तिन वर्षापुर्वी मी चक्क ओढ्याला आडवा बान्ध अशा माती भरलेल्या पोत्याने घातला, तो यशस्वीही झाला जेव्हा की मोठ मोठे धोन्डे पाण्याने वाहून जातात. अर्थात यशस्वी होण्यामागे तान्त्रिक कारणे वेगवेगळी आहेत.
या पोत्यात माती भरलेली आहे, तोन्डे बन्द आहेत, एकमेकान्वर रचल्याने दाब आहे. यावर पाऊस पडल्यावर पाणी आत जिरेल, माती फुगेल पण पोत्यान्चा दाब असल्याने जेव्हा ती वाळेल, तेव्हा ती आपसुक घट्ट दगडासारखी बनलेली असेल. पोत्यान्ची वीण घट्ट असल्याने माती वाहून जाणार नाही.
मात्र, पुढील वर्षभर उन्हात राहिलेली पोती उन्हामुळे जीर्णशीर्ण होऊन उन्हात मोकळ्या भागाचा भुगा होईल. अशा वेळेस, आतिल दगडासारखी टणक बनलेली मातीचे आकारमान जसेच्या तसे राहील अशी अपेक्षा. त्यास साथ मिळावी म्हणून पावसाळ्यातच, तळ्याच्या बाह्यबाजुच्या पोत्यात निरनिराळे वेल्/झाडे रुजवायची ज्याच्या मुळान्मुळे पोत्यातील मातीला भक्कमपणा येईल व झाडोर्‍यामुळे पोत्यावर सावली राहिल असा बेत आहे. तळ्याच्या आतिल बाजुस मात्र मला काही काम्/खर्च करावाच लागेल. यावर्षी घातलेला कागद पुढील वर्षापर्यन्त टिकणार नाही. काही एक स्वतन्त्र शक्कल लढवावीच लागेल.

>>>> मी आणि तुम्ही असे जायचे का एकदा? नुसता तंबू टाकून गप्पा झोडत रात्र काढायला? <<<
पाण्याची सोय पुरेशी झाली, तर फक्त आपणच का? समान्तर विद्रोही सम्मेलनान्सारखे समान्तर वविशिबिर तिकडे करु Proud (माझ्या डोक्यात हे कित्येक वर्षान्पासून आहे)

>>> कुठे आहे तुमचे शेत? <<<
लिम्बीच्या गावाला, जन्गलाशेजारी Proud (राजगडच्या पायथ्याला, सुवेळामाची खाली)

>>> लिंबू, हे तंत्र कुठले ? त्याचा खास फायदा काय (खर्च कमी, जास्त क्षमता असे काही ?) <<<<
माझ्या माहितीमधे, १९८५/८६ दरम्यान सन्घाचे तळजाई येथे शिबिर झाले होते, तिथे खड्डे करुन, आतिल मातिची भर बाजुला कठड्यासारखी करुन त्यात प्लॅस्टिक अन्थरुन पाण्याचे साठे तयार केले गेले होते. अशा तात्पुरत्या सोई सर्रास केल्या जातात. सिमेण्टची रिकामी पोती डबर/वाळू वगैरे भरुन सीमारेषेवर / ओढ्यात्/चिखलात जायची यायची वाट कर्ण्याकरता वगैरे वापरलेली बघतोच. यावरुनच सिमेण्टची रिकामी पोती वापरुन जरा मोठ्या भिन्ती करण्याचे योजिले.
फायदा म्हणाल, तर स्वस्त कच्चा माल, टाकाऊतुन टिकाऊ, पर्यावरणाची हानी नाही, स्वावलंबन शक्य, मशिनरी वगैरेचि आवश्यकता नाही, लोखण्ड/सिमेण्ट वगैरेचा खर्च नाही, उपलब्ध साहित्यातुनच निर्मिती शक्य वगैरे बाबी आहेत. कुणीतरी मला सान्गितले की आनन्दवनात म्हणे गाड्यान्चे जुने टायर वापरुन भिन्ती उभारल्यात पाण्याच्या साठ्यासाठी, अर्थात त्यान्नी त्यात सिमेण्ट्/वाळूचे मिश्रण टाकलय असे ते सान्गत होते.

मल्ली, जरुर जाऊ. ऑगस्ट्/सप्टेम्बरमधे!

>>> बाकी गाडीने काही किस्सा केला की नाही?? <<<<
न होऊन कसे चालेल? Proud मी गाडी जागेपर्यन्त नेली होती, अशा वाटेने ज्या वाटेवर आजवर केवळ कधीमधी ट्रॅक्टर व जेसीबीच फक्त गेलेत. त्यातिल एका जागी यू टर्न वर टर्न घेतल्यानन्तरचा चढ गाडी न चढल्याने मागे जाऊ लागली, ती जास्त मागे गेली अस्ती तर दरीत कोसळली अस्ती. त्या क्षणी मी देखिल मनात घाबरलो होतो की आता गाडी अन मी दोन्हीही इतिहासजमा होणार! प्रत्यक्षात तसे झाले नाही, व ओढ्यातील वाळू, खाचखळगे, झाडेझुडपे, घळी, तीव्र चढ उतार, नान्गरलेली शेते, भुसभुशीत/मुरमाड जमिन, फोडीव दगड टाकलेले मार्ग वगैरे कशालाच न जुमानता गाडी जागेवर पोचली, अन सुरक्षित परतही आली.
पुन्हा, सर्वान्ना धन्यवाद.
वेळ मिळेल तसे अनेकानेक तपशील आहेत ते लिहीनच Happy

वा लिंबुजी उत्तम काम चालु आहे, हि जमिन तुम्हाला भरभरुन दान देवो हि शुभेच्छा Happy

नम्र सुचना - शेततळ्याचा तळात मातीच असल्यामुळे पाणी जास्त काळ टिकणे कठीण असते.
त्यावरजर प्ल्यास्टिकचा पेपर अंथरला तर मात्र ते पाणी जिरण्याला अटकाव होईल व जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल.

क्रुपया थोडी माहीती द्या,
शेततळयाची कल्पणा ही पावसाळ्या नंतरच्या शेती साठी आहे का ?

इनमिनतिन, त्यात परवडण्याजोगा प्लॅस्टिक कागद अन्थरणारच आहे.
हे तळे प्राथमिक प्रायोगिक स्वरुपात तयार केलय, अपेक्षा अशी की जेव्हा पाऊस ओढ देतो, पण पिकाला पाणी तर हवे, तेव्हा सायफनने पाणी घेता येईल. जास्त तळी तयार करता आली तर मात्र दुसर्‍या गव्हा/हरबर्‍याच्या पिकाला त्याचा उपयोग होइल, अन तरीही, ठिकठिकाणी वृक्षलागवड करण्यास उपयोग होईलच होईल.
दिनेशभाऊ, खोपोली/कर्जतच्या तिकडे सगुणा पार्क आहे, आपले एक ववि तिथे झाले होते, तिथे त्यान्नी, नदिकिनारी मोठमोठी तळी खोदून तीच माती बाजुला रचुन खोलगट भागात भारीचे इम्पोर्टेड प्लॅस्टिक अन्थरुन त्यात मत्स्यशेती केली आहे. सान्गायचा मुद्दा असा की प्लॅस्टिक अन्थरुन पाणी साठवणे ही काही नविन कल्पना नाही. Happy
याव्यतिरिक्त;
सिमेण्टची रिकामी पोती भरुन निरनिराळ्या ठिकाणी त्यान्ची भर घालणे हे देखिल नविन नाही.
मजुरी परवडत नाही म्हणून स्वतःच काम करणे हे देखिल नविन नाही.
खिशात पैसे नाहीत तर उपलब्ध साहित्याद्वारेच अपेक्षित बाबी प्रत्यक्षात उतरविणे हे ही नविन नाही. (पैशे अस्ते तर तम्बुवजाझोपडीऐवजी कोकणातले जाम्भा चिरे वापरुन घर नस्ते बान्धले? Proud )
अन शहरातील सुखासिन जीवन सोडून, पेड लिव्हचे पैशे बुडवुन अर्थात त्या न विकता रजा घेऊन, आडबाजुला जाऊन उन्हातानात कष्टात/गैरसोईत(?) रहाणे हे देखिल तितकेसे नविन नाहीच नाही.
अन खर तर, नवरा जे करतोय त्यात पूर्णपणे झोकुन देऊन बायकोने साथ देणे हे देखिल पुराणातील दाखले बघता Wink नविन नाहीच, नाही का?
तरीही, या सर्व काळात मला बरेच नाविन्य अनुभवायला मिळाले. Happy यथावकाश सान्गिनच.
पण एक गम्मत सान्गतो, की मी राहुटी उभारुन तिथेच राहुन दुसरे दिवशी काही कामाने गावात उतरल्यावर, काळजीने म्हणा वा अजुन कशाने, पण गडावर पर्यटकान्ना नुकतेच दोन वाघ दिसलेत हे सान्गायला चारपाचजण पुढे आले हे ही खरे.
या जन्गलात वानरे, साप, कोल्हे, तरस, रानडुक्करे इत्यादी नियमितरित्या तर वाघ वगैरे क्वचित आढळतात किम्बहुना, ज्या ओढ्याला आम्ही पोत्यान्चा बान्ध घातला त्या ओढ्याचे नावच मुळी वाघणीचा ओढा असे आहे. त्याच ओढ्याजवळ असणार्‍या लिम्बीच्या शेताच्या वरच्या अन्गाला जन्गलात असणार्‍या व जिच्या नावाने "गुन्जण" खोरे प्रसिद्ध झाले त्या गुन्जवणी देवीच्या दर्शनाला वाघ अधुनमधुन येतो अशी स्थानिकान्ची श्रद्धा आहे.
पक्षान्च्या विपुल जाति बघायला मिळाल्या, दुर्दैवाने क्यामेरा नसल्याने फोटो काढता आले नाहीत.

मल्ली, जरुर जाऊ. ऑगस्ट्/सप्टेम्बरमधे!
बघा शबुद दिलाय्सा तुम्ही. येकदा की मागे लागलो की मंग चिडायचं नाय... Proud

आनन्दवनात म्हणे गाड्यान्चे जुने टायर वापरुन भिन्ती उभारल्यात पाण्याच्या साठ्यासाठी, >>> मग असेच टायर त्या सर्व पोत्यांना मिळुन बांधले तर ती पोती सुरक्षीत राहतील शिवाय जागची हलणार नाहीत बहुदा. (माझा एक अंदाज)

शेततळयाची कल्पणा ही पावसाळ्या नंतरच्या शेती साठी आहे का ?>> +१ हो खरेच नक्की याचे बांधकाम कशासाठी आहे?

प्ल्यास्टिकचा पेपर अंथरला तर मात्र ते पाणी जिरण्याला अटकाव होईल व जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल.>>> पाणी जिरले तरी ते त्याच जमिनीत असल्याने इतर झाडांच्या वाढीला फायदा होईल हेही नसे थोडके. Happy

अरे व्वा लिंबुभौ, अगदि राजगडाच्या पायथ्यालाच गाव आहे तुमच, आमच्याही फेर्‍या होत असतात राजगडावर भटकंतीच्या निमित्ताने, कधीमधी आलोच तर नक्की बघू तुमचा पाझरतलाव...:स्मित:

खुद्द महाराजांची, आणि जीजामाऊलीची पावले ज्या भुमीला लागलीत, तिथले मुळ रहिवाशी आहात याचा हेवा वाटतो.

Pages