प्रवासातील गमती जमती

Submitted by जिप्सी on 11 May, 2012 - 01:33

"प्रवास" आयुष्यातील एक अविभाज्य घटक. खरंतर आयुष्यच एक प्रवास आहे. एकदाही प्रवास न केलेला मनुष्य विरळाच. प्रवास मग तो कुठलाही असो अगदी घरापासुन कामाच्या ठिकाणी केलेला प्रवास, भटकंती, महाराष्ट्रात, देशात, परदेशात केलेला प्रवास. याच प्रवासात अनेक गमती जमती घडत असतात. प्रवासातील क्षण कधी आनंद देऊन जातात तर कधी दु:ख. याच प्रवासात भेटलेल्या काही व्यक्तीही, काही क्षण कायमच्या स्मरणात राहतात. तर मग याच प्रवासातील आंबटगोड आठवणी इथे शेअर करायच्या आहेत.

या धाग्यावर संपूर्ण प्रवासवर्णन लिहिणे अपेक्षित नाही तर छोटे मोठे किस्से सांगायचे आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सीजी तुम्हीच आधी श्रीगणेशा करा. इथे पहले आप वाले माबोकर खूप आहेत.

सो, तुम आगे बढो ह्म तुम्हारे साथ है.

तीन दिवसांचा पावसाळी ट्रेक करुन भिमाशंकरहून परतत असताना एस्टी त सगळ्यात मागिल सीटवर अम्हा चौघांना जागा मिळाली . पुढच्या १० मिनिटान त्या सीट वर आम्ही चौघेच उरलो बाकीचे उठुन पुढे उभे राहिले .
एस्टी फूल्ल होती, पावसात भिजून भिजून अंगाचा जाम मशाळ वास येत असणार पण आम्हाला तो जाणवत नव्हता ,
बिचारी जनता............( कि आम्ही ?)