केरळ रोड ट्रीप- माहिती हवी

Submitted by नंदिनी on 11 May, 2012 - 05:32

आम्ही येत्या पावसाळ्याच्या सुरूवातीला अथवा शेवटी केरळ फिरण्यासाठी जात आहोत. सध्या मी मंगरूळात असल्याने आम्हाला इथून कार घेऊन निघणे (आणि त्यात मल्लू ड्रायव्हर घेणे) जास्त सोयीस्कर पडणार आहे.

कुणी कृपया केरळमधे मस्ट सी असणार्‍या गोष्टीबद्दल माहिती देइल का? नेटवरून मिळणारी बहुतांश माहिती हाऊसबोटसंदर्भात आहे. आम्हाला हाऊसबोट अथवा बॅ़कवॉटर्सचे काहीच आकर्षण नाही. Happy तसेच, पावसाळ्यामधे इथली रोडची स्थिती वगैरे बद्दल कुणी सांगू शकेल का? राहण्यासाठी लॉज अथवा होम स्टे वगैरेचे अनुभव देखील सांगा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला हाऊसबोट अथवा बॅ़कवॉटर्सचे काहीच आकर्षण नाही
>>
मग उरलेलं केरळ आणि कोकणात काहीच फरक नाहिये
उरलं फक्त मुण्णार आणि तिरुआनंतपुरम (त्रिवेंद्रम)
पण तमिळनाडुत गेलात तर बरच काही आहे
उटी,कोडाईकॅनॉल्,मधुराई,कन्याकुमारी,रामेश्वर
त्यामुळे मला वाटतय तमिळनाडु ट्रिप मग मुन्नार, त्रिवेंद्रम करुन एर्नाकुलम वरुन परत येता येईल Happy

नंदिनी.. केरळ मध्ये मुन्नार, पोनमुडी अशी काही थंड हवेची ठिकाणे आहेत.. कोचिन, त्रिवेंद्रम, आणि तिथूनच खाली कन्याकुमारी हेही बघता येईल... साधारण राऊंड ट्रीप प्लॅन केल्यास वेगळ्या रस्त्यावरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाता येईल.. त्यातही एका मल्लु मित्राला विचारून अजून माहिती देतो.. पावसाळ्यात रस्ते बर्‍यापैकी असतात.. मी ऐन पावसाळ्यातच होतो तिथे...