म्हैसूर शहर

Submitted by अस्मानी on 8 May, 2012 - 00:29

मला प्लीज कुणी म्हैसूर शहरातील पब्लिक ट्रन्स्पोर्ट विषयी माहिती देउ शकेल का? शिवाय अ‍ॅज टुरिस्ट हे शहर छान पहाण्यासाठी किती दिवस पुरेत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हैसूरसाठी लोकल डेली बस पास आहे, तसेच कार रेन्ट करु शकता. १ दिवसात पण म्हैसूर बघून होत आणि ४ दिवसात पूर्ण म्हैसूर पाहू शकता.
शिवाय अ‍ॅज टुरिस्ट हे शहर छान पहाण्यासाठी किती दिवस पुरेत ?>>> नाहि समजल.
ksrtc chi 1 day म्हैसूर ट्रिप आहे. ksrtc चा ह्व तर फोन नंबर देऊ शकते.
तुम्हि कुठून जाणार आहात???

आम्ही पुढच्या आठवड्यात Bangalore & Ooty ला जणार आहोत. म्हैसूर cancel करावे अस विचार होता कारण Vrindavan Garden मधे आता पहिल्यासारखी मजा रहिली नाही असे समजले.

ते खरे आहे का?

Vrindavan Garden मधे आता पहिल्यासारखी मजा रहिली नाही असे समजले. >>>
नताशा, अगदी खरं आहे. मी लहान असताना वृंदावन गार्डन सुंदरही होतं आणि तेव्हा अशा गोष्टी फार पहायला मिळायच्या नाहीत त्यामुळे त्याचं अतिव कौतुक होतं. आता म्युझिकल फाउंटन्स गणपती मंडळं सुद्धा बनवतात. तेवढीच मोठी आणि सुंदरही. वृदावनमधे खुप जास्त आणि एकत्रित आहेत, पण तिथल्या पाण्याला घाण वास येतो. कचर्‍यासारखी गर्दी असते आणि बरोबर वयस्कर व्यक्ती असतील तर जास्त चालायला लागतं तेही जमत नाही.

मैसुरचा पॅलेस मात्र अप्रतिम सुंदर आहे. गाइड घेतला तर पैसे जातात पण इतक्या बारिकसारिक गोष्टी कळतात. आपण आपलं पहाताना तेवढी माहिती मिळत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या राहुन जातात. मी तर फक्त पॅलेस पहाण्यासाठीही मैसुरला जाणं रेकमेंड करेन. एवढा सुंदर आहे.

चामुंडी हिल वगैरे अजुन काही ठिकाणंही पहाण्यासारखी. ( या काही ठिकाणांची नावं ऐकताना भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' ची आठवण होते. :))

मनिमाऊ आणि वैनिल धन्यवाद.

दोन्ही पॅलेस बघण्यासाठी मैसुरला नक्की जाऊ

या शिवाय ,न चुकता, सोमनाथ देऊळाचा समूह व तिबेटन मोनॅस्ट्री पहा. मैसूर झू अप्रतिम. मैसूर बेण्णे दोसे नक्की खा तिथल्या दासप्रकाशात, फिलोमिना चर्च पहा

तिथला पब्लिक ट्रन्स्पोट खुपच छान आहे. कार रेन्टची गरजच नाहि. सग्ळिकडे बस जातात आणि खुप आहेत. बिनधास्तपणे जा.

हो रेव्यु. तिबेटन मॉनेस्ट्री बरीच पुढे कुर्ग रोडवर कुशलनगर मधे आहे. पण वेळ काढुन आणि खर्च करुन बघायलाच हवी अशी आहे.
फिलोमीना चर्च मैसुर सीटीतच आहे. ते सुद्धा अप्रतिम सुंदर आहे. स्वच्छ, प्रशस्त आणि फार सुंदर दगडी काम आहे. मी तिथे इविनिंग मास अटेंड केला होता. कन्नड प्रार्थना होत्या. इतकं पवित्र वातावरण आणि इतक्या गोड प्रार्थना होत्या. मी रेकॉर्ड केल्या आहेत त्या. फार सुंदर अनुभव होता तो.

म्हैसूर शहर खूप छान आहे ! शांत पणे पहायचे असेल (संपूर्ण सार्वजनिक वाहतूक वापरून) तर ५ दिवस Happy
वरती ठिकाणांची लिस्ट आहेच पण त्यात 'बंडिपूर' सुद्धा घाला !

तिबेटन मॉनेस्ट्री बरीच पुढे कुर्ग रोडवर कुशलनगर मधे आहे >> ह्याला गोल्डन टेंपल म्हणतात बहूतेक कि ते दुसरं.. कुर्ग जवळचं.. Sad

अमोल केळकर >> जमले तर एक ८-१० दिवस पुढे ढकला ट्रिप. कर्नाटकात थोडा लवकर येतो ना पावसाळा तर पहिल्या पावसाचे वेळी हवा खूप सूंदर असते म्हैसूर आणि परिसराची !!

आणि जवळच श्रीरंगपट्टणमला ही भेट द्या, तेथील किल्ला, किल्ल्यातील रंगनाथ स्वामी मंदिर, कावेरी, काबीनी, हेमावती या तीन नद्यांचा संगम, टीपु सुलतानचा महाल अश्या अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत तिथे.