तुम्हाला आलेला परमेश्वराचा किंवा दैवी सामर्थ्याचा अनुभव...

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 2 May, 2012 - 09:03

मायबोलीवर भूत, पिशाच्च ,अमानवीय शक्तीच्या अनुभवांवर आधारित अनेक धागे किंवा अनुभवकथनं आहेत .ह्या धाग्यांवर प्रचंड रोमांचकारी अनुभव अनेकांनी कथन केले आहेत .इंग्रजी ,मराठी नेटविश्वातमध्येही पॅरानॉर्मल, गुढ अनुभवांवर आधारित बरेच लेखन आहे. हे सर्व लेखन भयावह अनुभवांवर आधारीत असते .
खुद्द मायबोलीवर 'अमानवीय' ,'भुते असतात का?' वगैरे याविषयाला वाहिलेले अनेक धागे आहेत. मायबोलीवर परमेश्वराच्या आलेल्या अनुभवावर अगदी थोडे लेखन आहे. हा धागा मी उघडला कारण अनेकांच्या तोंडी आपण परमेश्वराच्या प्रचीतीच्या कथा ऐकतो .तुम्हाला तुमच्या आयुष्यातील असे घटना ,प्रसंग अनुभव आठवतात का जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाची, सामर्थ्याची अनुभती घेतलीत .तुमचे असे विलक्षण अनुभव असतील तर ते या धाग्यावर लिहावेत.

सुचना:-ह्या धाग्यावर चांगले वर्तन ठेवावे. विषयाशी संबंधीत प्रतिसाद असावेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण रात्री झोपतो पण सकाळी उठूच अशी खात्री नसतानाही सकाळी न उठवता जग येते ही ईश्वराचीच कृपा म्हणायची... माणसाच शरीर आणि त्याची जडण-घडण हे दुसर उदहरण त्या दैवी शक्तीच....

@ दिपीका...
तसेच झोपेतून उठण्याला चमत्कार म्हणणारे सर्व सन्माननीय प्रतिसादक,
पुढील दुव्यावरील माहिती रोचक ठरावी. : रेटिकुलर अ‍ॅक्टिवेटींग सिस्टीम

इथे आस्तिक लोक श्रेष्ठ वैज्ञानिक आईनस्टाईनचे उदाहरण का देत आहेत? आईनस्टाईनच्या शास्त्रीय ज्ञानाबद्दल कोणीच शंका घेण्याचे कारण नाही पण त्याचे आध्यात्माशी संबंधित ज्ञानही त्याच तोडीचे होते असे का मानावे? तो जर नास्तिक होता आणि ईश्वर मानतच नव्हता तर त्याची या विषयावरची मते कितपत ग्राह्य मानता येतील. (आणि या बाफ च्या संदर्भात तर नाहीच).

नारायण, नारायण

सामान्य मानवांचा बुद्धीभेद करण्याचा उत्तम प्रयत्न म्हणजे हा आगलाव्या धागा

@इब्लिस-
अहो पण तुमची ती गुंतागुंतीची सिस्टिम तयार करणारा कोण आहे? तिला आदेश कोण देतो?

अशा स्वरूपाची उत्तरे ऐकण्यास तयार रहा. Happy

>>>अहो पण तुमची ती गुंतागुंतीची सिस्टिम तयार करणारा कोण आहे? तिला आदेश कोण देतो?
हे उत्तर नाही प्रश्न आहे. त्याचं उत्तर अर्थातच नसेलच यांच्याकडे Proud

ई आर रोहीत भाव मग तुम्ही त्या अमीरच्या सत्यमेवजयते बाफावर कशाला आपली पांघळपुंगी वाजावलीत? गंमत आहे ना? दुसर्‍याकडे बोट दाखवता, चार बोटे आहेत की तुमच्याकडेच, अं ?

मायबोलीवरची एक गोष्ट मला भारी आवडते. कोणी 'अमुक एक गोष्ट कोणाला माहित आहे का?अनुभव आहे का?' असा प्रश्न विचारणारा बाफ काढला की नेमके त्या प्रश्नाचे उत्तर देणारे कोणी येवो न येवो पण 'हा प्रश्नच खोटा आहे, असे कधी घडणारच नाही' हे सांगणारे मात्र खंडीभर येतात. Happy

रच्याकने, माझा देवावर/दैवी सामर्थ्यावर विश्वास आहे पण त्या सामर्थ्याची अगदी स्पष्टपणे जाणिव होईल असा अनुभव अद्याप तरी आला नाही.

साधना Proud

छान.

Er.rohit | 6 May, 2012 - 01:12
> जागो मोहन प्यारे,योग्य बोललात एन्टीमेटरने पोस्ट काय टाकलीए आणि प्रतिसाद काय देत आहेत बघा हे लोक.

वा वा... एन्टीमेटरने पोस्ट टाकलीए, लोक प्रतीसाद देत आहेत आणि रोहीत जामोप्या ला ते बघायला सान्ग्त आहे...

> आईनस्टाईन नास्तिक होते.
हे कोणी सान्गीतल रोहीत्ला, आईनस्टाईननी? आणि असेल तो नास्तीक, तर? मुद्दा काय? आईनस्टाईन नास्तिक होता म्हणून रोहीत च्या म्हणण्या प्रमाणे नास्तिक असण योग्य? ही तर अन्धश्रध्दा झाली.

धागा कोणता ? चाललय काय ? अ‍ॅडमिन कृपया योग्य ती कारवाई करण्यात यावी हि विनंती.

>>>> That student was EINSTEIN <<<<
हा उतारा इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy मस्त आहे.

द्वैतातील बाह्यात्कारी घटना/अनुभव्/अनुभुती यातुन मी देवाचे अस्तित्व जाणवुन घेतलय. त्यात मला शन्का नाही. आता अद्वैतातील देवाचे आन्तरीक अस्तित्व जाणवुन घ्यायच्या प्रयत्नात आहे.
त्या शिवाय, श्री श्री भट यान्चे नक्षत्रावरील पुस्तकात विशेष उल्लेख वाचल्यावरून, 'काल' या संकल्पनेचे सानिध्य/अस्तित्व/अपरिहार्यता जाणवुन घ्यायचा प्रयत्न सुरू केलाय. ते जाणवल्यास बर्‍याच गोष्टीन्चा उलगडा होऊ शकेल असे वाटते.

मला तरी परमेश्वर वगैरे थोतांड आहे असे वाटते, जग निर्माण करायचे आणि त्याचे व्यवस्थापन करत बसायचे... असला मुर्खपणा देव कशाला करेल? तो आपला एकटा मस्त जगेल की. कैच्याकै संकल्पना आहे.

हा या धाग्याचा विषय नसेलही, पण सुचतय म्हणुनचे हे स्वगतः
आजवर मी कालगणना शिकलो, घड्याळ वापरायला/समजुन घ्यायला शिकलो, सूक्ष्मातील सूक्ष्म वेळ ते प्रकाशाच्या गतीवर आधारीत काही लाख प्रकाशवर्षेन्चा हिशोबही समजुन घ्यायचा प्रयत्न केला. पण वरील व एकन्दरीतच धार्मिक विभागातील काही विवेचने , तसेच पुस्तके वाचल्यावर आजवर मी जे काय शिकलो, त्याचे उपयोग केवळ व्यवहारात आहे इतकेच कळले. मला 'काळ' ('काल') कळलाच नाहीये हे उमगले.
मग विचार करता करता एक जाणवले, की आम्ही नेहेमी आमच्या भौतिक बाबीन्च्या सापेक्ष, अमुक इतका काळ गेला, अमुक इतक्या काळात इतके करायचे वगैरे बाबी बोलतो, आचरणार आणतो. पण खरच गतीशील काळ आहे की स्थिर काळाच्या सापेक्ष आम्ही /ही सृष्टी गतिशील आहे?
म्हणजे असे की मी रस्त्याने चाललो. अ बिन्दू पासून ब बिन्दूपर्यन्त मी रस्ता चालत रहातो, व माझ्या चालण्याच्या सापेक्ष बोलीभाषेत रस्ता(अंतर) मागे पडत जातो, प्रत्यक्षात रस्ता आहे तिथेच असतो, पण मी मात्र एका बिन्दूपासून दुसर्‍या बिन्दूपर्यन्त मार्गक्रमण करीत असतो. कालाचे बाबतीतही असेच नाही कशावरून? मला तर भासते आहे की काल सुस्थिर आहे, त्याचा आवाका म्हणा, परिघ म्हणा स्पॅन म्हणा अफाट/अनंत आहे, त्यातिल एका थोड्या हिश्यावरुन माझे सद्य जीवनाची मार्गक्रमणा मी करतो आहे. अन अर्थातच, ही मार्ग्रक्रमणा होताना विशिष्ट काल गेल्यावर भविष्यात मी काय करत असेन किन्वा अस्तित्वातच नसेन हे कालाच्या माझ्या वाट्याला आलेल्या मार्गक्रमणाच्या त्या छोट्याश्या हिश्यात आत्ताच्या बिन्दूवरुन अंतिम ब बिन्दूपर्यन्त काही उपायान्नी मी डोकावुन/दूरदृष्टीने वा अजुन कशाने अवलोकन केल्यास मला कळू शकेल. काल नेमका काय आहे हे उमजल्यास, भविष्यकथन अधिक सविस्तर व सोपे होइल, मात्र एकदा काल कळला, तर कदाचित अचूक भविष्य कथनाची व्यर्थताही उमगुन येईल असे वाटते.
कालातीत हा शब्द बोली भाषेत तरी सार्वकालिक अशा अर्थाने वापरला जातो का? पण मग ज्याला कालाचे बंधन नाही, वा कालाचे सापेक्ष त्याची साथसंगत वेळेस जो सोडू वा जोडू शकतो त्या कृतिस /अवस्थेस काय म्हणावे?

Proud

लिम्ब्स, आधीच एकतर दुपारची डोळ्यावर झोप येत होती, त्यात तुम्ही लिहिलेले हे वाचून चक्कर पण येऊ लागली आहे. Uhoh

महेश Proud

काल + अतीत = कालातीत अशी जर फोड असेल तर काळाच्या पलिकडे अथवा "जो ज्याच्यावर काळाचा काही परिणाम होत नाही असा" याप्रकारे अर्थ घ्यायला लागेल असे वाटते.

कधी कधी ह्या ईश्वर कृपेला आपण एवढे लायक आहोत का असा प्रश्न पडतो . तरीही ईश्वर आपल्या बाबतीत इतके दयाळू आहेत असे बरेच अनुभव येतात . मला आत्तापर्यंत चा सगळ्यात जास्त आवडलेला आणि मनावर कोरला गेलेला अनुभव म्हणजे . १५ वर्षांपूर्वीची घटना आहे .मी दहावीला होते . मी शिव शंकरांची भक्ती करायचे . आई वडिलांच्या धाकामुळे पूजा वगेरे करायची नहि. परंतु ओम नमः शिवाय चा जप चालू असायचा मनातल्या मनात . त्या वेळी क्लास ला जाण्यासाठी ओढा ओलांडून जाव लागायचं . मी एकटीच तिथून जायची . तो रस्ता सुनसान असायचा . खरतर दुसरा सरळ रस्तासुद्धा होता वर्दळीचा . पण चालण्याचा कंटाळा यायचा म्हणून ह्या जवळच्या रस्त्याने जायची . Wink . आदल्या दिवशी पाउस पडल्यामुळे ओढ्याला पाणी आलेल होता . माझ्या लक्षातच आला नाही कि आज आपण दुसर्या रस्त्याने जावं . ओढ्याजवळ पोचल्यावर २ पोती दिसली . त्यात काय होता माहित नाही . पण बाहेरून रक्ताने माखलेली होती . बहुदा कुत्यांनी ओरबदल्या मुळे पोत्यातून आतडी बाहेर लोंबत होती . ओढ्यातल्या दगडांवरून पुढे जायला लागले . लहान असल्यामुळे मधेच अडकले . पाण्यामुळे पुढे जाता येईना आणि समोर ते भयानक दृश्य . कोणीतरी आला म्हणजे त्याच्या मदतीने जाता येईल हि आशा .पण आजूबाजूला कोणीच नाही . अतिशय घाबरले . मग ओम नमः शिवाय चा जप खूप मनापासून चालू केला आणि यातून माझी सुटका करावी म्हणून ईश्वराला अत्यंत कळकळीची प्रार्थना केली . एका सेकंदाच्या आत माझ्या खांद्यावर हाथ पडला आणि त्या माणसाने माझा हाथ धरून मला पलीकडे सोडवला . त्याने माझ्याकडे बघितला नाही कि काही बोलला नहि. मी चिखलाने भरलेल्या पायांकडे बघण्यासाठी १-२ क्षणाच नजर खाली घातली असेल . पुन्हा त्याच्याकडे बघितल तर तो होता कुठे तिथे? एवढ्या लवकर तो वर पर्यंत जाण शक्यच नवतं .
त्या नंतर हि अनेक चमत्कार झाले आहेत पण आता ईश्वरी सामर्थ्याची जाणीव झाल्यावर ह्या चमत्काराचं फार आश्चर्य वाटत नाही . कारण ईश्वर माझ्या सोबतच असतात ह्याची खात्री पटली आहे .

अति प्रचंड भ्रष्टाचार, लुटालुट, बलात्कार, दंगली, बाँबस्फोट, अतिरेकी/नक्षली कारवाया, भयंकर लोकसंख्या आणि त्यामुळे नैसर्गिक स्तोत्रांवर पडणारा ताण, एवढं सगळं होत असुन भारत देश चाल्तो आहे, बर्‍यापैकी प्रगती करतो आहे, हा परमेश्वर असल्याचा ढळढळीत पुरावा आहे.

हो.

अग्निपंख, मूळ उद्धरण चेस्टर बोल्स या अमेरिकन राजदूताचं आहे. भारताबद्दलचंच. Wink
त्यात आता फक्त आपत्तींची, अडचणींची यादी बदलली आहे तुम्ही.

अग्निपंख >> अनुमोदन

फक्त देव एवढे असह्य दु:खद घडूच का देतो हा एक कालातीत न सुटलेला प्रश्न आहे

अग्नीच्या पंखा, सत्यवचन श्रीमान !
पण हे केवळ भारतच नव्हे तर संपुर्ण जगाला देखील लागू पडते. Happy

Pages