साद देती हिमशिखरे : भाग-३, मनाली, मनाली आणि फक्त मनाली : भाग १

Submitted by शोभा१ on 19 December, 2011 - 04:33

http://www.maayboli.com/node/30435
http://www.maayboli.com/node/30957

दिनांक २४.११.११. सर्वानी लवकर उठून, पटापट आवरलं. आज आनंद अगदी ओसंडून वहात होता.
अहो, कारण ही तसचं होत ना? आज आम्हाला बर्फ़ात खेळायच होत, ‘रोहतांग’ पर्वतावर. बाहेर बघितल तर, चंद्राने दर्शन दिले. एक पक्षी त्याला निरोप देत होता.

कॆमेरा हातात असल्यावर, फ़ोटो काढल्याशिवाय रहावतच नाही.


आमच्या खोलीसमोर एक छोटीसी गच्ची होती. त्यावर वेलीनी अशी छान रांगोळी रेखाटली होती.

आणि ही बाग.


हे निसर्ग दर्शन.


नाश्ता करताना, एक आनंदाची बातमी समजली, आणि सर्वांचे चेहरे फ़ुलले. बातमी अशी होती ’कल रात बारिश हो गई! इसलिये स्नोफ़ॊल हुआ है.’ हे ऐकल मात्र, नाश्ता पोटात, अक्षरश: ढकलून, पटापट बाहेर आलो. पण..... आमचे सारथी अजून आलेच नव्हते. हॊटेल बाहेर येऊन त्यांची वाट पहाताना, ’वाट पहाण’ किती त्रासदायक असत, याचा अनुभव आला. Wink हा त्रास फ़ोटो काढून सुखकर केला.







आम्ही ज्या हॊटेलमध्ये राहिलो, ते संपूर्ण हॊटेल वेलींनी सजवलेले आहे. हे पहा.

आले आले आले. ’विर’ आले. आम्ही त्वरीत गाडीत स्थानापन्न झालो. आता कॆमेरा २ (तथाकथित)फ़ोटोग्राफ़र्सच्या हातात फ़िरत होता. फ़ोटो काढण्याची जणू स्पर्धाच लागली होती.(घाबरू नका. सगळे फ़ोटो इथे नाही डकवणार :फिदी:)



रॊकेटचा धूर.





वाटेत एक बर्फ़ात (खेळायला) जाण्यापूर्वी घालण्याच्या, गरम कपड्यांच दुकान होत. तिथे ते कपडे घालून (भाड्याचे पैसे देऊन)पुढे निघालो. आमच्या दोन कन्यकाना मिळालेले ड्रेस, त्यानी घातल्यावर त्या अंतराळवीरांगना दिसू लागल्या.

हे आहेत बर्फ़ाचे डोंगर.(डोंगरावर साठलेला बर्फ़ :फिदी:)



काही ठिकाणी ढग बर्फ़ाच्या डोंगरावर उतरले होते.





हा वाटेत आमच्या स्वागताला उभा होता. हा एकच आहे. दोन्ही फ़ोटोत अर्धा-अर्धा आलाय.


हा संपूर्ण रस्ता घाटांचाच होता.

अर्ध्या रस्ता पार केल्यावर कळलं, की अति बर्फ़वृष्टीमुळे, ’रोहतांग’ पर्वतावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. झाल. सगळ्यांचा विरस झाला. पण आमच्या ड्रायव्हरने सांगितल, की ’त्याच्या आधी १० किलोमिटरपर्यंत आपण जाऊ शकतो. तिथे तुम्ही बर्फ़ात खेळू शकता’.चला. ’दुधाची तहान ताकावर भागवू.’ असा विचार करून तिथपर्यंत पोहोचलो. हेच ते ठिकाण.

सगळे धावतच बर्फ़ात पोहोचले. आधी फ़ोटो काढण्याचा कार्यक्रम झाला. एकीकडे पुढे पळण्याचा उत्साह, तर दुसरीकडे फ़ोटो काढण्याची घाई. आम्हाला ’विर’च्या कृपेमुळे इथे पोहोचायला १०.३० झाले होते. आणि बर्फ़ वितळायला लागला होता. मग मात्र कॆमेरा ड्रेसच्या खिश्यात टाकून, जास्त बर्फ़ होता तिथे जाऊ लागलो. तर बर्फ़ाच पाणी होऊन, पसरायला लागल होत. त्यामुळे बर्फ़ावर दिलेला पाय जमिनीच्या पोटात जात होता. तर वाटेत दलदल होती. एकमेकाना “सांभाळून या” असे सांगत चाललो असताना, मागचे लोक आले का? म्हणून मागे बघितल, तर एक अंतराळ विरांगना, पाताळ विरांगना, होण्याच्या बेतात दिसली. पाय चिखलात अडकल्यामुळे, तिने हाताचा उपयोग करावा म्हणून
आधारासाठी हात खाली टेकले, तर ते ही खाली जाऊ लागले, आणि तेवढ्यात अस्मादिकांच लक्ष गेल. धावत जाऊन तिला हात दिला. एका पायातला ’गमबूट’ निघालेला तिला कळल, म्हणून तिने पाय बूटात जोरात दाबून, पाय उचलला. तोपर्यंत, बर्फ़ाचा थंडपणा आलेल्या चिखलाने बुटात प्रवेश केला होता. आता हा पाय काढताना, दुसया पायावर जोर पडून, तो बूट रुतला. आणि तो पाय मात्र बुटाशिवायच बाहेर आला. एका पायात चिखलाने भरलेला बूट (मोज्यासहीत), तर दुसया पायात काहीच नाही. आता तिला चालताही येत नव्हत. जरा घट्ट हिरवळ बघून तिला बसवल. (खरं तर ती पडलीच.) तिची देखभाल, सौ. ’आकुमि’ करत होत्या. त्यांनी चक्क त्यांचे पायमोजे काढून, तिला घालायला दिले.धन्य त्यांची. इकदे मी व श्री. ’आकुमि’ चिखलात रूतलेल्या बूटाची शोधमोहिम हाती घेतली. कारण एक तर, पायात बूट न घालता, तिथे रहाणे शक्यच नव्हते. आणि दुसरे म्हणजे, ते बूट परत करायचे होते. त्या काळ्या चिखलात, काळा बूट, (तोही रुतून बसलेला) शोधून काढणं, म्हणजे दिव्य होत. पण हे आव्हान आम्ही स्विकारलं. आणि साधारण, जिथे बूट असेल अशी शंका होती, तिथे शोध घ्यायला सुरुवात केली. आमच्या प्रयत्नाना यश आल. बूटाने दर्शन दिले. पण तो चिखलाने पूर्ण भरला होता, व चिखलात रूतलेला होता. त्याला हात लावला तर थंडीने व चिखलामुळे हात सुटत होता. तरी त्यांचे प्रयत्न जारी होते. एक दोनदा त्यांचाही पाय चिखलात
रूतायला लागला होता, पण थोडासा आधार दिल्यावर ते सावरले. (अर्थात, माझा आधार म्हणजे ’बुडत्याला काडीचा आधार’ असच होत. :फिदी:)अथक प्रयत्नानंतर बूट काढण्यात ते यशस्वी झाले.मग मी तो बूट आपटून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. आता सगळेच प्रचंड गारठले होते. आणि ....आणि ....आणि....चमत्कार झाला. एक बाई चक्क, चहाची लहान किटली आणि ग्लास घेऊन आमच्याकडे आली. त्या क्षणी ती आम्हाला, देवदूतच वाटली. आहाहा! ते अमृत प्राशन करून सर्वानी (दोघी सोडून) स्वर्गीय सुखाचा आनंद घेतला. तिच्याकडे असलेला चहा, फक्त आम्हाला पुरेल एवढाच होता. Happy आता प्रचंड उत्साहाने खेळायला सुरुवात झाली.
हाच तो रोहतांग पर्वत. इथे जायला मिळाल असत, तर काय मज्जा आली असती ना.

दिड-दोन तास, बर्फ़ात मनसोक्त खेळल्यावर आम्ही, परत फ़ोटो काढायला सुरुवात केली.


९०६

ही पहा बर्फ़ाचा आनंद लुटणारी छकुली.

आता सगळ्याना कावळ्यांच ओरडण ऐकू येऊ लागलं Proud परत परत डोळेभरून तो रोहतांग पर्वत पाहिला. आणि परतीच्या मार्गाला लागलो. दुसया दिवशीच्या बर्फ़वृष्टीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली.





हे साहसी वीर.

From December 17, 2011

काही ठिकाणी, बर्फ़ वितळून वाहता वाहता तिथेच गोठल होतं.


हा आमचा रस्ता.


आता प्रथम थंडीसाठी घेतलेले कपडे परत केले. आणि बरोबर असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गाडीत बसलो. कारण वाटेत ’आकुमी’ यांच्या मुलीला शूटींग चालू असलेल दिसल. आणि तिने त्यांची गाडी त्वरीत थांबवायला लावली. हे समजल्यावर आम्ही पुढे निघालो. व इथे येऊन वाट पहात बसलो. थोड्या वेळाने ते हजर झाले. आता जेवणाचे वेध लागले होते. ’विर’च्या ठरेलेल्या भोजनालयात भोजन घेऊन हॊटेलवर आलो. थोडा आराम करून फ़िरायला बाहेर पडलो.
हे आहे हडिंबा मंदीर.

येथे 'रोजा' या पिक्चरच शूटींग झाले आहे. अस समजल.
येथे ही बाई ससा घेऊन उभी होती. सगळ्याना ससा हातात घेण्याचा ’गोड’ आग्रह करत होती. तिच्या आग्रहाला बळी पडून दोघीनी त्या सशाचे लाड केले. फ़ोटो काढले..आणि.........................नंतर तिच्या गोड आग्रहाचा ’अर्थ’ कळला.

खरेदीच्या नावाखाली भरपूर पायपीट झाल्यावर, थोडीशी खरेदी झाली. आता दमून हॊटेल वर परतलो. थोडावेळ गप्पागोष्टी करून, जेऊन, झोपेला शरण गेलो.

गुलमोहर: