Submitted by कौतुक शिरोडकर on 3 May, 2012 - 02:56
मुळ गझल http://www.maayboli.com/node/34583
(इच्छा असल्यास) पहा. गझलकाराची 'कणभर'ही क्षमा अर्थातच मागितलेली नाही.
प्यायलो ताडी तसे उठले किडे रक्तातले
आपल्या गोठ्यात जावे हेच आता चांगले
फ़ार मोठी झेप हल्ली सोसते कोठे मला
पचवली पुर्वी कितीदा बंडलावर बंडले
का अघोरी एवढी 'कर्तव्य' ही संकल्पना
या महागाईस भिडता श्वास सारे कुंथले
आज बाटे चोखण्याचा प्रश्न कोठे राहिला
जे बजेटी बसवलेले तेच आंबे नासले
मंदिरी का होइना सांभाळ तू बडवेपणा
जेवु दे मासे चिकन, पुरवू जिभेचे चोचले
गुलमोहर:
शेअर करा
छान ..आवडली
छान ..आवडली
जबरदस्त जमली आहे. भरपूर वेळ
जबरदस्त जमली आहे.
भरपूर वेळ दिसतोय शिरोडकरांना सध्या
अस्मादिकांची गझल विडंबनासाठी
अस्मादिकांची गझल विडंबनासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद कौ.
शीर्षक वाचून लेखकाचे नाव
शीर्षक वाचून लेखकाचे नाव लक्ष्मण असेल असं वाटलं तर आपले कौतुकराव
जम्या येकदम
(No subject)
झक्कास !!
झक्कास !!
व्वा कौतुकराव... अफाट.
व्वा कौतुकराव... अफाट.
झिन्गलो
झिन्गलो
(No subject)
जमलीये
जमलीये
साल्या, सद्ध्या कामधंदा
साल्या, सद्ध्या कामधंदा नाहीये काय तुला? बराच रिकामटेकडा दिसतोयस
धमाल आहे
धमाल आहे
लै भारी
लै भारी
भारीच..