( नको देव राया , राज्यसभा पाहू )

Submitted by अमोल केळकर on 27 April, 2012 - 04:52

आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती Happy
---------------------------------------------------------------------------

नको देव राया , राज्यसभा पाहू
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !

विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे
तूला काय जाहले, अरे देवा !

तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !

निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत !!
------------------------------------------------------------
अमोल केळकर
मला इथे भेटा

गुलमोहर: 

हेच जर भाजपाने उमेदवारी दिली असती तर ही कविता प्रसवली असती का?

एकंदर, सचिनने भ्रमवृंदाचे नाक ठेचून काढले तर! याबद्दल सचिनचे खास अभिनंदन.

येथे प्रश्न कॉंग्रेस किंवा भा.जा.प चा नसून सचिन ने खरोखर राज्यसभेवर जाण्याची गरज आहे का? हा आहे.
जर का त्याला खरोखर काही करायची इच्छा असेल तर त्याने अजून क्रिकेट मधेच करावे. CPI ने आता गांगुलीला उभे केले आहे.
सगळा भारतीय संघच द्या पाठवून.. आणि इ.पी.ल. ६ खेळा म्हणावे. आणि जर का वेळ मिळाला तर देशाकडे पहा.

सचिनला "उमेदवारी" दिलेली नाही. नियुक्त सदस्य आहे तो. कैच्याकै बोलू नका.
आणि कुणीही पाठवलं असतं तरी सचिनने जाणे कितपत योग्य हा प्रश्न उद्बवलाच असता.

तेच हो, उमेदवारी, स्वीकृती... सगळं सारखंच. असा काय नी तसा काय खासदारच ना? .. सचिनच्या बॅटीवर शिक्का हाताचा बसला , भ्रमवृंदाची झोप उडवणारा प्रसंग आहे हा.. Proud

बरं

केळकरमामा, तुम्ही भविष्य, कुंडल्या बघता म्हणे... सचिन तुम्हाला असा धक्का देणार आहे हे आधी कुठल्या ग्रहाने नाही का सांगितले? Proud Biggrin

सचिनची खासदारकी नक्की आहे ना? नाहीतर या केळकराची अभद्र नजर लगायची आणि तो उद्या नकार द्यायचा! Sad

http://amreekandesi.com/wp-content/uploads/2010/09/lemon_chilli-hanging-...