Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 April, 2012 - 02:33
आठवणींचं मोहोळ
आज फुटलं फिरुन
सयी छळती जीवाला
डंख मारुन मारुन
जुन्या पुराण्या जखमा
पुन्हा नव्याने सलती
वाहू लागे भळाभळा
जरी खपली वरती
कधी आसूड शब्दांचे
गेले कातडी सोलून
कधी कुणी फसविले
गळा केसाने कापून
घाव वर्मावर झाले
काही काळजाच्या पार
परी दुखावून गेले
सग्या सोयर्याचे वार
सार्या कटू आठवांचे
येई मळभ दाटून
होई चित्त सैरभैर
राही काळोख भरुन
ओझे झाले पापण्यांना
काळ्या सावळ्या ढगांचे
झडझडून कोसळे
मन ऋणी आसवांचे
जयश्री
गुलमोहर:
शेअर करा
आर्त आहे. आवडली.
आर्त आहे. आवडली.
सुरेख अष्टाक्षरी.
सुरेख अष्टाक्षरी.
मस्तय, वेल्कम बॅक और आनेदो
मस्तय, वेल्कम बॅक
और आनेदो
अप्रतिम.......
अप्रतिम.......
खरोखर अप्रतिम
खरोखर अप्रतिम
सुरेख!
सुरेख!
क्या बात है, जयश्री तै! सुंदर
क्या बात है, जयश्री तै! सुंदर अष्टाक्षरी
फार सुंदर.
फार सुंदर.
आवडली कविता विपू लिहितोय
आवडली कविता
विपू लिहितोय
मोहोळाची उपमा छान.
मोहोळाची उपमा छान.
खूप खूप धन्यवाद मित्रांनो
खूप खूप धन्यवाद मित्रांनो
श्यामली
बेफिकीर...... तुम्ही सुचवलेले बदल अगदी बरोबर आहेत. मनापासून पटले. तसे बदल करतेय. स्पष्ट प्रतिसाद आवडेश