बोफोर्स घोटाळ्याचे भूत पुन्हा काँग्रेसच्या मानगुटीवर

Submitted by मंदार-जोशी on 25 April, 2012 - 12:55

पंचवीस वर्षांपूर्वी उघडकीला आलेल्या बोफोर्स घोटाळ्याने आज पुन्हा डोके वर काढले. अमिताभ बच्चन निर्दोष असल्याचे उघडकीला आले तर माजी पंतप्रधान राजीव गांदी यांनी कशा प्रकारे सोनिया गांधींचे सुहृद असलेले क्वात्रोची यांना कसे वाचवले ते ही उघडकीला आले.

boforssaamna.JPGboforsamitabh.JPG
या घोटाळ्यात कुणाची पापे झाकण्यात आली तर कुणाला विनाकारण गोवलं ते इथे पहा:

http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Bofors-investigator-alleg...

http://timesofindia.indiatimes.com/india/Bofors-scam-I-have-lived-with-s...

माजी स्वीडीश पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्टोर्म यांचा खुलासा:
http://www.indianexpress.com/news/swedish-former-top-cops-bofors-remarks...

हे सगळं असतानाही काँग्रेसने मात्र निर्लज्जपणे प्रतिपादन असे केले आहे:

ई-सकाळ:

नवी दिल्ली- बोफोर्स प्रकरण आता संपले असून, ते पुन्हा उघडण्याची गरज नाही, असे केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे.

मला वाटते की, हे प्रकरण आता संपले आहे. नवीन विषय घेऊन हे प्रकरण पुन्हा-पुन्हा उघडू नये. जो काही निर्णय असेल, तो न्यायालय देईल, असे खुर्शिद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.esakal.com/esakal/20120426/5099573682770100188.htm

बच्चन यांना उगाचच मनस्ताप झाला. मैत्रीची जबर किंमत त्यांना चुकवावी लागली. किती मनस्ताप झाला असेल त्यांना. Sad

सकाळ मधे पण बातमी वाचली. भारतरत्न राजिव गांधी सरकारने आणि नंतर सोनियांच्या इच्छेपुढे क्वात्रोची मामा यांना पाठिशी घातले. भ्रष्टाचार करणार्‍या क्वात्रोची मामां पेक्षा त्याला पाठिशी घालणारे गांधी कमी दोषी ठरत नाहीत. मामा साहेबांची पोहोच फार मोठी आहे त्यामुळे भारताचे कायदे त्यांच्या पर्यंत पोहोचण्यात दुबळे ठरले.

चला सर्वांनी एक सुरांत सत्य मेव जयते म्हणा....

क्वात्रोची विरोधात बरेच पुरावे होते आपल्याकडे. पण काँग्रेस ई (ई = ईटालियन) सरकारची इच्छाच नाही त्याला भारतात आणावे, कारण यांची अगोदरच उघडकीला आलेली अनेक लफडी आणखी उघड्यावर येतील ना!!

सामान्य माणसापर्यंत काय पोचते आणि वास्तवात काय घडलेले असते हे समजू शकत नाही. बोफोर्स मामल्यात आता तरी (या आधुनिक जगात आणि पत्रकारिता प्रभावी झालेल्या जमान्यात) सत्यावर प्रकाश पडावा.

गोरापान हसतमुख चेहरा, किलर स्माईल, हॅन्डसम पर्सनॅलिटी आणि आई गेल्यानंतरही इतरांनाच धीर देण्याचा अभिनय या क्वॉलिफिकेशनवर तो माणूस पंतप्रधान झाला होता. परमसंगणक आणला याचे श्रेय त्यांना दिले जाते हे ठीक. पण पंतप्रधानपदी असलेल्याला तेवढे तरी करायला पाहिजेच ना? Angry

भारताच्या राजकारणावर ज्यांचा अती प्रभाव पडतो त्यांच्या हत्या अशाच का झाल्या हे विस्मयकारक वाटते

महात्मा गांधी

इंदिरा गांधी

राजीव गांधी

परमसंगणक आणला याचे श्रेय त्यांना दिले जाते
------ बेफ़िकीर साहेब थोडी गफलत होते आहे... परम संगणक पुण्यात सिडॅक (C-DAC, Center for Development of Advanced Computing) येथे श्री. विजय भाटकर यांच्या मार्गदर्शनाने ९१ मधे बनवला गेला....

http://en.wikipedia.org/wiki/PARAM

http://business.outlookindia.com/article.aspx?102117

भारतरत्न राजिव गांधी यांनी सॅम पित्रोदा यांना आणले आणि तेव्हढेच त्यांचे योगदान. अत्यंत कर्तुत्ववान अशा पित्रोदांनी संधीचे सोने केले...

या बोफोर्स तोफांनी युद्धात चांगली कामगिरी केल्यामूळे त्या वादावर पडदा पडला होता. बेफि म्हणताहेत तसे, सत्य बाहेर यायला आणखी काही वर्षे जातील.

मला वाटते की, हे प्रकरण आता संपले आहे. नवीन विषय घेऊन हे प्रकरण पुन्हा-पुन्हा उघडू नये. जो काही निर्णय असेल, तो न्यायालय देईल, असे खुर्शिद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
>>>>>

आत्ता कशाला गेले ५०-६० वर्षे काँग्रेस हेच करत आली आहे..

हे वाचा..

स्वातंत्र्य मिळाल्यावर पं नेहरूंनी त्यांच्या श्री. कृष्णमेनन या मित्राला इंग्लंडमधे राजदूत म्हणून नेमले. १९४८ साली त्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोरे जावे लागले ते जीपच्या खरेदीत. सेनादलांनी ही वाहने खराब गुणवत्तेच्या कारणाने नाकारली पण त्यांना आपल्या पंतप्रधानांनी ती वाहने स्विकारायला लावली. एवढेच नव्हे तर त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ताबडतोब संरक्षणखात्याचा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील करून घेण्यात आले. नेहरूंनी त्यावेळेस लोकसभेत जे उत्तर दिले ते वाक्य भारताच्या राजकीय इतिहासातील फार महत्वाचे वाक्य आहे. त्या वाक्याचा शेवटचा अर्थ असा आहे की जनतेच्या दरबारात आम्ही निर्दोष आहोत कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले आहे. ते उत्तर असे होते “ हे प्रकरण व त्याची चौकशी आता बंद करण्यात आलेली आहे. कारण त्या वाहनांचे पसे अगोदरच देण्यात आलेले आहेत. विरोधकांनी त्यांना पाहिजे असेल तर आता हा प्रश्न पुढच्या निवडणूकीत जनतेच्या दरबारात उपस्थित करावा व न्याय करून घ्यावा. “ सध्या हेच उत्तर आपले राजकारणी देत असतात हे आपण पाहिले असेलच.

संदर्भ...
जयंत कुलकर्णी

सेनादलांनी ही वाहने खराब गुणवत्तेच्या कारणाने नाकारली

सेनादलाचे खरे असेल कशावरुन? त्यांचेही दुसर्‍या एखाद्या कंपनीबरोबर संधान नसेल कशावरुन? खराब क्वालिटीची जीप कशी असेल? कंपनीने खास सेनेसाठी म्हणून खराब क्वालिटीचे मटेरियल तयार केले का?

शासनाने खरेदी केली की प्रशासनातल्या लोकानी बोंबलायचे.. ( कारण त्यांचा चान्स गेला) आणि यानी केली की त्यानी बोंबलायचे... यलाच लोकशाही म्हणतात.

आत्ता कशाला गेले ५०-६० वर्षे काँग्रेस हेच करत आली आहे..>>> तरी लोक काँग्रेसलाच निवडून आणतात ना? Angry

People get the govt they deserve!

सेनादलाचे खरे असेल कशावरुन? त्यांचेही दुसर्‍या एखाद्या कंपनीबरोबर संधान नसेल कशावरुन? खराब क्वालिटीची जीप कशी असेल? कंपनीने खास सेनेसाठी म्हणून खराब क्वालिटीचे मटेरियल तयार केले का?>>>>> bowdown.gif धन्य धन्य!

ज्या पंडित नेहरूंनी सुरुवातीला कोयना प्रकल्पाला विरोध केला त्यांनाच कोयनेचा शिल्पकार असे संबोधन देत होते काल परवा न्यूज चॅनलवाले...... Sad सगळे फक्त यशाचे मानकरी.

>>विरोधकांनी त्यांना पाहिजे असेल तर आता हा प्रश्न पुढच्या निवडणूकीत जनतेच्या दरबारात उपस्थित करावा व न्याय करून घ्यावा. “ सध्या हेच उत्तर आपले राजकारणी देत असतात हे आपण पाहिले असेल<<
नेहरूंचीच परंपरा नाहीतरी चालू आहे. अण्णा हजारेंना आज हेच सुनावले जाते कारण निवडणुकीच्या खेळात अण्णांसकट सर्वांचे डिपॉझिट जाईल याची त्यांना खात्री आहे; आणी तसेच होण्याची शक्यता आहे असे इतिहास सांगतो.

धन्यवाद मंदार. काँग्रेसकडून व काँग्रेसच्या राज्यकर्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही. आणि तरीही असे भ्रष्ट राज्यकर्ते भारताचे सरकार चालवितात, लोक त्यांना निवडून देतात याचे दु:ख मात्र वाटते. यथा राजा तथा प्रजा....

प्रथमतः मी कान्ग्रेचा सपोर्टर नाहीये पण दुसरे पर्याय तरी काय आहेत? भाजपा पण काही वेगळा नाहीये. सगळे नुसते संधीसाधू आहेत. यथा प्रजा तथा राजा हेच खरे.

चैतन्य, काँग्रेसला इतकी वर्ष मिळाली, आता त्यांनी देश विकायला काढलाय. निदान भाजपला १०-१५ वर्ष तरी द्या? ते ही संपूर्ण बहुमत देऊन.

लोकसत्ता:

संसदेत ‘बोफोर्स’चा दणदणाट!
ताज्या आरोपांची न्यायालयीन चौकशी नाही
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंचवीस वर्षांपूर्वीच्या बोफोर्सप्रकरणी झालेल्या नव्या गौप्यस्फोटांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना ढवळून काढले. आज राज्यसभा आणि लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बोफोर्सवरून जोरदार खडाजंगी झाली. राज्यसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले, तर लोकसभेत गदारोळामुळे दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करावे लागले.
स्वीडनचे माजी तपासप्रमुख स्टेन िलडस्टॉर्म यांनी बोफोर्स दलालीप्रकरणी नवे गौप्यस्फोट केल्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरुण जेटली, तर लोकसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी मनमोहन सिंग सरकारला धारेवर धरले. ताज्या गौप्यस्फोटांनंतर या घोटाळ्याची नव्याने न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्व. राजीव गांधी निर्दोष असल्याचे स्पष्ट करून हे प्रकरण बंद केल्याचा दाखला देत सरकारच्या वतीने ही मागणी फेटाळण्यात आली.
न्यायालयीन चौकशीच्या मागणीवरून जोरदार गोंधळ व गदारोळ उडून लोकसभेचे कामकाज साडेबारा वाजता तहकूब करण्यात आले. विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरून सदस्य तावातावाने आरोप-प्रत्यारोप करीत होते. बोफोर्स प्रकरण हे निरंतर भ्रष्टाचाराची कथा असल्याची टीका शून्य प्रहरात बोलताना जसवंत सिंह यांनी केली. राज्यसभेत या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्याची मागणी करीत भाजप आणि अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी गोंधळ घातला. बोफोर्सवर चर्चा सुरू झाली तेव्हा जेटलींनी घणाघाती टीका केली. केंद्रात सत्ता असलेल्या सरकारच्या राजकीय रंगांनुसार या प्रकरणाचे रंग बदलले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात कुणाला तरी कंत्राट मिळाले आणि कुणाला दलाली. ओट्टाव्हिओ क्वात्रोची इतका प्रभावी होता की त्यापुढे सारा भारत हतबल ठरला, अशी कडवट टीकाही त्यांनी केली. जेटली यांचा प्रतिवाद करताना काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी बोफोर्स प्रकरणाचा छडा लावला जात असताना अरुण जेटलीच भारताचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल होते, याची जाणीव करून दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई करण्याची ग्वाही देतात. क्वात्रोचीविरुद्ध ठोस पुरावे आहेत तर चौकशी करायला का तयार होत नाहीत, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी केला.

बोफोर्स मधे काँग्रेस ने पैसे खाल्ले हे जग जाहीर आहेच..........क्वाचोत्री ला भारताबाहेर सहिसलामत घेउन जाण्यात सुध्दा सहभाग होता......हे ही जग जाहिर आहेच..यात कोणताच वाद नाही.... पण भाजपाचे ५ वर्षाचे सरकार होते...तेव्हा का नाही केस पुन्हा उघडली..? अळिमीळी गुपचिळी का घेतलेली..? क्वाचोत्री वर ठोस पुरावे तर १९९० पासुनच आहेत.. मग प्रत्येक सरकार ने का दाबुन टाकले ? जो तो एकमेकांवर का ढकलत आहेत..?
जे मुळातच जगजाहीर आहे..त्यावर आता काय होणार आहे....?

जे मुळातच जगजाहीर आहे..त्यावर आता काय होणार आहे....?>>> यात नवीन एवढेच आहे की बच्चन कुटुंबाला गुंतविले होते हे निष्पन्न होणे. त्याकाळात अमिताभला ही बरेच बदनाम करून झाले. खरे म्हणजे जास्त नाव त्याच्या भावाचे- अजिताभचे- होते त्यात.

केवळ त्या माणसाने सांगितले म्हणून ते १००% खरे असेल असे नाही, पण आता त्याला हे सांगण्यात काही मोटिव्ह असायचेही कारण नाही. एकतर सत्ताधारी लोकांकडून तसे काही खास प्रेशर येणार नाहीच.

एक बच्चन फॅन म्हणून ही बातमी वाचून आनंद झाला.

udayone ,

>> पण भाजपाचे ५ वर्षाचे सरकार होते...तेव्हा का नाही केस पुन्हा उघडली..? अळिमीळी गुपचिळी का घेतलेली..?

मी भाजपचा चाहता नाही. मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते की भाजपचे सरकार बाह्य आधारावर तग धरून होते (बहुतेक). अशा वादग्रस्त गोष्टी उकरून काढायला भक्कम बहुमत लागते.

आ.न.,
-गा.पै.

शिवाय मी स्वतः त्याच जातीचा आहे.. कायद्यानुसार स्वतःच्या जातीचा उल्लेख हा गुन्हा होत नाही.. दुसर्‍या जातीचा उल्लेख हा जातीयवाद ठरु शकतो.. पण स्वतःच्या जातीचा उल्लेख हा नाही.
----- कयद्यानुसार तुम्ही तुमच्या जातीचा तुमच्या संदर्भात एका मर्यादेत जरुर उल्लेख करु शकता... पण कायद्यानुसार तुम्हाला (आणि कुणालाच) कुठल्याही जातीची किंवा धर्माची थट्टा किंवा त्याला कमी लेखण्याचा अधिकार नाही आहे. तुमची स्वजात आहे याचा अर्थ तुम्हाला पदोपदी त्या जातीचा उल्लेख करण्याचा किंवा अवमान करण्याचा कायद्याने परवाना मिळाला आहे असे होत नाही.

माझी जात मी स्पष्टपणे ब्राह्मण अशी प्रोफाइलवर दिलेली आहे. ..
------ कुठल्या जातीत जन्म घेतला हे जाहिर करण्याची तुम्हाला अवश्क्ता का भासावी? चार लोकं काही म्ह्णाले म्हणुन लोकांसाठी कशाला नाटक करायचे ?

येथे सर्व थरांमधुन शेकडो लोकांचे येणे - जाणे सुरु असते, तुम्ही कारण नसतांना दहा वेळा माझ्या कडे मर्सिडिज गाडी आहे असा उल्लेख केल्यावर ज्यांच्या कडे फेरारी आहे त्यांना कौतुकही वाटणार नाही, पण माझ्याकडे सायकल असेल तर मला ते टोचणार.

तुम्ही भारतीय (किंवा अजुन विशाल मन करुन मानवता) असा जातीचा उल्लेख केला असता तर तुमच्या वागण्या आणि बोलण्यात तफावत जाणवली नसती आणि आदराची भावना वाढली असती.

हे ही जग जाहिर आहेच..यात कोणताच वाद नाही.... पण भाजपाचे ५ वर्षाचे सरकार होते...तेव्हा का नाही केस पुन्हा उघडली..? अळिमीळी गुपचिळी का घेतलेली..?
----- मागच्या ५० वर्षांतल्या काँग्रेसच्या चुका (गुन्हे) भाजपाने ५ वर्षात दुरुस्त करायला हवेत अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. भाजपा काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नव्हता नाही. सुखराम, जयललिता यांना सोबत घेत सरकार कसे बसे टिकवले.

राजकारणांत भ्रष्टाचार झाकण्यात काँग्रेस कमालीची परिपक्व आहे. आदर्षची बातमी बाहेर आल्यावर, काही दिवसांतच, मह्त्वाचे कागद पत्रे/ फाइली गहाळ होणे... नंतर अंतरिम अहवालात जागा राज्य सरकारची आहे, पण केंद्रातले त्यांच्याच सरकाचे संरक्षण खाते म्हणते जागा आमची आहे, आम्ही वरच्या न्यायालयांत जाणार. पुरावे नष्ट झाल्यावर, प्रामाणिक पणे तपास करणार्‍यांचे काम अजुन अव्हानात्मक करणार....

वादग्रस्त गोष्टी उकरून काढायला भक्कम बहुमत लागते. >>>>>>>> मग शांत बसावे......हे सरकार देखील ५० पक्षांना घेउन बनलेले आहे ......

राजकारणांत भ्रष्टाचार झाकण्यात काँग्रेस कमालीची परिपक्व आहे. <<< + infinity.

Those bunch of people are really very shrewd.

अशा वादग्रस्त गोष्टी उकरून काढायला भक्कम बहुमत लागते.
----- जुजबी बहुमत पण प्रचंड इच्छाशक्ती आणि जनतेशी कमालिचा प्रामाणिक पणा लागतो.

Pages