काही गोष्टी ज्या केल्याच पाहिजेत

Submitted by मोहन की मीरा on 17 April, 2012 - 01:13

आपण कळत नकळत अनेक गोष्टी करत असतो. काही समजुन काही नकळत पणे. पण काही गोष्टी "मस्ट" विभागात मोडतात. की ज्या केल्याच गेल्या पाहिजेत. मी माझ्या परीने वर्गीकरण केले आहे.

रोज करायच्या गोष्टी.

१. तुमच्या आई वडिलांशी बोला. मुलांशी बोला. जोडीदाराशी बोला. काहितरी हितगुज करा.
२. तुमचा ज्याकोणावर विश्वास आहे त्यांची मना पासुन प्रार्थना करा.
३. लवकर उठा, पटकन आवरा आणि आपल्या कामाला लागा. काहीच काम नसेल तर सुंदर पुस्तक वाचा.
४. रोज आपल्या आयुष्या बद्दल सकारात्मक स्वप्न पहा.
५. नीदान आर्धातास चाला. कधीही. कुठेही. पण नक्की चाला.

दर आठवड्याला करायच्या गोष्टी

१. आपले जवळचे कुटुंबीय सोडुन नीदान ५ इतर लोकां बरोबर बोला. त्यांना फोन करा.
२. एखादा कार्येक्रम, नाहीतर कट्ट्यावर जरुर जा. थोडे लोकांत मिसळा. काहीच नाही तर शेजार्‍यांशी बोला.
३. मनसोक्त इंटरनेट ब्राउस करा, नाहीतर गेम खेळा.
४. आवडता पदार्थ खा. मनसोक्त खा.
५. तुमच्या जोडीदारा ला एखाद्या गोष्टीत मदत करा. मग ते कीचन मध्ये असो वा कपाट आवरणे असो.

दर महिन्याला करायच्या गोष्टी

१. आपले सगळे देणे द्या. जसे इ.एम. आय, लाइट बील, गॅस बील, फोन बिल , इ.
२. आपल्या मित्र मैत्रिणींशी बोला
३. एखादं पुस्तक वाचुन संपवा.
४, आवडता सीनेमा/ नाटक/ गाण्याचा कार्येक्रम पहा
५. ब्युटी पार्लर, स्पा, ला भेट द्या. रीलॅक्स व्हा.

दर वर्षी करायच्या गोष्टी.

१. मेडीकल चेक अप करा
२. आपले आर्थीक गणित आणि पुढल्या योजना ठरवा.
३. एखाद्या मस्त ठीकाणी कुटुंबाला घेवुन जा. मजा करा. मोबाईल ऑफ ठेवा. फोटो काढा.
४. एखादे कौटुंबीक स्नेह संमेलन आयोजीत करा. सगळ्यां शी बोला. कॉन्टॅक्ट ठेवा.
५. एखाद्या गरजु विद्यार्थ्याला मदत करा. एखाद्या संस्थेला मदत करा.

आयुष्यात एकदा तरी करायच्या गोष्टी.

१. एखाद्या चांगल्या कामा साठी पाठ पुरावा करा.
२. आयुष्यातली भीती घालवा
३. एखादे आयुष्य वाचवा / घडवा
४. प्रेमात पडा. मग ते माणसांच्या असुदे, एखाद्या संस्थेच्या असुदे वा एखाद्या छंदाच्या असुदे. पण प्रेमात नक्की पडा
५. तुमच्या मुलांचे मित्र बना.

ह्या मला वाटलेल्या काही मस्ट गोष्टी. कदाचित तुम्ही आधी कुठे वाचले असतिल. आपण अशा अनेक रीझोल्युशन्स बनवतो. हे करु ते करु पण वेळे अभावी अनेक सुटुन जातात. पण अशा काही गोष्टी मात्र कराव्याच लागतात. माझ्या साठी ची ही "मस्ट" गोष्टींची लिस्ट.

तुमच्या काय आहेत?

गुलमोहर: 

मोकिमी , अजुन काही गोष्टी सुचवू का?
प्रवास, नविन जागा , शहरं ,संस्क्रुती शी ओळख करुन घेणे. शक्य झाल्यास दरवर्षी करण्याच्या गोष्टी. Happy

रीडर्स डायजेस्ट मधली एक यादी अंधुकशी आठवतेय.
त्यात वर्षातून किमान एकदा सूर्योदय बघा; तुम्हाला आवडत नसलेली एक गोष्ट करा हे होते.
यादीचा शेवट 'आईला फोन करा' असा होता.

मोकिमी , अजुन काही गोष्टी सुचवू का?>>>

सुचवा ना !!! तुमच्या "टु डु " च्या कल्पना काय आहेत हे समजुन घ्यायलाच हा धागा आहे.

रोज करायच्या गोष्टी
१. Trafic Signal पाळा
२. वर्तमान पत्र वाचा.

दर आठवड्याला करायच्या गोष्टी
१. मुलांबरोबर खरेदी (भाज्या, वाणसामान इ.) करा

गदिमांच्या एका प्रसिध्द गीतातल्या काही ओळी आठवल्या

"उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला |
जग हे बंदीशाला ....जग हे बंदीशाला || "

असो पण काहीच न करण्या पेक्षा काही तरी ...भले निरर्थकही सही ...पण करत रहावं माणसाने Happy

महिन्यातून एकदातरी एखादा चांगला सिनेमा पहायचा, एखादं नवीन (आणि जाडजूड Proud ) पुस्तक वाचायचं.

राणाजी...

तसं तर काय सगळच निरर्थक असतं. पण सामान्य जीव जगत रहातात, आपल्या परीने काही तरी खुडबुड करत रहातात. म्हणुन तर हे जग चालतं. नाही तर काय सगळी दुनीया मिथ्या आहे.

रोज करायच्या गोष्टी.

जमेल तिथे पाणी वाचवा, वीज वाचवा. रस्त्यावर कचरा करू नका. थुंकू नका, वाहतुकीचे नियम पाळा.
हे देखील करायलाच हवे.. Happy

मोहन कि मीरा , मस्त लिस्ट. यातल्या बर्‍याच गोष्टी मी करते, काही राहुन गेल्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न करायला हवा, या पुढे Happy

मोहन कि मीरा , मस्त लिस्ट. यातल्या बर्‍याच गोष्टी मी करते, काही राहुन गेल्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न करायला हवा, या पुढे Happy

मोहन कि मीरा
सुंदर्,सकारात्मक्,प्रॅक्टिकल व सुखदायक
अभिनंदन
आणखी एक
रोज एक सुंदर गाणे स्वतःशीच गुणगुणा , व बिल्डिंग मधील चौकिदार/ ड्रायव्हरशी बोला/ कमीत कमी त्याला पाहून स्मित करा/ त्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करा/ मी करतो अन मला खूप सुख मिळते.आठवड्यातून एकदा तरी

मोकिमी.. अगं किती योगायोग म्हणायचा हा.. मागच्या आठवड्यात एका मैत्रीणीकडे लंच करता आमंत्रण होतं तेंव्हा आम्ही हा खेळ खेळलो. दोन मिनिटात रोजची,आठवडी,मासिक्,वार्षिक इ. अ‍ॅक्टीविटीज लिहून काढायच्या होत्या. दोन मिनिटात जिची यादी सर्वात लांब होती(आणी वॅलिड) ती हा खेळ जिंकली..
तुझी यादी खूपच आवडली,वेरी प्रॅक्टिकल!!.. सर्वात शेवटची कॅटेगिरी तर फारच आवडली.
पुष्कळशी माझ्या यादीशी मिळतीजुळती..
तुझ्या यादीबरोबर माझ्या रोज करण्याच्या गोष्टी- काहीनाकाही नवीन गोष्ट शिकणे, कटाक्षाने फालतू विषयावर वादविवाद टाळणे,गॉसिप मधे भाग न घेणे,कुणालाही क्रिटिसाईज न करणे, पेशंस ची प्रॅक्टिस करणे, घरात आणी बाहेर जिथे जाऊ तिथे आनंदी,हसरे वातावरण निर्माण करणे,जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव वर जा, एकत्र बसून टीवी /सिनेमा पहा.. किंवा एकमेकांशी न बोलता पण एकमेकांच्या सान्निध्यात बसून पुस्तकं वाचा..

महिन्यातून एकदोन वेळा मित्रमंडळी करता वेळ काढा, त्यांच्याबरोबर जेवण/कॉफी करता बाहेर जा किंवा त्यांना घरी बोलवा.
इ.इ.इ..

मोहन कि मीर!
मस्त धागा! मस्ट गोष्टींची मस्त लिस्ट! निवडक १० त सामील. आयुष्याची " To Do list". कस आहे ना या खर तर सोप्या,महित असलेल्या, आणि पटलेल्या गोष्टी.. To Do च्या स्वरुपात तू दिल्या मुळे Follow up केल्या जातील. आदतसे मजबूर Happy

काहीनाकाही नवीन गोष्ट शिकणे, कटाक्षाने फालतू विषयावर वादविवाद टाळणे,गॉसिप मधे भाग न घेणे,कुणालाही क्रिटिसाईज न करणे, पेशंस ची प्रॅक्टिस करणे, घरात आणी बाहेर जिथे जाऊ तिथे आनंदी,हसरे वातावरण निर्माण करणे,जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव वर जा, एकत्र बसून टीवी /सिनेमा पहा.. किंवा एकमेकांशी न बोलता पण एकमेकांच्या सान्निध्यात बसून पुस्तकं वाचा..

वर्षू: तुझा प्रतिसाद पण तितकाच छान! मेरी भी जिंदगीका प्रिस्क्रिप्शन येइच!

वार्षिक गोष्टींमध्ये भर घालावीशी वाटलेली गोष्ट.
तुमच्या कामाच्या संदर्भात नवीन झालेले बदल समजावेत म्हणून एखादा छोटा शैक्षणिक अभ्यासक्रम करावा.

सुंदर एकदम सुंदर यादी दिलीत आपण.
फक्त एक बदल दर आठवड्याला करायच्या गोष्टीत करावा वाटतो तो असा:
- आठवड्यातून एकदा इंटरनेट अन मोबाईल बंद ठेवा. मोबाईल बंद करणे शक्य नसेल तर फारफार तर ऑफीसातले, महत्वाचे नसलेले फोन तरी घेवू नका.

अरे इकडे पाहिलेच न्हवते....

धन्स लोक्स... सगळ्यांना आवडली यादी.... खरच तुमच्या सुचना ही मस्त आहेत. मी शक्यतो हे पाळायचा प्रयत्न करते. १००% नाही तरी ९०% तर नक्कीच.

मोबाईल फोन बंद ठेवण्याची आयडीया मस्तच!!

वर्षु ताई मस्त प्रतिक्रिया.

बिल्डिंग मधील चौकिदार/ ड्रायव्हरशी बोला/>>>>
हे मी बर्‍याचदा करते. तसेच काम वालीशी पण बोलते. ऑफीस मधला पॅन्ट्री बॉय, ऑफीस बॉइज... ( माझा बॉस मला त्यांची "बडी बहन" म्हणतो. )

सेना आणि प्रीती ची सुचना पण मस्त.

खरच तुम्हा सगळ्यांचे आभार.

चीपर बाय द डझन म्हणुन फ्रँक ग्रील्ब्रेथ ह्या मोशन स्टडी वर भरपुर अभ्यास असणार्‍या माणसाच्या मुलांनी लिहिलेले त्याचे चरित्र. मंगला नीरगुड्करांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

त्यात त्यांना ( फ्रँक ना) एक माणुस विचारतो की तुम्ही सतत वेळ वाचवणे, भराभर गोष्टी नीट करणे ह्या वर भर देता. पण आहो वाचलेल्या वेळाचे काय करायचे?

फ्रँक उत्तर देतात " मस्त ग्लास भरुन आपल्या जोडीदारा बरोबर वेळ घालवा, त्या वाचलेल्या वेळाचे सार्थक होइल"

खरोखर ज्यांना उरलेल्या वेळाचे काय करु कळत नाही त्यांच्या सारखे करंटे तेच.

ह्या वरील उल्लेखाचा ह्या लेखाशी काहीच संबंध नाही. पटकन आठवलं म्हणुन शेअर केलं.

( माय बोली आता व्यसन होत चाललेलं आहे)

मोकिमी..अगं रोज करायच्या गोष्टीत एक महत्वाची विसरलीस की...
रोज दिवसातून कितीतरी वेळा माबो वर चक्कर मारायचीच... Lol

Pages