आपण कळत नकळत अनेक गोष्टी करत असतो. काही समजुन काही नकळत पणे. पण काही गोष्टी "मस्ट" विभागात मोडतात. की ज्या केल्याच गेल्या पाहिजेत. मी माझ्या परीने वर्गीकरण केले आहे.
रोज करायच्या गोष्टी.
१. तुमच्या आई वडिलांशी बोला. मुलांशी बोला. जोडीदाराशी बोला. काहितरी हितगुज करा.
२. तुमचा ज्याकोणावर विश्वास आहे त्यांची मना पासुन प्रार्थना करा.
३. लवकर उठा, पटकन आवरा आणि आपल्या कामाला लागा. काहीच काम नसेल तर सुंदर पुस्तक वाचा.
४. रोज आपल्या आयुष्या बद्दल सकारात्मक स्वप्न पहा.
५. नीदान आर्धातास चाला. कधीही. कुठेही. पण नक्की चाला.
दर आठवड्याला करायच्या गोष्टी
१. आपले जवळचे कुटुंबीय सोडुन नीदान ५ इतर लोकां बरोबर बोला. त्यांना फोन करा.
२. एखादा कार्येक्रम, नाहीतर कट्ट्यावर जरुर जा. थोडे लोकांत मिसळा. काहीच नाही तर शेजार्यांशी बोला.
३. मनसोक्त इंटरनेट ब्राउस करा, नाहीतर गेम खेळा.
४. आवडता पदार्थ खा. मनसोक्त खा.
५. तुमच्या जोडीदारा ला एखाद्या गोष्टीत मदत करा. मग ते कीचन मध्ये असो वा कपाट आवरणे असो.
दर महिन्याला करायच्या गोष्टी
१. आपले सगळे देणे द्या. जसे इ.एम. आय, लाइट बील, गॅस बील, फोन बिल , इ.
२. आपल्या मित्र मैत्रिणींशी बोला
३. एखादं पुस्तक वाचुन संपवा.
४, आवडता सीनेमा/ नाटक/ गाण्याचा कार्येक्रम पहा
५. ब्युटी पार्लर, स्पा, ला भेट द्या. रीलॅक्स व्हा.
दर वर्षी करायच्या गोष्टी.
१. मेडीकल चेक अप करा
२. आपले आर्थीक गणित आणि पुढल्या योजना ठरवा.
३. एखाद्या मस्त ठीकाणी कुटुंबाला घेवुन जा. मजा करा. मोबाईल ऑफ ठेवा. फोटो काढा.
४. एखादे कौटुंबीक स्नेह संमेलन आयोजीत करा. सगळ्यां शी बोला. कॉन्टॅक्ट ठेवा.
५. एखाद्या गरजु विद्यार्थ्याला मदत करा. एखाद्या संस्थेला मदत करा.
आयुष्यात एकदा तरी करायच्या गोष्टी.
१. एखाद्या चांगल्या कामा साठी पाठ पुरावा करा.
२. आयुष्यातली भीती घालवा
३. एखादे आयुष्य वाचवा / घडवा
४. प्रेमात पडा. मग ते माणसांच्या असुदे, एखाद्या संस्थेच्या असुदे वा एखाद्या छंदाच्या असुदे. पण प्रेमात नक्की पडा
५. तुमच्या मुलांचे मित्र बना.
ह्या मला वाटलेल्या काही मस्ट गोष्टी. कदाचित तुम्ही आधी कुठे वाचले असतिल. आपण अशा अनेक रीझोल्युशन्स बनवतो. हे करु ते करु पण वेळे अभावी अनेक सुटुन जातात. पण अशा काही गोष्टी मात्र कराव्याच लागतात. माझ्या साठी ची ही "मस्ट" गोष्टींची लिस्ट.
तुमच्या काय आहेत?
<<<<रोज दिवसातून कितीतरी वेळा
<<<<रोज दिवसातून कितीतरी वेळा माबो वर चक्कर मारायचीच... हाहा>>>>( माय बोली आता व्यसन होत चाललेलं आहे)>>>> + ++++ 1
>>>>>नीदान आर्धातास चाला.
>>>>>नीदान आर्धातास चाला. कधीही. कुठेही. पण नक्की चाला.
दीर्घ नी सोडता हा मुद्दा प्रचंड पटला अर्थात त्याचा अर्थ आचरणात आणला असे नव्हे.
Pages