तिळगुळ घ्या गोड बोला!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सन्क्रान्तीच्या सर्व मायबोलीकराना हार्दिक शुभेच्छा!

आज पुन्हा इथे लिहीण्याचे कारण इतकेच की साधारण साडे पाच वर्षापूर्वी मायबोलीवर नाव नोन्दवले. नोन्दवले या अर्थी की रीतसर एक ID घेवून इथे येवू लागलो.. इथल्या अनेक कला अन कलाकार मन्डळीन्ची जस जशी ओळख (वैयक्तिक नव्हे पण अशीच मायबोलीच्या व्यासपीठावर) होत गेली तस तशी इथे येण्याची अन जमलच तर काहितरी लिहीण्याची आवड किव्वा सवय झाली म्हणा. या गेल्याच पाच वर्षात इथला पसारा इतका वाढला की शेवटी केवळ स्वयंसेवी संस्था न रहाता ऍडमीन ना याची सनद्शीर पणे कम्पनी बनावावी लागली.. मला वाटत हा इथला एक महत्वाचा व्यावसायिक टप्पा आहे पण याहीपेक्षा आजवर इथे सादर केल्या गेलेल्या अनेक लिखाण, कविता, इतर साहित्य्यात अनेक महत्वाचे टप्पे येवून गेले.. जसे इथला दिवाळी अन्क, गणेशोत्सव इत्यादी.

माझ्या बाबतीत वैयक्तीत बोलायच तर गेले पाच वर्षे इथे अनेक प्रकारचे लेखन करून त्यातून मिळालेले समाधान, मायबोलीकरान्चे प्रेम, लोकसन्ग्रह, हा एक अमूल्य ठेवा आहे. गेल्या पाच वर्षाच्या येथील माझ्या ऊपद्व्यापान्चा हा छोटासा आढावा (२००४ मधील लेखान्पासून सुरुवात करत आहे):

मायबोलीवरील माझा तसा पहिला लेख म्हणून पतंग या ललित लेखाचा उल्लेख करता येईल. (पतंग भाग १, भाग २भाग ३) आज या लेखातून पुन्हा एकदा निलेश (बदलेले नाव) अन सन्क्रान्तीबरोबर येणारे पतंग यान्ची नव्याने आठवण आली..(पाच वर्षापूर्वी डोळ्यात पाणि आले होते.) अजूनही जिवन हे पतंगासारखेच भासते, कधी आपल्याच मद मस्त धुन्दीत झुलणारे, कधी सैर भैर, कधी सन्थ होवू पाहणारे तर कधी सभोवारच्या तरन्गान्वर फक्त हेलकावणारे.. पतन्गाचा मान्जा शाबूत आहे तोपर्यन्त उडत रहायचे.. जमलच तर उन्च झेप घेत रहायचे... या पतंगाची दोर ज्याच्या हातात आहे त्याची मर्जी असेतोवर मोकाट जगून घ्यायचे!

या अशा प्रवासात मग अनेक अनुभव येतात, अन जसे मायबोलीवरील वाचकानी हळू हळू माझ्या लिखाणाबद्दल प्रोत्साहन दिले तसे मग हे प्रवासातले अनुभव मी लिहीत गेलो..
"एक न सम्पलेला प्रवास" हा त्यापै़कीच एक अनुभव. 150 kb file size limit ची मर्यादा असल्याने या जतन केलेल्या लेखाचे अनेक भाग इथे द्यावे लागत आहेत, त्याबद्दल दिलगीर आहे. (भाग १, भाग२, भाग३, भाग४, भाग५, भाग६, भाग७, भाग८, भाग९, भाग१०)

या दरम्यान इतर बरेच काही लिहीले असली तरी खालील काही निवडक लेख मला आवडतात्, किव्वा i enjoyed writing them असे म्हटले तरी चालेल..म्हणून जतन करून ठेवले आहेत. अर्थात इथे 150kb file limit असल्याने एक सम्पूर्ण मोठा लेख अन्के भागात upload करावा लागला आहे. सर्वात महत्वाचे (निदान माझ्या दृष्टीकोनातून) म्हणजे या लेखान्वरील प्रतीक्रीया. निव्वळ लेखापेक्षा मायबोलीवरील अनेक प्रकारच्या अनेक वाचकानी दिलेल्या प्रतिक्रीया फार मोलाच्या वाटतात. लेखा बरोबर त्यावरील प्रतिक्रीया वाचल्यावर वाचकाचा असा स्वताचा दृष्टीकोन समोर येतो:
१. arranged marriage institution वर अन तशी केन्द्रे चालवणार्यान्बद्दल हा लेखः वधू वर केन्द्र (भाग१ भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ भाग ८ )

२. पुन्हा एकदा arranged marriage मधे घडणार्‍या काही typical घटना, विशेषता जेव्हा एक पार्टी मुम्बईची अन एक पुण्याची असते तेव्हा.तह

३. ज्योतीबाच्या यात्रेचा एक सुन्दर अनुभव शब्दबद्ध करायचा हा एक प्रयत्न. ज्यानी ही यात्रा अनुभवीली त्यान्च्या प्रतीक्रीयान्मूळे या लेखाला अजून जिवन्त स्वरूप आले असेही म्हणता येईल. "ज्योतिबाच्या नावान चान्गभल!" (भाग१, भाग२, भाग३, भाग४, भाग५ भाग६)

४. "हा माझा मार्ग एकला" ही कथा लिहायला घेतली तेव्हा इतकी मोठी कथा लिहू शकेन याची खात्री नव्हती. त्यातूनही मायबोलीवर देवनागरी टाईप करणे हा तसा नविन अनुभव असल्याने this was a bigger challenge... पण एकदा तन्द्री लागली अन शब्द अपोआप लेखणितून येवू लागले की लिहायला वेगळीच मजा येते... हा माझा मार्ग एकला ही कथा मला वाटता त्यावरील प्रतिक्रीयान्मुळे अधिक फुलली Happy खर तर या कथेला "काय ही टिम्बा टीम्बान्ची कहाणी" (cause of the ... in the writing style) म्हणणारे वाचक पासून ही कथा तुझ्या आयुष्यातीळ घटनान्वर आहे का रे? असे आवर्जून चक्क फोन वर विचारणारे मायबोलीकरही इथेच भेटले.. यातून उलट मला इथल्या वातावरणात एक वेगळाच आपलेपणा वाटू लागला. बर्‍या वाईट सर्व प्रतिक्रीया येत असतात, काही प्रतिक्रीया मुद्दामून "तीरकस" असतात तर काही थेट आव्हान देणार्‍या.. या सार्‍यातून अर्थातच बरच काही शिकायलाही मिळाले.
हा माझा मार्ग एकला(भाग १, भाग२, भाग३, भाग४, भाग५, भाग६, भाग ७, भाग८, भाग९, भाग१०, भाग११, भाग १२, भाग१३)

ही कथा पूर्ण केल्यावर इथे लिहू शकतो अन मह्त्वाचे म्हणजे एक सक्षम, जबाब्दार वाचक वर्गही मिळतो याची पूरेपूर खात्री पटली. मग काय मायबोलीवर येणे, लिहीणे हे नित्त्याचे झाले.. कधी कविता, कधी ललित, कधी विनोदी साहित्त्य, कधी तर चक्क व्यन्गचित्रान्पर्यन्त मजल मारली. अर्थात यात मायबोलीची जागा "फुकटात" उपलब्ध करून देणार्या admin महाशयान्चा मोठा हातभार लागला हेही तितकच खर.

To be continued....

विषय: 
प्रकार: 

नमस्कार.
बरेच दिवस झालेत तुमचे ललित वाचुन. आता येउ द्या.

तुम्ही छान केलत तुमच लिखाण इथे दिलत ते.
वाचायला तरी मिळाल Happy
तह वाचुन ह ह पु वा Happy
जोतिबाला फार वर्षापुर्वी जावुन आलात अस दिसतय. Happy
चैत्रात तिकडे यात्रा असते आणि अशा वेळी जाण म्हणजे अतिप्रचंड गर्दी सहन करण आलच. अलिकडे तर रविवारी देखिल अशीच गर्दी असते.
बाकी कायबी म्हणा कोणत्याही प्रदेशाच खरखुरं रुपडं आपल्याला खेड्यात गेल्याशिवाय कळात नाही आणि हे कळण सोप्प हव असेल तर लाल डब्याने लोकल गावांचा प्रवास करावा.
वर्णन झक्कास केल आहे तुम्ही. Happy
कथा वाचेन निवांतपणे.
तुमची समर्थ लेखणी अजुन झरण्याची वाट बघतोय Happy