चेहरा पाहताच थिजलो मी
आसवांच्या सरीत भिजलो मी
मीरच्या आर्त आर्त गझलेसा
जाळुनी आसमंत विझलो मी
तू म्हणालीस मी तुझी नाही
शक्यता एक व्हायची नाही
एवढेही म्हणू न शकलो मी
तूच नसलीस तर कुणी नाही
शेवटी हेच व्हायचे होते
की तुला दूर जायचे होते
हे तुलाही अमान्य होते पण
हेच गोंदून घ्यायचे होते
हात केलास जात असताना
तू कुणाचेच लक्ष नसताना
हासलो मी उगाच रडवेले
आणि रडलीस तूहि हसताना
ठीक आहेस ऐकले आहे
ऐकणे काम राहिले आहे
तू न माझी न मी तुझा कोणी
आपले सर्व संपले आहे
पण तरी वाटते अधेमध्ये
की तुला सांगते अधेमध्ये
जी हवा धाडतेस तू चुकुनी
ती इथे पोचते अधेमध्ये
याइथे तोच तो ऋतू आहे
आजही लोचनी रडू आहे
पण कशाला तुला कथा सांगू
मी तसाही म्हणा कडू आहे
आजही सांज वाटते खुनशी
आजही रात्र भासते खुनशी
तू विचारू नकोस की येथे
का सकाळी उजाडते खुनशी
सांग ना की तुझे तरी हल्ली
चालते का तुझ्या घरी हल्ली
तू नि तो यामधे तुलासुद्धा
भासते होय ना दरी हल्ली
मान्य आहे.. तुझ्या कुटुंबाला
देत असशीलही तसल्ली तू
पण मला सांग ना खरे अगदी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय करतेस काय हल्ली तू
काय करतेस काय हल्ली तू
===================
-'बेफिकीर'!
व्वा!! मस्तच कविता.
व्वा!!
मस्तच कविता.
मस्त
मस्त
माझी ष्टोरी तुम्हाला कशी
माझी ष्टोरी तुम्हाला कशी कळाली?
पण तरी वाटते अधेमध्ये की तुला
पण तरी वाटते अधेमध्ये
की तुला सांगते अधेमध्ये
जी हवा धाडतेस तू चुकुनी
ती इथे पोचते अधेमध्ये
!!!
_____/\_____
खूप आवडली.
बेफिजी खुप सुंदर
बेफिजी खुप सुंदर
मला खुप आवडली ही कविता..
मला खुप आवडली ही कविता..
नेहमीची नजाकत, सौंदर्य नाही.
नेहमीची नजाकत, सौंदर्य नाही. बेफिकीरजी, आपली कवित वाटत नाही. क्शमस्व.
आजही सांज वाटते खुनशी आजही
आजही सांज वाटते खुनशी
आजही रात्र भासते खुनशी
तू विचारू नकोस की येथे
का सकाळी उजाडते खुनशी
क्या ब्बात !!!!
छानच !!
जबर्दस्त!!
जबर्दस्त!!
मस्त
मस्त
च।न्गलि व।ट्ली ट्।यपिन्ग निट
च।न्गलि व।ट्ली ट्।यपिन्ग निट जम् त न्।हि क्श्म्स्व
काही शब्द उगाचच परत परत येतात
काही शब्द उगाचच परत परत येतात आणि खटकतातही. एवढा मोठा साहित्य-पसारा असलेला माणूस असा शब्द-दरिद्री तरी नक्कीच नसणार ! नाही आवडली !
ठीक आहेस ऐकले आहे ऐकणे काम
ठीक आहेस ऐकले आहे
ऐकणे काम राहिले आहे
तू न माझी न मी तुझा कोणी
आपले सर्व संपले आहे..
ह्या ओळिंबद्धल काय तारिफ करु तुमची तेवधी कमिच आहे..
खुप खुप खुप सुन्दर अगदि मनापासुन
दंडवत! मोजक्या शब्दात नेमक
दंडवत!
मोजक्या शब्दात नेमक मांडण्याच अजब कसब आहे ज्यात त्या तुमच्या प्रतिभेला दंडवत!
-सुप्रिया.
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
बेफिकीरजी, फारच सुंदर!
बेफिकीरजी, फारच सुंदर!
वाह...
वाह...
स्तब्ध करून टाकणारी कविता.
स्तब्ध करून टाकणारी कविता. स्पीचलेस.
तेव्हढं एक 'खुनशी ' कडवं रसभंग करणारं वाटलं .
सहमत आहे भारती सर्वांचा
सहमत आहे भारती
सर्वांचा आभारी आहे
आवडली
आवडली
मस्तच!!
मस्तच!!