बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असते कमविलेल्या अपयशावर
मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)
ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्या पावलांवर
ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्यावर!
जवळ कायमचे नको आहे तुला कोणी कधीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!
नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!
नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/04/blog-post.html)
अप्रतीम. खुप आवडली
अप्रतीम. खुप आवडली
ती समजते - 'संकटांशी एकटी
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)...... क्या बात !!!..
जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!................पहिल्या मिसर्यात एक गुरु कमी आहे.
चांगली गझल.
आवडली कमवलेल्या >>> हा शब्द
आवडली
कमवलेल्या >>> हा शब्द जरा खटकतोय. पण गझलेत अशी सूट असावी (मी अज्ञानी बालक!).
शेवटचा शेर खासच
Chhan
Chhan
कमवलेल्या >>>>> त्या ऐवजी
कमवलेल्या >>>>>
त्या ऐवजी ''कमविलेल्या'' ही चालेल.
ती समजते - 'संकटांशी एकटी
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?
कया बात है!
वाह नचिकेत........
वाह नचिकेत........ सुंदरच......
<<ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?) >>
मस्तच.....
<<भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्यावर!>> हे तर खासच......
सुंदर......
सुंदर......
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्या पावलांवर...... आफाट शेर
गझलही छानच!!
ती समजते - 'संकटांशी एकटी
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)... झक्कास!
जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!........व्वा व्वा, सखोल निरिक्षण अचूक शब्दबध्द केलय आपण...:-)
-सुप्रिया.
>>जवळचे कोणी नको आहे तुला
>>जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!.
सुप्रियांना अनुमोदन. वरील ओळी मलाही भावल्या.
नचि, झकास ! आवडली.
नचि, झकास ! आवडली.
चांगली गझल...आवडली
चांगली गझल...आवडली
छान!
छान!
आवडली रे
आवडली रे
(No subject)
जवळचे कोणी नको आहे तुला कायम
जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी>> 'ही' राहिला का?
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा>> मिसरा छान आहे
सुंदर.....
सुंदर.....
अंतिम शेर कातील! जयन्ता५२
अंतिम शेर कातील!
जयन्ता५२
जवळचे कोणी नको आहे तुला कायम
जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!
नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!
सुपर्ब!!
राजा-राणी... एकदम खास!
शेवटचा शेर खूप आवडला. बाकी
शेवटचा शेर खूप आवडला.
बाकी ठिकठाक वाटली.
ओठभर चव घेउनी, उष्टावले
ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!
नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!>>>>>
हे शेर खूप आवड्ले
रान रेंगाळून जाते .........हाही अफाट !!
जवळचे कोणी नको आहे
जवळचे कोणी नको आहे तुला>>>>>>>>>>हाही खूप छान
रान रेंगाळुन.. राजा राणी --
रान रेंगाळुन.. राजा राणी -- एकदम खास
खूपच छान -
खूपच छान -
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्या पावलांवर
जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!
आवडेश!
<<बिचकते आयुष्य माझे आयते यश
<<बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असतो कमवलेल्या अपयशावर<<<
अफाट आवडला हा शेर! नचिकेत्...तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम!
धन्यवाद दोस्तहो! असाच लोभ असू
धन्यवाद दोस्तहो! असाच लोभ असू द्यावात.
डॉक, होय.. एक गुरू कमी झाला तिथे.. कालगंगेमध्ये एक गझल सुचत होती त्याच वेळी, तो परिणाम झाला इकडे..
सुप्रियाताई,
सुंदर.
सुंदर.
खासंच रे... कातील आवडली
खासंच रे... कातील आवडली
Pages