उद्योजक ओळखा स्पर्धा - ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 April, 2012 - 08:51

धडपड हा तसा प्रत्येक उद्योजकाच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग. उद्योगाची सुरुवात, परिश्रम, आलेले चढउतार, चाखलेलं यश, अपयशाला धीरानं तोंड देणं अशा काही पायर्‍या या प्रत्येकाच्याच व्यावसायिक आयुष्यात दिसून येतात. बर्‍याच उद्योजकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण कुठेना कुठे वाचलेला असतो. त्यातल्या घटनांमुळे तो आपल्या लक्षातही राहिलेला असतो.

'मसाला' हा चित्रपट मांडतो कहाणी एका उद्योजकाच्या धडपडीची...

या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी स्पर्धा - 'उद्योजक ओळखा'.

चला तर मग खेळूया 'उद्योजक ओळखा' हा खेळ..

या स्पर्धेतले तिसरे उद्योजक ओळखण्यासाठी क्लू -

चित्र क्र. १ -

clue3a.jpg

चित्र क्र. २ -

clue3b.jpg

चित्र क्र. ३ -

clue3c1.jpg

या तीन क्लूंचा वापर करू तुम्हांला या उद्योजकाचं नाव ओळखायचं आहे.

खेळाचं स्वरूप आणि नियम येथे पाहता येतील.

एक महत्त्वाची सूचना. Happy

उत्तर देताना तुम्हांला या तिन्ही (किवा सहाही) क्लूंचा उद्योजकाशी काय संबंध, हे सांगायचे आहे. पूर्ण स्पष्टीकरण नसेल, तर उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. शिवाय, 'अमुकतमुक हे उत्तर का?' अशी प्रश्नात्मक उत्तरंही (त्यात उद्योजकाचे नाव बरोबर असले तरी) ग्राह्य धरली जाणार नाहीत. Happy

सर्वप्रथम बरोबर उत्तर देणार्‍या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या खेळाची २ तिकिटे!

आपली उत्तरं या बाफावर लिहा (स्पष्टीकरणासह Happy )आणि जिंका 'मसाला' चित्रपटाची दोन तिकिटं..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वालचंद हिराचंद.

पहिलं वाक्यं स्पेस ऑडिसी मधलं आहे. - हिंदुस्तान एरोनॉटिक्स- वालचंद यांनी स्थापन केली.
दुसरं चित्रं चॉकलेट- रावळगाव चॉकलेट्स- वालचंद ग्रुप
पद्मिनी कपिला- प्रीमीयर "पद्मिनी"- वालचंद ग्रुप

बिल्वा बरोबरच वाटतंय तुझं ऊत्तर फक्त एक बदल मला असा वाटतोय

स्पेस ओडीसी मधलं ते वाक्य HAL 9000 , म्हणतो तर त्या HAL वरून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असावं बहूतेक

बिल्वा,

अभिनंदन Happy तुमचं उत्तर बरोबर आहे. (मघाशी तुम्ही प्रश्न विचारला होतात, म्हणून अभिनंदन केलं नाही Happy )

तुम्ही दिलेलं स्पष्टीकरणही अगदी बरोबर आहे.

पुढचं कोडं जरा कठीण द्यायला हवं आता Proud

वा वा बिल्वा. अभिनंदन!
बिल्वानं संपूर्ण खानदानाला सिनेमा दाखवायचा संकल्प सोडलाय वाटतं. Happy

माप्रा Proud धन्यवाद!
'अमुकतमुक हे उत्तर का?' अशी प्रश्नात्मक उत्तरंही (त्यात उद्योजकाचे नाव बरोबर असले तरी) ग्राह्य धरली जाणार नाहीत.>>> हे नंतर वाचलं म्हणून ? काढून टाकलं. Happy

मामी, Lol पण मीच बघू शकत नाही ना Sad

अभिनंदन बिल्वा !

मा_प्रा: बाकीचे पन क्लु द्या .. उत्तर माहिती असतानातरी क्लुचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. Happy