मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

Bookmark 1.jpg

मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.

या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.

या उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.

Bookmark 4.JPG

विषय: 
प्रकार: 

पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे अभिनंदन!!
मायबोली पुस्तकखुणांची कल्पना खरंच अभिनव आहे Happy

एका खरेदीवर किती बुकमार्क्स मिळतील ते कळेल का? प्रत्येक पुस्तकाला एक की एका खरेदीवर एक म्हणजे त्याप्रमाणे मला पुस्तके एकाच कार्टमध्ये टाकायची की वेगवेगळ्या हे ठरवता येईल.

झकास कल्पना !
बर्‍याच दिवसांनी पेशव्याचे शब्द वाचले आणि ..... काय सांगावं? जाऊ दे.
मिल्याच्या ओळीही लई झ्याक.

कुकमार्क्स : अगदी अगदी Happy

@रूनी पॉटर
५०० रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर १ बुकमार्क
१०००रू पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर २ बुकमार्क
१५०० रु पर्यंतच्या पुस्तक खरेदीवर ३ बुकमार्क
....
.....

असे बुकमार्क दिले जातील

मला 'जयवी' ह्यांचा बुकमार्क मिळाला हे त्यांना मी सांगितलच होतं..तो स्कॅन करेपर्यंत इथे लिहायची थांबले होते.
पेशवा, जयवी, मिल्या, नीरजा पटवर्धन, बेफिकीर व श्यामली यांचे अभिनंदन आणि मायबोलीचे ह्या उपक्रमाबद्दल मनापासून आभार व खूप कौतुक! Happy

वा ... सुंदर ... झक्क्स ....

नुस्ते बूकमार्क्स विकाणार का? भेट द्यायला पण खुप छान आहे.

हे बुकमार्क्स आत्ता गेल्या महिन्यात हाती पडले. छान आहेत. मला दोन सेट मिळाले होते. एक गिफ्ट दिला. ज्यांना दिला त्यांना पण खूप आवडले.

पावसाळी हवेने कदाचित पण कागद मऊ पडला आहे. पुन्हा बुकमार्क्स काढले तर लॅमिनेट करून मग वाटप करा कृपया. म्हणजे ते दोरे काढून लॅमिनेट करून त्यावर पंच करून पुन्हा दोरे बांधण्याचा उद्योग करावा लागणार नाही.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून माझ्या ओळी निवडल्याबद्दल मायबोली प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद! Happy
उशीरच झालाय खरतर पण तरी...

Pages