हे माझे आयुष्य नाही! हे माझे लग्न नाही!!

Submitted by निनाद on 2 April, 2012 - 07:57

सामिया - तिचा जन्म ऑस्ट्रेलियातला. वडील मूळचे पाकिस्तानातले. तिला त्यांनी एकदा सांगितले की आपल्याला फिरायला जायचे आहे पाकिस्तानात. तेथे गेल्यावर त्यांनी तिचे लग्न लाऊन टाकले तिच्या चुलत भावाशी. हे लग्न त्यांनी ती फक्त १२ वर्षांची असतानाच ठरवले होते.
या लग्नाला तिची परवानगी नव्हतीच. पण जिवाच्या भितीने हे लग्न पाकिस्तानात पत्करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. परत आल्यावर तिच्यावर तिच्या नवर्‍यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी प्रचंड दबाव आला. तिने ते केले. पाकिस्तानी अशिक्षित मुलांना ऑस्ट्रेलियात येतायावे म्हणून अशी यातायात अनेकदा केली जाते त्यात मुलींचा बळी जातो. पण तिने ठरवले की, हे माझे आयुष्य नाही! हे माझे लग्न नाही!!
पण हे सोपे नव्हते. वडिल ऑस्ट्रेलियात असले तरी समजूती भारतीय उपखंडातल्याच होत्या. त्यांनी धर्म, संस्कृती आणि कुटूंबाची मूल्ये यावरून प्रचंड विरोध केला.
तिने या सगळ्या विरुद्ध लढायला सुरुवात केली.

अजून एका भारतीय मुलीची कहाणीही यात आहे. नवर्‍याने आईवडिलांच्या इच्छेखातर तिच्याशी लग्न केले आणि मग सुरु झाला एक भयानक प्रवास. आता ती घटस्फोटासाठी झगडते आहे. तो ही भारतीय न्यायालयातून. पण ती झगडते आहे न्यायासाठी.

या लढ्याचा आढावा एबीसी टिव्हीच्या फोर कॉर्नर्स या कार्यक्रमात घेतला आहे.

परदेशात जबरदस्तीने लग्न लावल्यावर त्या विरुद्ध लढा देणार्‍या या मुलींवर आलेला फोर कॉर्नर्स हा कार्यक्रम नक्की पाहा.
http://www.abc.net.au/4corners/stories/2012/03/29/3466537.htm

आता ऑस्ट्रेलियात जबरी आणि फसवणूकीने लावलेल्या लग्नांविरुद्ध कायदाच येतो आहे. न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये शक्ती नावाची एक संघटना आता या विषयावर कार्य करते आहे आणि ती या मुलींना मदत करण्याचा प्रयत्न करत असते.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशी किमान ५० प्रकरणे त्यांच्या पर्यंत येतात. येत नाहीत ती किती तरी आहेत, मुली सहन करत राहतात.

या लग्नातून सामिया बाहेर पडू शकली, पण ती ऑस्ट्रेलियात होती म्हणून!
इतरांचे काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या शक्ती संघटनेशी संबंधित काही व्यक्तींशी माझा परिचय आहे. त्यांना त्या देशात पोलिसांचे आणि न्यायालयाचे उत्तम सहकार्य मिळते.