Submitted by आनंदयात्री on 27 March, 2012 - 04:58
समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या
की त्याला 'इक्वेशन सॅटीस्फाय' होणं म्हणतात...
कुठलीही एक बाजू वरचढ झाली की
समीकरण संपतंच!
समीकरण अस्तित्वात आल्या दिवसापासून
ते 'सॅटीस्फाय' व्हावं म्हणून माणूस
त्या 'क्ष' ला शोधतोय - अजूनही सापडत नाहीये!
नात्याचंही समीकरणासारखंच की!
नात्यामधला 'क्ष' तरी कुठं सापडलाय अजून?
फरक फक्त एवढाच आहे -
समीकरणामधल्या 'क्ष'चा शोध येणार्या पिढ्या
तितक्याच आतुरतेने घेत राहतील जगाच्या अंतापर्यंत!
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध कुणाच्याही
इच्छा-अनिच्छांना न जुमानता थांबेल - प्रत्येकाच्या अंतापाशी!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post_20.html)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
मस्तच.......समीकरण छान
मस्तच.......समीकरण छान जमलय........
मुद्दा भारीच आहे
मुद्दा भारीच आहे
बीजगणीताच्या माध्यमातून छान
बीजगणीताच्या माध्यमातून छान व्यक्त केलंय.
विचार आवडलाय. जे सांगायचंच ते
विचार आवडलाय. जे सांगायचंच ते गणितातलं रुपक वापरून सांगितलंय हे ही आवडलंय. फक्त मांडणी आवडली नाहीये.
अगदी 'काटकोन त्रिकोण' नाटक
अगदी 'काटकोन त्रिकोण' नाटक बघितल्यासारखे वाटले. भारी आहे मुद्दा.
क्या बात है.... कविता मस्तच
क्या बात है.... कविता मस्तच झालीय ...
सहज गंमत म्हणुन आठवलं.....
" Dear Math..... I am sick and tired of finding your 'X' for last five years ... you better forget it now and move on..."
धन्यवाद! निंबुडा, हम्म्म...
धन्यवाद!

निंबुडा, हम्म्म...
निंबुडा +१ क्ष च्या शोधासाठी
निंबुडा +१
क्ष च्या शोधासाठी शुभेच्छा

अगदी अगदी! प्रचंड पटली
अगदी अगदी! प्रचंड पटली विचाररूपी कविता..
कविता आवडता आवडता शेवटाला
कविता आवडता आवडता शेवटाला धप्पकन पडली !
मेरेकु विचार समझ्या पण कविता
मेरेकु विचार समझ्या पण कविता म्हणुन झेप्या नै रे आ.या.
भारीच अवघड समीकरण. सहीच. मला
भारीच अवघड समीकरण. सहीच. मला आवडलं.
आहेस कुठे इतक्यात?
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध कुणाच्याही

इच्छा-अनिच्छांना न जुमानता थांबेल - प्रत्येकाच्या अंतापाशी!>>>>नाही पटल रे
बाकी छान लिहली आहेस
आवडली......
आवडली......
फरक फक्त एवढाच आहे
फरक फक्त एवढाच आहे -
समीकरणामधल्या 'क्ष'चा शोध येणार्या पिढ्या
तितक्याच आतुरतेने घेत राहतील जगाच्या अंतापर्यंत!
नात्यामधल्या 'क्ष'चा शोध कुणाच्याही
इच्छा-अनिच्छांना न जुमानता थांबेल - प्रत्येकाच्या अंतापाशी!
शेवट आवडला.
सॅटिस्फाय? इंग्रजी शब्दांनी जरा चव गेल्यासारखे झाले.
(No subject)
मस्त !!
आभार लोकहो! अनुसया हम्म्म...
आभार लोकहो!
अनुसया हम्म्म...
पल्ली, बर्याsssच दिवसांनी?