बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे!
मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या चाली तयारच होत्या.. ९ चालींवर हळूहळू करत मी गाणी लिहिली . बंगाली असले आणि रोजच्या बोलण्यात फारशी मराठी येत नसली तरी सुरोजीतला मराठीची चांगली जाण आहे. कुठेही शब्दांची ओढाताण न होता गायकाला गायला सोपी जावी आणि तितकीच अर्थपूर्णही ... अशी गाणी त्याने माझ्याकडून लिहून घेतली. आणि बघता बघता ९ गाणी अरेंजमेंट होऊन आता ही ध्वनीमुद्रीका प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अल्बम चं नाव आहे ........ 'ये प्रिये'.... गाणी त्या दोघांची!!
वैशाली सामंत आणि हृषिकेश रानडे यांनी या अल्बममधली गाणी गायली आहेत. बरीचशी शास्त्रीय आणि सुगम संगीत यांचा सुरेख संगम होऊन ही गाणी तयार झाली आहेत. काही गाण्यांच्या कमी लांबीच्या (Audio Clip) ध्वनीमुद्रिका खाली देत आहे..
ऐकून पहा.. कशी वाटताहेत सांगा..
दिसे चांद सोवळा.... हृषिकेश रानडे
http://soundcloud.com/panu-ray-surojit-ray/dise-chand
चढलेली ही नशा.. वैशाली- हृषिकेश
http://soundcloud.com/surojit-ray/chadleli-hi-nasha
पाकळ्या रुसल्या जरी.. हृषिकेश
http://soundcloud.com/panu-ray/pakdya-ruslya?
utm_campagin=timeline&utm_content=http%3A%2F%2Fsoundcloud.com%2Fpanu-ray%2Fpakdya-ruslya&utm_medium=facebook&utm_source=soundcloud
जरा झोक्कात गीत .... वैशाली
http://soundcloud.com/panu-ray/zara-jhokath
गंध हलके हलके प्रमाणेच याही अल्बम ला तुम्हा सगळ्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा लाभूदेत.
- प्राजु
*********अॅड्मिन इथे लिंक्स च्या जागी विजेट आणू शकाल काय?*****
अरे वा ! पुढील वाटचालीसाठी
अरे वा !
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
गाणी कशी वाटली ते ऐकून सांगतो परत.
अभिनंदन प्राजु!
अभिनंदन प्राजु!
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
छान
छान
ऐकून लग्गेच कळवतो तोवर
ऐकून लग्गेच कळवतो
तोवर मनःपूर्वक अभिनंदन
========================
योग्य वाटल्यास धाग्याचे शीर्षक बदलावेत, म्हणजे अधिक जणांना कल्पना यावी
मनःपूर्वक अभिनंदन या
मनःपूर्वक अभिनंदन या कामगिरीबद्दल. नक्की विकत घेईन
अरे वा! लगेच घेईन! अभिनंदन
अरे वा! लगेच घेईन! अभिनंदन प्राजु. कधी आणि कुठे आहे कार्यक्रम? माहिती नव्हते. यू ट्युबवर टाकशील फोटोग्राफ्स.
अभिनंदन प्राजु... मराठी
अभिनंदन प्राजु...
मराठी कवितेची पताका आपल्या रचनांतून अशीच फडकत राहो.