एक वेगळाच आनंद

Submitted by शेफाली on 28 March, 2012 - 05:03

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाणे मला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुला हसवण्यापेक्षा तुला त्रास देणे मला पसंद आहे
मिठ्ठीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेला पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.

माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे मला पसंद आहे
तुझे दु:ख वाटुन घेण्यात एक वेगळाच आनंद आहे.

गुलमोहर: 

मस्त,