काही दिवसांपुर्वी मुख्य कंपनीच्या वार्षिक दिनाला उपस्थित रहाण्यासाठी डेन्मार्कला जाण्याचा योग आला. एक आठवडा तेथे वास्तव्य होते. वार्षिक दिना व्यतिरीक्त कंपनीच्या वेगवेगळ्या कारखान्यांना भेटी, त्यासाठी केलेला कार, आगगाडीचा प्रवास, त्या दरम्यान पहायला मिळालेला देश, तेथील लोक, रहाणीमान याचा थोडाफ़ार अंदाज आला. इनमिन ५५ लाख लोकसंख्या असलेला हा देश. (पुण्याची लोकसंख्या ९४ लाखाच्या आसपास आहे, यावरुन डेन्मार्कमधे रस्त्यांवर किती गर्दी असेल याची कल्पना येईलच.
) पण सतत जाणवत राहिले ते म्हणजे, सर्वत्र पसरलेली भयंकर शांतता, कमालाची स्वच्छता, स्वयंशिस्त, अद्यावत सोयीसुविधा, खरे तर ही तुलना योग्य नव्हे हे मला जाणवत होते पण तरीही मन पदोपदी भारताची आणि डेन्मार्कची तुलना करत राहिले. आता तुम्ही म्हणाल, की यात विशेष काय सांगतोय मी.? बरोबर आहे तुमचे. कित्येक मायबोलीकर परदेशी जाऊन आलेले आहेत, बरेच जण तर साता समुद्रापार वास्तव्य करुन आहेतच. त्यांना यात काहीच विशेष जाणवणार नाही. पण माझ्यासाठी खुपच वेगळे विश्व होते ते. असो. मला जे सांगायचे आहे ते पुढे मांडतच आहे पण त्याआधी केलेली ही थॊडीशी प्रस्तावनाच म्हणा ना!
तर माझ्या बरोबर माझा एक भारतीय सहकारी आणि दुसरा सहकारी जो डॅनिश आहे, असे आम्ही तिघेजण होतो. परदेशी सहकार्याचा स्वभाव खुपच चेष्टेखोर आणि बोलघेवडा आहे याची मला चांगलीच कल्पना होती. त्याला कुणाही अनोळखी व्यक्तीशी चेष्टा मस्करी करताना मी बर्याचदा पाहिले होते. त्यामुळे त्याच्या एकुणच मी टिप्पण्यांकडे जरा काणाडोळाच करत होतो.
परत येताना विमानात एक लहानसा प्रसंग घडला. झाले असे की मुंबई विमानतळावर उतरताना, सर्व प्रवासी आपापले सामान घेऊन विमानाचा दरवाजा उघडण्याची प्रतिक्षा करत असताना दोन सहप्रवाशांशी त्याचा खालीलप्रमाणे संवाद झाला. येथे मी मुद्दामच ज्या भाषेत संवाद झाला त्याच भाषेत लिहीत आहे.
परदेशी सहकारी: Oh! I think I lost my passport. Can I go out now? May be I will have to pay some rupees? ( डोळे मिचकावत)
दुसरा प्रवासी: No worries. You need to pay not rupees but Dollars. (हसत)
एक स्त्री सहप्रवासी परदेशी सहकार्याला: I think, you need to be more respectful. (रागाने)
परदेशी सहकारी: Oh! I am always respectful about India. And I was just joking.
हा संवाद इथेच संपला. सर्व प्रवासी उतरले. सर्व सोपस्कार पुर्ण करुन, आम्हीही मार्गस्थ झालो. मात्र मुंबई ते पुणे प्रवासात वरचे संभाषण डोक्यात घोळत राहिले. मी गेल्या काही दिवसातल्या घटना आठवायचा प्रयत्न करु लागलो. माझी दिनचर्या आठवु लागलो तर लक्षात येत गेले ते म्हणजे, सकाळी ऑफीसला घरातुन बाहेर पडल्यावर दिसणारे श्रीमंत घरातल्या कुत्र्यांनी रस्त्याच्या कडेने केलेली घाण, ओसंडुन वाहणार्या कचराकुंड्या, पुण्यातल्या वाहतुकीचा खेळखंडोबा, नो एंट्रीतुन बिनदिक्कत घुसणार्या कंपन्यांच्या बसेस, बीआरटीच्या नावाखाली केलेली नासधुस, दररोज संध्याकाळी स्वारगेटच्या चौकात जीव मुठीत धरुन रस्ता पार करणारा मी, काही आठवड्यांपुर्वी झालेल्या जिल्हा परिषदांमधले विधीनिषेधशुन्य राजकारण, खुद्द पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर दाखवलेला अविश्वास, आणि अश्या बर्याच घटना. विस्तारभयास्तव सर्व घटना येथे लिहीणे टाळतोय.
कदाचित माझा सुर पुर्णपणे नकारात्मक असेल, किंवा पुर्वग्रहदुषीत असेल, किंवा कदाचित माझी दृष्टीच क्षीण झाली असेल. पण खरेच सांगतो, मला अभिमान वाटाव्या अश्या घटनाच आठवेनात हो.
सर्वात महत्वाचे येथे नमुद करु ईच्छीतो ते म्हणजे, मला पण तुम्हाइतकाच माझ्या मातृभुमीचा अभिमान आहे आणि शेवटपर्यंत राहील पण मला जे काही जाणवले आणि मग ही बेचैनी तुमच्यासमोर मांडावी असे कुठेतरी वाटले, म्हणुन हा लेखनप्रपंच.
गिरी भावना पोहचल्या पण अरे
गिरी भावना पोहचल्या
पण अरे अर्धवटच वाटतोय लेख कुठेतरी काहीतरी चुकलय अजुन लिहायला पाहीजे होतेस
अस मला वाटत
भावना व्यवस्थित मांडल्या
भावना व्यवस्थित मांडल्या आहेत....पोहोचल्या!
किश्या, असहमत. थोडक्यात गोडी असते. विस्तार करायचाच तर खूप मोठा झाला असता मग.
गिरी खरेच आहे रे.... किश्या
गिरी खरेच आहे रे....
किश्या शी पुर्णपणे सहमत आहे
गिरीईईईईईईईईईईईई पहिला
गिरीईईईईईईईईईईईई पहिला प्रयत्न यशस्वी झाला:स्मित:
आपल्या देशाची इतर देशाशी तुलना करणे काहि वाईट नाही.... कारण काहि काहि चांगल्या गोष्टी... इतर देशांकडुन शिकणे गरजेचे आहे.... स्वच्छतेच्या बाबतीत तर खरचं आपला देश खुप मागे आहे...
सर्वात महत्वाचे येथे नमुद करु ईच्छीतो ते म्हणजे, मला पण तुम्हाइतकाच माझ्या मातृभुमीचा अभिमान आहे आणि शेवटपर्यंत राहील पण मला जे काही जाणवले आणि मग ही बेचैनी तुमच्यासमोर मांडावी असे कुठेतरी वाटले, म्हणुन हा लेखनप्रपंच....
ज्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा तो बाळ्गावाच.....:स्मित:
मस्स्त लिहिलंय येथे जोरदार
मस्स्त लिहिलंय
येथे जोरदार चर्चा होऊ शकेल
लेख आवडला
परदेशी माणसाचे विधान ऐकून राग येणे साहजिक आहे, तितकेच तुमच्या शीर्षकाप्रमाणे आत्मपरीक्षणही
मंदार खर आहे पण वाचताना अस
मंदार खर आहे
पण वाचताना अस वाटत कि पहीला पॅरा आणी दुसरा पॅराचा काहीच संबध लागत नाही....
पहीला पॅरा वाचताना अस वाटत की आता प्रवासातील अनुभव वाचायला मिळतील आणी त्यावर परीक्षण होईल पण अस काहीच झाल नाही
मस्तच लिहिलयस अरे आम्हाला
मस्तच लिहिलयस अरे आम्हाला सुद्धा पुण्यात आल्यावर असच वाटतं
पण जाऊदे पुणे तिथे काय उणे
महत्वाचा फरक म्हणजे
महत्वाचा फरक म्हणजे डेन्मार्क हा देश आहे आणि पुणे हे एक शहर आहे.
भारतीयांना शिस्त ही फक्त परदेशातच येते..... आपली लोक परदेशात जाउन योग्य शिस्तबध्द वागतात .आणि तीच माणस भारतात आल्यावर शिस्त काय असावी हेच विसरुन जातात..!!! हे चित्र बदलले तर नक्कीच बदल होइल
आपली लोक परदेशात जाउन योग्य
आपली लोक परदेशात जाउन योग्य शिस्तबध्द वागतात .आणि तीच माणस भारतात आल्यावर शिस्त काय असावी हेच विसरुन जातात<<< अगदी अगदी उदय माझ्या मनातले बोललास
गिरी लेख चांगला लिहला आहे
गिरी लेख चांगला लिहला आहे

अजुन विस्ताराने लिहायला हव होत अस वाटतय....
मला पण तुम्हाइतकाच माझ्या मातृभुमीचा अभिमान आहे आणि शेवटपर्यंत राहील>>>>शेवटी हे जास्त महत्वाच
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे हे एका प्रतिसादातून कळलं.
प्रयत्न चांगला आहे. आशय, भावना समजतात.
---------------------------------------------------------------------------------
सरावाने मांडणीत सुधारणा होऊ शकते.
पु.ले.शु.
तुझ्या भावना पोहोचल्या
तुझ्या भावना पोहोचल्या गिरी...
डेन्मार्कचं प्रवासवर्णन आणि पचि येऊदेत
गिरी, चांगला लेख. पण खरं
गिरी, चांगला लेख.
पण खरं सांगु, तुलना करण्यात काही अर्थ नाही. सांस्कृतिक फरक आहे हा.
उदय म्हणतो तसं आपली लोक परदेशात जाउन योग्य शिस्तबध्द वागतात पण तिच आंगिकारलेली शिस्त त्यांनी भारतात अंमलात आणायचा प्रयत्न केला तर ते वेडे ठरतात.
एक उदाहरण देतो.
अमेरीकेत पायी चालणार्या लोकांना प्रेफ्रन्स दिला जातो. कोणि पायी रस्ता क्रॉस करत असेल तर आपण आपली गाडी खुप अली कडे थांबवुन त्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करु देतो. पण तिथे असा पायी रस्ता क्रॉस करणारी क्वचितच आढळते म्हणुन ते शक्य होतं.
हेच जर मी पुण्यात ट्राय केलं तर मला आजुबाजुच्या शेकडो वहानचालकांच्या शिव्या तर खाव्या लागतिलच पण तास तास मला एकाच जागेवर उभे रहावे लागेल.
म्हणुन म्हणतो, तुलना करण्यात काही अर्थ नाही. "जैसा देस वैसा भेस"
गिरीकंद, शीर्षकाच्या मानाने
गिरीकंद,
शीर्षकाच्या मानाने लेख तोकडा वाटला. एखाद्या देशांत जास्त काळ वास्तव्य केले
तर तिथे तसे का आहे, याचा शोध घेता येतो. भारतापेक्षाही गलिच्छ देशात मी
वास्तव्य केले आहे.
पण एकदोन उदाहरणे देतोच. (मी फक्त सार्वजनिक स्वच्छतेबाबतच लिहितोय.
सामाजिक शिस्त हा आणखीनच वेगळा मुद्दा आहे.)
थायलंड काही फार पुढारलेला देश नाही. आणि तिथेही सामाजिक समस्या भरपूर
आहेत. तरीही निदान शहरभागात, तिथे स्वच्छता दिसते. त्याबद्दल मी माझ्या खाजगी
गाईड कडे चौकशी केली. तिने त्याबद्दल सांगितले ते असे.
तो देश पर्यटकांवर अवलंबून आहे आणि पर्यटकांना स्वच्छता आवडते, या दोन गोष्टी तिथे लोकशिक्षणातून सातत्याने सांगण्यात आल्या. शिवाय रस्त्यावर जो कचरा टाकेल, त्याला दंड लागू करण्यात आला आणि तो दंड वसूल करण्यासाठी, पोलिसांना पुरस्कार ठरवण्यात आले.
दुसरी बाब, लहानपणापासून आपण त्यांच्याकडच्या तरंगत्या बाजाराबद्दल वाचत आलोय. मी तिथे असताना, तसे बाजार बघण्यासाठी मुद्दाम गेलो. नदीच्या काठावर
अनेक घरे होती. म्हणजे घराची मागची बाजू पाण्यात तर पुढची बाजू जमिनीवर.
तरीही नदीचे पाणी कमालीचे स्वच्छ होते. त्याबद्दल विचारल्यावर गाईडने सांगितले.
कि नदीच्या पाण्यातले मासे हेच त्या लोकांचे अन्न आहे. पाणी दूषित झाले तर मासे
मिळणार नाहीत, हि बाब देखील लोकशिक्षणातूनच सांगितली गेली. त्यामूळे
ते लोक, नदीच्या पाण्यात कपडे, भांडी धूत नाहीत. त्यासाठी त्यांना वेगळा पाणीपुरवठा केला जातो, आणि सांडपाण्याची देखील वेगळी व्यवस्था आहे.
न्यू झीलंडमधे देखील अशीच स्वच्छता दिसते. त्याबाबत तिथल्या शाळांतूनच शिक्षण
दिले जाते. माझ्याबरोबरची लहान मूले, तिथे रस्त्यावरचा कचरा कुणीही न सांगता
उचलून टाकत असत.
या तिन्ही उदाहरणातून हेच दिसतेय कि तिथे लोकशिक्षणाला किती महत्व दिले
जाते ते.
मागे सावली ने बिबी सुरु केला होता तिथेही मी लिहिले होते, कि आपल्या देशांत
कचर्यात नेमके काय असते ते शोधले तरच त्यावरचे उपाय सापडतील.
(गुटख्याची पाकिटे, फुटलेल्या बाटल्या, प्लॅस्टीक, सडलेला भाजीपाला, रस्तादुरुस्तीत
राहिलेले दगड, कागद, निर्माल्य.... कुठून येतं हे सगळं ?)
दिनेशदांना अनुमोदन
दिनेशदांना अनुमोदन
गिरी, छान लिहिला अहेस लेख.
गिरी, छान लिहिला अहेस लेख. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला.

फक्त अजून थोडं स्पष्ट लिही.
भापो गिरी.... पण हे इतके
भापो गिरी....
पण हे इतके बारीक विचार करीत बसायचे नसते असे म्हणतो. अशी तुलना करून काही म्हणता काहीही साध्य होत नाही, फक्त एकमेकांच्या प्रतिक्रीयांनी मनोरंजन होत असते.
देश जसा जायचा तसा पुढे जातो किंवा मागे रहातो.
सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स वर कॉन्सन्ट्रेट केले की सर्कल ऑफ कन्सर्न रहात नाही कालांतराने. आपण काय बदलू शकतो हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण प्रामाणिकपणे तेवढेच करायचे.
मी १००% टक्के योगदान देत आहे का? ह्या प्रश्नाच्या उत्तरात सगळी उत्तरे आहेत.
आपण काय बदलू शकतो हा प्रश्न
आपण काय बदलू शकतो हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण प्रामाणिकपणे तेवढेच करायचे.
मी १००% टक्के योगदान देत आहे का? ह्या प्रश्नाच्या उत्तरात सगळी उत्तरे आहेत.
>>> १००% टक्के मान्य. सध्या याच मुद्द्यावर स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलायचा प्रयत्न करतोय.
दिनेशदा>> १००% अनुमोदन
दिनेशदा>> १००% अनुमोदन
विदिपा
विदिपा
>>> १००% टक्के मान्य. सध्या
>>> १००% टक्के मान्य. सध्या याच मुद्द्यावर स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलायचा प्रयत्न करतोय.
>>>
गिरी
गिरी पहिला प्रयत्न एकदम
गिरी
पहिला प्रयत्न एकदम यशस्वी. 'थोडक्यात गोडी'च्या बाबतीत मंदारला अनुमोदन. 
ही तुलना होते म्हणजे होतेच.... आपण आपल्या परीने जे करु शकतो ते करायचे. तेवढाच आपला खारीचा वाटा. भ्रष्ट वर्तणूकीपासून आपण दूर रहायचा प्रयत्न करायचा. जे जे चुकीचे वाटते, ते आपण करत नाही आहोत ना? हे तपासून पहायचे.
एक गंमत सांगते, तुला कदाचित माहिती असेल जर्मनीमध्ये कचर्याचे व्यवस्थापन वर्गवारीनुसार होते, म्हणजे जसे ओला कचरा, सुका कचरा यातही अनेक उपविभाग असतात आणि हे नियम पाळले नाहीत, तर दंड होतो. कायद्यामुळे जी गोष्ट जर्मन लोकांच्या अंगवळणी पडली, ती गोष्ट माझी आई मनानेच पाळत होती पहिल्यापासूनच... कचर्याच्या डब्यात प्लॅस्टिकची पिशवी ठेवणे, म्हणजे डबा स्वच्छ राहतो, ओला-सुका कचरा वेगळा ठेवणे, त्यातही चहाची पावडर, केसांचा गुंता, यासाठी वेगवेगळे छोटे कचर्याचे डबे ठेवणे, हे ती पहिल्यापासून करत आलीये, त्यामुळे जर्मनीत आल्यावर मला वेगळी शिस्त घालून घ्यावी लागली नाही.
विनाकारण हॉर्न न वाजवणे, हे मी जाणीवपूर्वक पाळते भारतातही. बाहेरच्या देशाचा अनुभव नव्हता तेंव्हापासूनच.... स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी सिटबेल्ट बांधणे आणि गाडीतील इतरांनाही तशी सक्ती करणे, अशा छोट्या छोट्या सवयी पहिल्यापासूनच आहेत. मलाच नाही, तर भारतात अजूनही बर्याच जणांना आहेत. फक्त आपण सगळे अल्पसंख्य आहोत.
गॅलरीच्या भिंतीवर कुंड्या ठेवल्याने खालच्यांच्या घरात पाणी जातं, शिवाय त्याने निर्माण होणार्या ओघळांनी इमारतींचं सौंदर्य लोप पावतं, गॅलरीत उभं राहून केस विंचरल्याने आणि केसांचा गुंता खाली फेकल्याने तो खालच्यांच्या घरात जातो, ह्या साध्या तारतम्याच्या गोष्टी आहेत. कुठलेही नियम न बनवता पाळता येण्याजोग्या, पण इतरांना होणार्या त्रासाविषयीची संवेदनक्षमता मुळातच कमी असेल, तर मग असल्या काहीही फाल्तू गोष्टींवरुन आपल्या देशात भांडणं होतात.
आपल्या देशातील लोकांमध्ये खुप बारिकसारिक गोष्टी बदलण्याची गरज आहे. जुन्या पिढीला आपण नाही बदलू शकत. पण स्वतःला बदलणे आणि नवीन पिढी घडवणे मात्र आपल्याच हातात आहे. आपण ते नक्की करु शकतो. बी पॉझिटिव्ह!!!!!
चांगला लेख... आवडला. मात्र
चांगला लेख... आवडला. मात्र चर्चा अथवा उहापोह व्हावा या हेतूने तोकडा लिहीलाय की काय असे वाटले.
गिरी, छान लिहिल आहेस
गिरी, छान लिहिल आहेस
सानी, वा, वा. तुमच्यासारखेच
सानी, वा, वा. तुमच्यासारखेच हळू हळू इतरहि लोक वाङू लागतील तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही.
दुर्दैव असे की तुमच्यासारखे लोक इतके थोडे नि वाईट वागणारे लोक एव्हढे आहेत की चांगल्या वागणुकीचे रोपटे वाढेल की नाही याची काळजी वाटते.
लोकशिक्षण हा उपाय चांगला आहे, पण देशात शिकलेले लोक काय कमी आहेत का? गरिबी हे कारणहि सांगितले जाते, पण पैसेवाले लोक तरी धड वागतात का? काय आहे, कुणि चुकून जरी रस्त्यावर कचरा टाकला नि दुसर्या कुणि जरी सभ्यपणे सांगितले की अहो इथे कचरा टाकू नका, तरी त्या कचरा टाकण्यार्याचा अपमान होतो. मग तो मुद्दाम ऐकत नाही.
माझा एक मित्र बडोद्यात सुशिक्षित, श्रीमंत, व सेवानिवृत्त झालेल्या लोकांच्या कॉलनीत रहात होता. तिथे हे सुशिक्षित, श्रीमंत नि अनुभवी लोक खुश्शाल रस्त्यावर थुंकत, ते सुद्धा चालण्यासाठी मुद्दाम बांधलेल्या रस्त्यावर. माझ्या मित्राने बरेच दिवस लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला असे करू नका. सुरुवातीला दहापैकी फक्त तिघांनी ऐकले, पण काही दिवसांनंतर पुनः ये रे माझ्या मागल्या!!!
आपली लोक परदेशात जाउन योग्य
आपली लोक परदेशात जाउन योग्य शिस्तबध्द वागतात .आणि तीच माणस भारतात आल्यावर शिस्त काय असावी हेच विसरुन जातात..!!! हे चित्र बदलले तर नक्कीच बदल होइल
हे विधान अत्यंत मूर्खपणाचे आहे!
परदेशात जाऊन आलेल्यांची संख्या किती, त्यातले वाईट वागणारे किती नि त्या मानाने भारतात रहाणार्यांची लोकसंख्या किती याचा काही हिशेब? नि जरी हे परदेशातून आलेले सगळे चांगले वागले तरी किती फरक पडेल?
उगीच उठायचे नि परदेशी गेलेल्या लोकांना नावे ठेवायची. मत्सर फक्त, बाकी काही नाही. स्वतः कुठलीहि जबाबदारी घ्यायची नाही, कुणाला तरी दुसर्याला शिव्या द्यायच्या!! हे असले लोक गेले समाजातून नाहीसे झाले तरच समाज सुधारेल. त्याचा परदेशी जाण्याचा काही संबंध नाही!!
झक्की, थुंकण्यात आपण काही चूक
झक्की,
थुंकण्यात आपण काही चूक करतोय, असे लोकांना वाटतच नाही.
मला अत्यंत किळस येते हो या प्रकाराची. काही काही शहरे (नाव घेत नाही)
तर थुंकण्यासाठीच प्रसिद्ध आहेत का अशी शंका येते.
आता सध्या लांब केस असणार्या मुली कमी दिसतात, पण बाल्कनीतून केसाची
गुंतवळ टाकणे सहजच घडते.
रस्त्यावरचा भाजीवाला / फेरीवाला रात्री जाताना सगळा कचरा तिथेच टाकून जातो.
कितीही आरडाओरडा केला तरी घराघरातून कचर्याचे वर्गीकरण होत नाही.
पण हे सगळे सांजसकाळ, कानी कपाळी ओरडून सांगणे गरजेचे आहे हो.
गिरी अगदी माझ्या मनातलं
गिरी अगदी माझ्या मनातलं लिहलंयस.....
तुला आठवत असेल मागे गगोवर अचानक येउन मी एक कॉमेंट केली होती????
आपल्याकडे सर्वत्र जेव्हा सुलभ शौचालये मोफत वापरण्यास मुभा असेल त्यावेळी देशात ५०% प्रगती झालेली असेल...
असाच तुझ्या सरखाच विचार करत करत अचानक हा सारासार विचार आलेला.
इथे मोफत आहे.+काही शौचालयांमध्ये तर पंखे आहेत.
कुठेही घाण करायचं कारणच राहत नाही
रस्त्यांवर प्रत्येक १५-२० मिटर वर डस्टबिन्........प्रत्येक २० मिटरवर ४-५ (१ नव्हे) मोठ्या कचरा पेट्या. सर्व बिंल्डींगच्या प्रत्येक मजल्याला गारबेज रुम.
इथे कचरा उचलायला येणार्या गाड्याही 'मर्सिडीजच्या' असतात रे.
हे आपल्याकडील सरकारला जमणार नाही. कुवत असुन सुध्द्दा.
तळागाळतली लोकं सुधारली सर्वत्र सुखसुविधा नांदली तर या गवर्मेंट्ची दुकानं कशी चालणार???
माझ्या मते मेन म्हणजे 'कायदा' आहे. "सक्त कायदा" बास्स.
बाकी उद्या बोलु......
परदेशवारीचा अनुभव नसल्याने
परदेशवारीचा अनुभव नसल्याने काही बोलु शकत नाहिये पण एकदा कोचीला जाऊन या पुणे एक्दम बेस्ट वाटेल
गिरी, चांगले आहे.. अशा
गिरी,
चांगले आहे.. अशा परदेशवार्यांमूळे "आपल्या" घराकडे देखिल अधून मधून त्रयस्थाच्या नजरेतून पहायची संधी मिळते.
Pages