रेसिपी

Submitted by भूत on 3 December, 2010 - 04:58

........................... कविता ............................

कविता ...अगदी करायचीच असेल तर ...
घे अर्धा डझन यमकं ...ट ला ट ..प ला प
आहे ला आहे ..नाही ला नाही ....लागेल गझले साठी

नाहीच मिळाली तर घे एखादं वृत्त नाहीतर छंद
आणि शब्दांना लाव त्यांचा गळफास

तेही नाही जमलं तर ते घे दोन चार अगम्य शब्द ..अगम्य वाक्य ...अगम्य अर्थाची

तेही नाही सुचलं तर सुचतीलच काही अर्वाच्य शिव्या ...थोडा "भ"... थोडा "झ" ...
अभिजाततेचा आव आणला की " सब चलता है" .
.
.
.

किंव्वा मग

आरश्यासमोर उभं राहुन ..नजरेत नजर मिसळुन बुडी मार खोल आतवर... .

आठवेल ...
जाता जाता...एयरपोर्टवर... पाया पडल्यावर बाबांची मुक शाबासकी
आठवेल ...
आईने दिलेल्या पुरणपोळीची चव ...हॉट्डॉग खातानाही ..
आठवेल ...
पासपोर्ट्च्या आत दडुन बसलेली नाजुकशी राखी
आठवेल ....
जाता जाता ....सखीचे ते गहिरे मौन ..अन खांद्यावर पडलेले २ अश्रु ...ते ही अबोल ...

.
.
मग कदाचित तुझाही गळा दाटुन येईल
कदाचित पापण्या ही ओलावतील ....
अन कदाचित ...एखादा सच्चा अश्रु ...झुगारुन सारी बंधने ...ओघळेल तुझ्या कवितेच्या वहीत ...

.
.
.
ते पान कोरेच सोड मित्रा ...
प्रत्येक वेळी रेसीपी अशी जमुन येईलच असे नाही !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त

Pages