ह्या बातमीत कितपत तथ्य आहे - In South Asia, India worst place to be born in!

Submitted by हर्ट on 6 March, 2012 - 08:04

मी इथे ही बातमी वाचली In South Asia, India worst place to be born in. http://sg.news.yahoo.com/in-se-asia--india-worst-place-to-be-born-in.html

तुम्हाला काय वाटत ते लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुकेच्या नावाखाली भुकेलाच दातांनी चावायचं.

हे एक प्रातिनिधीक मत असू शकेल

http://www.maayboli.com/node/32647

बाकी बातमीत तथ्य किती हे तर जाणकारांनाच माहीत असणार, पण या बातमीचे तसे काही फारसे विशेष नाही वाटले. वाईट वाटण्याचेही थांबले आहे आता. तसेही, नुसते वाईट वाटून मी काय करणार म्हणा. देश वगैरे संकल्पना रुजणे अवघड, लोकसंख्यावाढ थांबणे अवघड

Sad

वाईट वाटण्याचेही थांबले आहे आता.
बरं झालं.
नाहीतरी वाईट वाटून काय उपयोग? तुमच्या हातात थोडीच होते, कुठे जन्म घ्यावा हे?
तर झाला असेल भारतात जन्म, म्हणून वाईट वाटण्याचे कारण नाही.

इतर देशात जन्म झाला म्हणजे चांगलेच होते असे नाही. शेवटी महत्वाचे म्हणजे जन्म झाल्यावर तुम्ही काय केले, स्वतःसाठी, इतरांसाठी?

झक्की | 6 March, 2012 - 19:28 नवीन
वाईट वाटण्याचेही थांबले आहे आता.
बरं झालं.
नाहीतरी वाईट वाटून काय उपयोग? तुमच्या हातात थोडीच होते, कुठे जन्म घ्यावा हे?
तर झाला असेल भारतात जन्म, म्हणून वाईट वाटण्याचे कारण नाही.

इतर देशात जन्म झाला म्हणजे चांगलेच होते असे नाही. शेवटी महत्वाचे म्हणजे जन्म झाल्यावर तुम्ही काय केले, स्वतःसाठी, इतरांसाठी?>>>>>

मी आपल्याला नम्रपणे आधीही सुचवले होते की माझ्यावरचा व्यक्तीसापेक्ष राग व्यक्त करण्यासाठी एक स्वतंत्र धागा काढावात. नक्कीच तो शंभर जण निवडक दहात घेतील

वरच्या बातमीत तथ्य आहे का असे बी विचारतायत

> Forty seven per cent of urban poor children are born underweight as against 46 per cent in rural India.

वजन ठरलेले असेल तर ५०% कमी वजनाचे हवे Happy
सरासरी कोणावरून ठरवली हे पहायला हवे.

नुकतीच बातमी वाचली.. आराध्या बच्चन साठी डॅडी बच्चन यानी १,.५० कोटी रुपयाची ऑडी खरेदी केली आहे.
असे वाटते का कि तिने वर्स्ट कंट्रीत जन्म घेतला आहे?
गरीबीत/हलाखीच्या परिस्थितीत जन्म होणे वाईट मग देश कुठलाही का असेना..
त्यातल्या त्यात, भारतातील राज्यकर्त्यांची सामान्य माणसाविषयीची कळकळ सर्वज्ञात आहे त्यामुळे जर स्टडीत असा निष्कर्ष निघाला असेल तर मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

पूर्ण वाक्य Among South Asian countries India is probably the worst place to be born in, as the chances of survival till the age of five are much weaker than the chances in Nepal, Bangladesh, Sri Lanka and China. Yet again, we are better off than Pakistan, albeit slightly.
असे आहे. त्याचा अर्थ आपण भारतीय म्हणुन जन्मलो हे आपले (स्वतःचे) दुर्दैव असा होत नाही.
तसेच चान्सेस आर वीकर म्हणजे दर हजारातली ९५० मुले पाच वर्षांची होण्याआधी मरतात असा नव्हे.

ही बातमी ज्या अभ्यासावर आधारित आहे त्याचा केंद्रबिंदू बव्हंशीं 'नवजात ' व 'लहान मुलं' हा आहे . मला वाटतं हा भाग बरचसा वस्तुनिष्ठ असावा. पण, << Among South Asian countries India is probably the worst place to be born in >> ऐवजीं << Among South Asian countries India is probably the worst place to live in >>, असं म्हटलं असतं, तर मात्र तें विधान बरंच विवाद्य ठरूं शकतं.

Means to Live in India is not bad, but to be born in dia is worst अस म्हणायच आहे का?