प्रिंटरची शाई कशी वाचवावी?

Submitted by मंदार-जोशी on 13 March, 2012 - 09:30

कार्यालयीन कामात आजकाल संगणकाचा वापर सर्वव्यापी झालेला असला तरी काही गोष्टींची हार्ड कॉपी असणे आवश्यक किंवा अनिवार्य होते. अशा वेळी प्रिंटाआउट काढताना 'अगदीच आवश्यक आहे का' असा पर्यावरणवादी विचार केल्यानंतर दुसरा असा विचार मनात यायला हवा की हा प्रिंटाआउट किती महत्वाचा आहे. कधी कधी एखाद्या प्रोजेक्टच्या संदर्भात तो सुरू असे पर्यंत काही कागद जवळ बाळगावे लागतात. म्हणजेच त्यांचा उपयोग फार काळासाठी नसतो. अशा कमी महत्वाच्या प्रिंटाआउटच्या बाबतीत आपण एक करु शकतो म्हणजे प्रिंट काढताना प्रिंटरची शाई वाचवणे. हे आपण असे करु शकतो.........

१) Print बटणावर क्लिक् केल्यावर Print dialogue box.च्या वर उजवीकडे Properties या बटणावर क्लिक् करावं.

२) मग EconoMode (Save Toner) या checkbox वर क्लिक् करुन मग OK या बटणावर क्लिक् करावं.

चित्रात दाखवल्याप्रमाणे.........

PrinterInk.JPG

असे केल्यास प्रिंटआउटवरच्या अक्षरांचा गडदपणा थोडासा कमी होतो, पण अक्षरे वाचण्यायोग्य निश्चित राहतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Uhoh हे तर माहीत आहे आधीच........
मंदार तुला आता कळाले का?

.
.
.
.
.
सर्वात चांगला उपाय.........
.
.
.
.
स्क्रिन वर बघुन कागदावर लिहुन घेने......... मस्त उपाय आहे बघ.... Lol

Reduce Font Size by 1 point.

If you have Font Size 12 make it 11.

it save not only Ink but Paper also........ and TREE.

अवांतरः
(मी पुर्वी CoinBox Manufacturing (P.C.O. साठी लागणारे उपकरण Coin Operated Pay Phone) ह्या
व्यवसायात होतो. ...... जे नाहिसे झाले ..... मोबाईल क्रांतीने,)
(आता मी प्रिटिंग व्यवसायात आहे Wink

मस्त.
१) शिवाय कलर कार्ट्रिज व ब्लॅक अश्या दोन एच पीच्या घेतल्या तर ११०० - १३०० - १५०० च्या रेंज मध्ये असते. फार महाग वाट्ते मला. ते प्रिंटर मध्ये भरल्यावर नियमित प्रिंट्स घेउन संपवून टाकावे नाहीतर सुकून वाया जातात.
२) दोन साइडेड प्रिंटिंग करता येत असल्यास करावे.
३) जास्त करून काळे भोर प्रिंट घेतल्यास टोनर जास्त वापरला जाऊन लगेच संपतो.
४) तुम्ही कार्ट्रिज रिफील करून वापरता का? असे करू नये असे कंपनी वाले सांगतात पण परवड्तो नथी म्हणून मी एकदा तरी रिफील करून वापरतेच.
५) होलसेल डीलर मार्केट मधून रिफिल घ्यावे स्वस्तात पड्ते निदान २- ३०० रु. ने.
पूर्वीच्या डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स ची आठवण येते कधी कधी.

अरे २५० ला एक करटेज पडते.........वर रीफिल सुध्दा होते.....मग वाचलेत की राव पैसे

अमा, तुम्ही म्हणता तो प्रोब्लेम मला नेहेमी येतो. जास्त वापर नाही म्हणुन मी एचपीचा एक स्वस्त प्रिंटर घेतला, स्वस्तात कलर प्रिंटर मिळाला म्हणुन खुष होतो. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वापर नसेल तर कार्ट्रिजेस सुकून जातात. आणि दर वेळी नविन कार्ट्रिजेस आणणे म्हणजे Sad
त्यामुळे आता ज्यामधे टोनर असेल असा नविन प्रिंटर घ्यायचा विचार आहे. कलर नसला तरी चालेल.
शक्यतो एचपीचाच, कोणता चांगला आहे ? कॅनन आणि एचपी मधे किती फरक आहे ?
तसेच टोनर असेल तर त्याला ड्राय होणे, रिफिलिन्ग हे प्रोब्लेम्स असतात का ?

ऑफिसचे प्रिंटर वापरावे
तुमच्या घरच्या प्रिंटरची शाई वाचेल
Lol

मी आजच ३६० पाने प्रिंट करु शकणारी एचपीची ओरीजिनल कार्टरीज विकत घेतलीय.(एचपी १०५० डेस्कजेट प्रिंटर-स्कॅनर-कॉपीयर).

प्रिंटरबरोबर जी मिळाली होती ती अगदी छोटी होती, लगेच संपली आणि रिफील करुनही २०-२५ पानंच प्रिंट करु शकली. नियमित प्रिंट करणेही आवश्यक आहे नाहीतर इंक सुकते.
मी नेहमीच 'फास्ट ड्राफ्ट' मोडमध्ये प्रिंट घेते. त्यामुळे ही कार्टरीज ३६० पेक्षा जास्त पाने देईल अशी अपेक्षा आहे. बघूया.
ओरीजिनल कार्टरीजमध्ये ऑईल बेस्ड इंक असते त्यामुळे ती जास्त चालते आणि रीफील करुन घेतो, ती वॉटर बेस्ड इंक असते त्यामुळे आऊटपुट थोडा कमी होतो. (इति दुकानदार)

कार्ट्रिज रिफिल करणे बद्दलः
आजकाल सर्वच प्रिंटर्समधे एक मेमरी चिप असते, अन ही तुमच्या सध्याच्या कार्ट्रिजचा सिरियल नं पाठ करून ठेवते. रिफिल केल्यास 'इन्व्हॅलिड कार्ट्रिज' म्हणून ओरडते देखिल. कार्ट्रिज विश्रांती घेत असेल अशा वेळी शाई खाली गळते. ही गळती झेलणारा एक छोटू ट्रे असतो. त्यातही भरपूर शाई वाया जाते. किंवा जावी अशी व्यवस्था केलेली असते. प्रत्येक वेळी कार्ट्रिज बदलल्यावर जबरदस्ती टेस्ट पेज छापणे अन स्कॅनर अलाईन करायला लावणे हे देखिल तुमची शाई लवकर संपून तुम्ही नवी कार्ट्रिज लवकर विकत घ्यावी याचेच उपाय आहेत. वरून कार्ट्रीज संपली की ते डबडे स्कॅनही करणार नाही अशी सोय केलेली असते.
इंकजेट प्रिंटरची किंमत खूप कमी, अन कार्ट्रिजची प्रचण्ड असणे हे तुम्हास रेझर फुकट देऊन ब्लेड विकण्याच्या प्रकारातले आहे.

उपायः
कार्ट्रिज पूर्ण रिकामी होण्याआत रिफिल करणे.
१-२ रिकाम्या कार्ट्रिज आलटून पालटून वापरत रहाणे. रिकामी कार्ट्रिज फेकून देऊ नये. चिप फक्त १-२ नं लक्षात ठेवते असे दिसते.
रिफिल करण्याचे काम घरी करता येते. शाईची बाटली १०० रुपयांत मिळते. तेवढ्यात सुमारे २०-२५ रिफिल्स होतात. घरी रिफिल कसे करावे याबद्दल थोडे यूट्यूब वा गूगलून पाहिल्यास समजेल.

माझ्या कॅननची कार्ट्रिज वाळल्यावर त्यात मी त्यात डिस्टिल्ड पाणी घालतो.
ती परत चालू होते. (खरे तर साधे नळाचे पाणीही चालावे.)
अगदीच ब्लॉक झाली असेल तर बशीत १ एमएम इतक्या उंचीचे जरासे कोमट पाणी घेऊन त्यात कार्ट्रिज चे हेड बुडवावे. कडक झालेली शाई निघून जाते आणि कार्ट्रिज चे जेट्स मोकळे होतात. जरा झटकून लावली की परत सुरू. (हे करतांना सर्किटवर पाणी उडणार नाही हे पाहावे.)

तुमची एखादी वाळलेली कार्ट्रिज असेल तर त्यावर उपाय करून पाहा. चालली तर कार्ट्रिज मिलेल अन्यथा लॉस तर नाहीच! Happy

लेझर प्रिंटरची टोनर cartridge रिफील करताना आधी त्यातील उरलेली थोडीफार पावडर काढून टाकतात. ती म्हणे wastage powder असते. तर ही पावडर वेस्ट कशामुळे होते. आणि त्याचे नंतर काय करतात???