नाव-बदल: हिंदु विवाह कायदा

Submitted by भानुप्रिया on 7 March, 2012 - 06:07

Hindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.

लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?

म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?

कायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

आणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे!

धन्नो!

गुलमोहर: 

टण्याचा रिप्लाय आवडला..
समोरचा चक्कर असेल तर गैरसोय होऊ शकते.. पण तो चक्कर असेल तर वेगळ्या प्रकारेही गैरसोय करववू शकतो.
एकंदरीत फारसा काही प्रॉब्लेम येत नाही हा गेल्या ८ वर्षातला अनुभव Happy

>>मी स्त्रीवादी विचारसरणीच्या जवळपास आहे..त्यामुळे माझी भांडाभांडी होईल वेगळा धागा काढला तर..>><<
अहो काढा हो तो धागा. तेवढीच गंमत.. इतरांना.

नाहीतर असं करा लेख पाडा मायबोलीवर.. की नाव बदल्यच्या "नुसत्या" विचारावर तुम्हाला काय झेलावे लागले/लागते.. किती दु:खी झालात/सतावले गेले वगैरे ...ते ज्यास्त बरे. Proud

ह. घ्या.

सिरियसली उत्तर द्यायचे तर , ही चर्चा झाली होती अजुन एका बाफवर. तिथे उत्तर मिळतील अजुन.

बाकी मी नाव अजुन बदलले नाही कुठेच. अजुन तरी फरक इथे (अमेरीकेत) नाही पडला रोजच्या जीवनात.. पुढचे माहीत नाही.

भानुप्रियाजी,

हिंदू विवाह कायद्यात असे कुठे लिहिलेले आहे, की लग्नानंतर स्त्रीने आपले नांव बदलले पाहिजे??

>>आपले पासपोर्ट ऑफिस याबाबतीत पुढारलेले आहे.
नवर्‍याचे आडनाव वेगळे याबाबत कटकट तर सोडाच पण माझा पासपोर्ट रि-इश्यूचा फॉर्म आणि कागदपत्रे दाखल करून घेणार्‍या माणसाला कणभरही आश्चर्य वाटले नव्हते<<<
या माणसाला आश्चर्य वाटले नाही कारण इतर अनेक राज्यांत हिंदू नवरा/बायकोची पासपोर्टवर नोंदलेली नांवे पूर्ण वेगळी असूनही ते कायदेशीररित्या, (व हिंदू धर्ममान्यतेनेही) विवाहित असतात. दोघांचीही नांवे बदलत नाहीत.

स्वखुशीने नांव बदलले असल्यास ग्याझेटात छापून आणावे लागते, त्याची छायाप्रत सोबत ठेवणे नेहेमीच चांगले.

नीधप्....बरोबर आहेत संदर्भ... छान पोस्ट!!!

धनश्री ... बदला किंवा न बदला पण एकच नाव वापरा - एकीकडे एक दुसरीकडे मिक्स असलं काही धेडगुजरी करू नका. तो गुन्हा आहे>>>>

एकदम अनुमोदन....

अनेक वेळा आपण जे नावांच मिक्सींग करतो त्याने पंचाईत होते... एकच नाव लावा..कुठलीही अडचण येत नाही.

अवांतरः
मी तर माझी सही अत्ता पर्यंत ३ वेळा बदलली आहे. एकदा नाव बदलले तेंव्हा. दुसर्‍यांदा स्पेल्लिन्ग बदलले तेंव्हा. आणि तीसर्‍यांदा मी ऑफीस मध्ये अथोराइज्ड सीग्नटोरी आहे, तिकडे एका डॉक्युमेंट वर माझी सही फोर्ज केली होती एका फ्रॉड मध्ये... त्या वेळेस परत बदलली. पहिल्या दोन वेळेस काहीच त्रास झाला नाही. कारण मी पॅन कार्ड पण बदलले आणि पास्पोर्ट सुध्धा. तिसर्‍यांदा फ्रॉड वगैरे मुळे जरा त्रास झाला. पण तरीही ती फार रेअर गोष्ट आहे.

मी एक बघीतले आहे, की तुमच्या कडे सगळी कागद्पत्र चोख असतिल आणि तुम्ही पॅनिक न होता घाई-घाई न करता जर सरकारी कामे केलीत तर तुम्हाला काहीच त्रास होत नाही. एक लक्षात घ्या आपण १०० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात रहातो आहे. जिथे सरकार वर आधीच खुप रेकॉर्ड ठेवायचा ताण आहे. त्या मुळे थोडा विलंब हा क्रमप्राप्त आहे. थोडा धीर धरावा. मला अत्ता पर्यंत कुठल्याच डॉक्युमेंट मिळण्याच्या बाबतित काहीच त्रास कधी झालेला नाही. फक्त अति फॉलोअप टाळावा.

Pages