गर्भसंस्कार

Submitted by आयुष्यमान on 26 February, 2012 - 20:31

गर्भसंस्कार म्हणल की आपल्या समोर अनेक गोष्टी येतात. नेमके काय करायचे या बाबत अनेक होणार्या आई वडिलांच्या मनात संभ्रम असतो.संस्कार म्हणजे सातत्याने केलेला प्रयत्न.संस्काराची व्याख्या करताना " संस्कारोही गुणांतरधानम्"अशी केली जाते. संस्कार म्हणजे वाइट गुणांचे चांगल्या गुणांमधे रुपांतर करणे. होणार्या आई वडिलांना जेव्हा आम्ही विचारतो, की, संस्कार म्हणजे तुम्हाला काय अपेक्शीत आहे? तुमच्या बाळा मध्ये तुम्हाला कोणते गुण असावेत असवाटत? तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम दिसुन येतो. त्यांना अस वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवेकानंद यांच्यासारखे गुण असावेत. पण यासर्वांमधील नेमके कोणते गुण अस सांगता येत नाही. या सर्व गोष्टींमध्येनेमकेपणा आण्यासाठी प्राणायाम, धारणा व ध्यान यावर आधारीत गर्भसंस्का्राच्या ऐका अभिनव पद्धतीचा विकास केला आहे.या पद्धती द्वारे बाळा मध्ये नेमके पणाने जे गुण रुजवणे अपेक्षित आहेत,ते गुण रुजविण्यासाठी मदत केली जाते. समर्पण, संयम,क्षमा, कुशलता,करुणा, नाविन्यता, द्रुडता, आत्मविश्वाश, द्रष्टा, आद्माधारक, निश्चयी इ. अनेक गुणांचा विकास करण्यास गर्भिणीला मदत केली जाते. या गुणांविषयी गर्भिणीच्या मनात चिंतन सुरु झाले की बाळाच्या मनात ते आपोआप रुजविले जाते. संपुर्ण गर्भधारणेच्या काळात होणार्या आई ने आनंदी रहावे या साठी तिच्या मनाचे प्रशिक्षण केले जाते. तिच्या सभोवतालच्या वातावरणाचा व कामाच्या ताणा तिच्या मनावर कही परिणाम होऊ नये या साठी तिच्या मनाचे प्रशिक्षण केले जाते.ऐक शिल्पकार जसा त्याच्या कौशल्याने व सातत्याने केलेल्या कष्टाने ऐका ओभड दोभड दगडाचे रुपांतर सुंदर व भावनाप्रधान शिल्पात करतो, तशाच कौशल्याने व सातत्याने केलेल्या कष्टाने तुम्ही तुमच्या बाळाचे घडण करु शकता.या साठी गरज असते सातत्य व कष्टाची व आपलाया बाळासाठी वेळ काढण्याची. बाळ जन्माला आल्यानंतर सध्याच्या धकाधकीच्या जिवनात व सभोताल व्यवधानांच्या विश्वात संस्कार करणे व टिकवणे बरेचवेळा आपल्या हातात रहात नाही.बाळ गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करणे आपल्या हातात आहे. या साठी आवश्यकता आहे फक्त प्रखर इच्छाशक्तीची व सातत्याने नियमित वेळ काढून प्रयत्न करण्याची.
आयुष्यमान मध्ये होणार्या नियमित कार्यशाळेत यासर्व विषयांचा आभ्यास सर्व गर्भिणींना सातत्याने करता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

या विषयाबद्दल काही सीडीज् आणि पुस्तके बघितली आहेत.
तुम्ही कार्यशाळा म्हणताय. याबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल.

मायबोलीवर स्वागत Happy

गर्भ संस्कार या विष यावर अधिक महिति हवी असल्यस लोनावळा इथे एक मनशक्ति संस्था आहे. तिथे गर्भ संस्कार चे वर्ग पण घेतले जतत. नेट वरुन त्य संथेची अधिक महिति मिळु शकते.

आयुष्यमान …।फ़रच नाजूक आणि महत्वाच्या विषयावर तुम्ही प्रकाश टाकलाय …. फार बरे वाटले …। मला एक दहा महिन्यांची मुलगी आहे …मला डॉ .बालाजि तांबे यांच्या 'गर्भसंस्कार ' या पुस्तिकेचा आणि त्यात दिलेल्या वनौषधींचा फार फायदा झालाय . त्यात दिलेली योगासने आणि आहार या बाबत फार मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे .माझी मुलगी जन्मल्यापासून हसत मुख असून तिला लसीकरना शिवाय कोणत्याही कारणा साठी डॉ . कडे नेण्याची गरज आली नाही । जे कोणी 'गर्भसंस्कार ' करू ईछितात त्यांनी निशंक मानाने त्याचा उपयोग करून घ्यावा ऽआज पैसे खर्च होतील ,ते उद्या कमावता येतील , परंतु त्याचा तुमच्या आपत्याला जीवन भर फायदा होईल हे लक्षात घ्या

बालाजी तांबे यांचे 'गर्भसंस्कार' हे पुस्तक चांगले असल्याचे ऐकले आहे....

आयुर्वेदाचार्य अध्यात्मिक गुरू श्री बालाजी तांबे (हो तेच 'पिचु' फेम डॉ तांबे Happy ) यांचं गर्भ संस्कार या नावाच महाभंपक पुस्तक वाचू नका. त्यापेक्षा 'व्हॉट टू एक्स्पेक्ट वेन यू आर एक्स्पेक्टींग' वगैरे अनुभव आणि शास्त्रावर आधारित पुस्तके वाचा.

आयुर्वेदाचार्य अध्यात्मिक गुरू श्री बालाजी तांबे (हो तेच 'पिचु' फेम डॉ तांबे स्मित ) यांचं गर्भ संस्कार या नावाच महाभंपक पुस्तक वाचू नका. त्यापेक्षा 'व्हॉट टू एक्स्पेक्ट वेन यू आर एक्स्पेक्टींग' वगैरे अनुभव आणि शास्त्रावर आधारित पुस्तके वाचा. >>> +१००००

अरे ते पुस्तक तांब्यांनी स्वानुभवावर आधारीत लिहिले आहे Wink (असं त्या पुस्तकाच्या कव्हरवरच आहे Happy )

आयुर्वेदाचार्य अध्यात्मिक गुरू श्री बालाजी तांबे (हो तेच 'पिचु' फेम डॉ तांबे स्मित ) यांचं गर्भ संस्कार या नावाच महाभंपक पुस्तक वाचू नका. त्यापेक्षा 'व्हॉट टू एक्स्पेक्ट वेन यू आर एक्स्पेक्टींग' वगैरे अनुभव आणि शास्त्रावर आधारित पुस्तके वाचा.+१११११११११११११११११११११११११११११११११

टण्या Lol

गर्भ संस्कार या विष यावर अधिक महिति हवी असल्यस लोनावळा इथे एक मनशक्ति संस्था आहे. तिथे गर्भ संस्कार चे वर्ग पण घेतले जतत. >>>>>>>> या गोष्टीचा फायदा घेतलेली ओळखीची २ जोडपी आहेत. मुले
अतिशय हुशार आहेत. बाकी माहीत नाही,पण २ ही आया हुशार आहेत.त्यामुळे आनुवंशिक भाग की गर्भ संस्कार
हे नियती/ विज्ञानाला माहीत!

बाळ जन्माला आल्यानंतर सध्याच्या धकाधकीच्या जिवनात व सभोताल व्यवधानांच्या विश्वात संस्कार करणे व टिकवणे बरेचवेळा आपल्या हातात रहात नाही.बाळ गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करणे आपल्या हातात आहे. >>>>>>>> का बर असं? असं जर होत असेल तर तो हलगर्जी पण आहे.
सो हलगर्जी पालकांनी वरील क्लासला जावे असं अनुमान काढू का?