दादा म्हनले ..... !

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 March, 2009 - 07:30

दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या...

दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी...

दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी...

दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी ...

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?

विशाल

गुलमोहर: 

खासच ! तंतोतंत ...

परागकण

खरेच सुन्दर कविता आहे.
शेवटची ओळ कवितेचा प्राण आहे.

अभिनंदन विशाल... असाच खुसखुशीत लिहीत रहा. Happy

फार छान, मार्मिक कविता.

आ(लै)भारी हाये!!
एकदम दमदार!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

मानलं...
या प्राण्यात मोठ्या कवीचा ऐवज आहे...

शेवटचा 'ठोसा' काय जबरी आहे....

आता वो.... काय?
बोबला, दुसरं काय!
ह्या दादांना आमी पुढारी नाय "माघारी" म्हन्तो.
बाकी कविता तर झक्कासच आहे.

विशालराव्,आता तुम्ही खरेच "दादा "झालात सगळ्यांचे. अभिनंदन. एप्रिल ते पुढला मार्च महिन्यांमधे पण सर्वोत्कृष्ट कवितेंचा सन्मान मिळणार असे मानून आतापासूनच अभिनंदन.
दादा म्हनले
कविता जोळा
आमी कविता जोळ्ळ्या

दादा म्हनले
हे काय? किळा माकोळा! तोळा
आमी कविता तोळ्ळ्या

दादा म्हनले
परत कविता काढा
आमी कविता काळ्ळ्या

दादा म्हनले
हे काय कामाचं? जाळा
आमी कविता जाळ्ळ्या

दादा म्हनले
बसा;मी चाल्लो बक्षिस घ्यायला
आत्ता वो.....?

अभिनन्दन् झकास आहे कविता
महेश जोशी

खुप छान.

पहील्या ओळी वाचताना शेवट आसा असेल याची कल्पना सुध्दा येत नाही. Happy

मस्त!

Pages