घरामधे मदत हवी आहे.

Submitted by नीधप on 1 March, 2012 - 00:51

या संदर्भातला बाफ होता. त्यात अन्नपूर्णा म्हणून एका संस्थेचाही उल्लेख होता. तो शोधूनही सापडत नाहीये म्हणून हा नवीन बाफ.

मला चार-पाच महिन्यांकरता दिवसभरासाठी कामाला बाई हवी आहे.
बाबांचे डेन्चरचे मेजर काम आहे. आधीचे ब्रिज तुटलेत त्यामुळे आता पूर्ण एक्स्ट्रॅक्शन मग रूट बिल्डींग (स्क्रू घालून) आणि मग पर्मनन्ट डेन्चर्स असा सगळा मामला आहे. ट्रीटमेंट २-४ महिन्यांची आहे. त्या दरम्यान सुरूवातीला काही दिवस पूर्ण लिक्विड डाएट आणि मग हळूहळू चावायला न लागणारे असे डाएट (लापशी ते कुस्करलेली/ मिक्सरमधून काढून आमटीत भिजवलेली पोळी) असायला लागणारे.
परत मे अखेरीपर्यंत माझी ८८ वर्षांची आजी पण घरी असेल आमच्याकडे.
सध्या घरगुती डबा आणतात जेवणाचा. तो उत्तम आहे. पण या ट्रिटमेंटच्या काळात त्याचा उपयोग नाही.

काम करणार्‍या बाईने भाज्या-बिज्या, वस्तू आणणे, ठरवून दिलेल्या डाएटच्या गोष्टी काटेकोरपणे आणि वेळच्या वेळी पाळणे गरजेचे आहे. आणि अर्थातच स्वच्छता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६-७ एवढा वेळ असली तरी चालेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप्,तुझे वडील जर पुण्याला असतील तर नर्सिंग ब्युरो मधुन तुला अशी बाई मिळु शकेल्.फक्त ब्युरो वाल्यांशी तिच्या कामाच्या स्वरुपाबद्दल आधीच सांगावे..माझ्या मैत्रीणीच्या साबां करीता अशा बाई १० महिने ठेवल्या होत्या.[शुस्रुषा ब्युरो ].ब्युरो तुन ठरवल्याने कामाची टाळाटाळ्,चोरी व इतर भिती नसते.

थँक्स रावी.

तुमचा किंवा अजून कुणाचाही या संस्थेसंदर्भाने काही अनुभव असल्यास तोही सांगा.
तसेच अजून कुणी मदत करू शकणार असेल तर ते ही सांगा.

ब्युरो मधे चौकशी करतो आहोतच. पण ब्युरो मधे प्रशिक्षित नर्सेस असणार ना. त्या स्वैपाकाच्या वस्तू आणणे आणि ठरवून दिल्याप्रमाणे स्पेसिफिक आहार तयार करणे हे करतील का?

.

नर्सिंग ब्युरो ऐवजी मावशी Happy ब्युरो मध्ये चौकशी करा. तिथल्या बायका तुम्हाला हवी ती कामे करतात. सहसा त्यांची शिफ्ट ८ ते ८ असते. मुंबईतले दर प्र.दि.२५० पासून पुढे असे आहेत. पुण्यातले माहित नाहीत पण यावरून अंदाज यावा.

जरूर लिही. मी सर्वच अश्या प्रॉब्लेम्ससाठी धागा काढलाय. शक्यतो पुणे परिसरातल्या. म्हणून पुण्याच्या ग्रुपात.

नीधप ,सदाशीव पेठेतल्या या ब्युरो मधे मावशी कम नर्स [जुजबी कामं-ठरावीक इन्जेक्शन देणे,ड्रेसिन्ग्ज करणे,पेशंट ची रिलेटेड ] असतात.घरगुती कामं ही करतात फक्त बोलणी करताना तसे सांगुन ठेवावे लागते ..त्यांच्याबद्दल तुम्हाला काही कम्प्लेंट असतील तर त्या ब्युरो वाल्याना आपण सांगु शकतो ते लगेच योग्य तो निर्णय घेतात्.अतिशय विश्वासार्ह सेवा आहे.

जस्ट डायलला चौकशी केल्यास अशा ब्युरोचे अथवा एजन्सीजचे नंबर व काँटॅक्ट डीटेल्स मिळतील. त्यानंतर आपली गरज असेल त्याप्रमाणे मेड मिळू शकेल.

माझ्या आत्याच्या जावेचे ऑपरेशन पुण्यात झाले होते. तेव्हा नेमकी पुण्यातील सून कामासाठी परदेशी गेली. त्यामुळे त्यानी अशीच पूर्ण दिवसभर बाई ठेवली होती. सकाळी नऊ साडेनऊला येऊन संध्याकाळी सात वाजता रात्रीचा स्वैपाक करून घरी जायची. दिवसाभरात ब्रेकफास्ट, जेवण आणि चहा कॉफी करणे अशी सर्व किचनकामे करायची. त्याशिवाय घर आवरणे वगैरे कामेदेखील.

काल शूम्पी/वरदाने एका बाफावर ही लिंक दिलेली : http://www.mayacare.com/Inner/Services.html
त्यांच्या 'डिरेक्टरी सर्विसेस' मध्ये : Recommending indoor nursing assistance/domestic help,
Food services हे दोन ऑप्शन्सही आहेत. तिथे चौकशी करून बघायला हरकत नाही. चौकशी केल्यास तुमचा फीडबॅकही अवश्य इथे लिहा प्लीजच!! Happy

नंदिनी, जस्ट डायल बद्दल +१.

असा वेगळा ब्युरो असतो? >> खरे तर असेच ब्युरो जास्त असतात - मुंबईत तरी. नर्सचा दर प्र.दि. ७५० च्या आसपास असतो. शिवाय मी 'नर्स' आहे हा तोरा पण असतोच म्हणजे मग त्या बाकीची काहीच कामे करत नाहीत. म्हणून सलाईन / इंजक्षन / दुसर्‍या छोट्याछोट्या procedures अशा खरोखर वैद्यकीय गरजा असल्याशिवाय नर्स ठेवणे म्हणजे परवडणारे नसते.

मावशी ब्युरोतल्या बायका बरीच कामे करतात. फक्त पहिल्या दिवसापासूनच त्यांना पडणार्‍या कामाची कल्पना द्यावी. नंतर जर एखादे काम सांगितले तर ते माझे काम नाही असे सरळ सांगतात त्या. ब्युरोचा फायदा म्हणजे नेहमीच्या बाईने दांडी मारली तर ते replacement पाठवतात.

माधव पण ह्या ब्युरोंना नक्की काय म्हणतात? मावशी ब्युरोच म्हणतात का?(हा फार मठ्ठ प्रश्ण आहे पण तरी..) अशा काही ब्युरोजचे फोन नंबर शेअर करू शकाल का?

माझ्याकडे पुण्यातल्या एकाही ब्युरोचा नंबर नाहीये. aaya bereau असे शोधा म्हणजे गुगलदेव मदत करतील. त्यात पुण्याचे काही ब्युरो पण दिसत आहेत.

ठाणे/मुंबईतले मी अनुभव घेतलेल्या ब्युरोंचे नंबर हवे असतील तर देऊ शकेन.

ठाण्यात मला एका नर्सने दिवसाचे रु.५००/- सांगितले होते. मावश्यांचे रु.३००/- असतात. त्यात ब्युरोवाल्यांचं रु.२५/- कमिशन.

www.maidservices.in ही साईट मागच्या वर्षी रैना किंवा माधव यांनी मला मझ्या मैत्रिणीसाठी सुचवली होती. माझ्या मैत्रिणीने तिथुन घेतलेली मेड चांगली, स्वच्छ, प्रेमळ आहे.

तिथे जाउन बघ- कदाचित तुला हवी तशी व्यक्ति मिळुन जाईल.

ठाणे/मुंबईतले मी अनुभव घेतलेल्या ब्युरोंचे नंबर हवे असतील तर देऊ शकेन.>>> मुंबईतले माहीत असल्यास द्याल का? मलाही काही महिन्याने जेवण, घरकामासाठी बाई ठेवावी लागणार आहे. या वरच्या साईट व्यतिरीक्त माहिती असल्यास द्यावी.

सकाळच्या जाहीरातीचाही फायदा होतो. चांगला प्रतिसाद मिळतो त्याला. अर्थात आपल्याला बॅकग्राउंड चेक करावे लागते पण आम्हाला उत्तम मावशी मिळाल्या त्यातून.

सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल थँक्स.
मी माहेरीच येऊन राह्यले आहे यासाठी आणि एकुणात चित्र बघता मदतीसाठी कोणी लागेल असं वाटत नाहीये. एखाद-दुसर्‍या दिवशी मला पुण्याबाहेर जावं लागलं कामासाठी तर तेवढ्या दिवसापुरता जेवणाचा डबा आणून देण्याची व्यवस्था करण्यापलिकडे मदत लागत नाहीये.
रोजचेच जेवण अगदी बारीक आणि मऊ करून दिले की त्यांना खाता येतेय त्यामुळे ज्या दिवशी प्रत्यक्ष दात काढले जातात तो दिवस वगळता फारसे काही करावेच लागत नाहीये.

कोणी पुण्यातील reliable मावशी ब्युरोचा नं देऊ शकेल का? सध्या वडील आजारी असल्यामुळे आईच्या मदती करता खुपच गरज भासते आहे. सर्व घरगुती कामे करता येतील अशी मदत हवी आहे.

बरं झालं हा धागा वर आला ते. सध्या खूप गरज आहे.
मला माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी बाई हवी आहे. कुणास माहीत असल्यास सांगावे.
मी खारघर, नवी मुंबई येथे राहते.

कुणाला इथे पुण्यातिल कुठल्या संस्थेचा चांगला अनुभव असेल तर प्लीज सांगा ना.
वरचे अन्नपुर्णा चे दोन्हिहि नंबर चुकिचे आहेत. ट्राय करुन पाहिले. शुश्रुशा नाहि सापडले ऑनलाईन.
आईसाठि मदतिला एक बाई हविये. कपडे चेंज करण्यात मदत करेल, जेवण बनवेल, आणि घर थोडे आवरुन देईल अशि.

Pages