घरामधे मदत हवी आहे.

Submitted by नीधप on 1 March, 2012 - 00:51

या संदर्भातला बाफ होता. त्यात अन्नपूर्णा म्हणून एका संस्थेचाही उल्लेख होता. तो शोधूनही सापडत नाहीये म्हणून हा नवीन बाफ.

मला चार-पाच महिन्यांकरता दिवसभरासाठी कामाला बाई हवी आहे.
बाबांचे डेन्चरचे मेजर काम आहे. आधीचे ब्रिज तुटलेत त्यामुळे आता पूर्ण एक्स्ट्रॅक्शन मग रूट बिल्डींग (स्क्रू घालून) आणि मग पर्मनन्ट डेन्चर्स असा सगळा मामला आहे. ट्रीटमेंट २-४ महिन्यांची आहे. त्या दरम्यान सुरूवातीला काही दिवस पूर्ण लिक्विड डाएट आणि मग हळूहळू चावायला न लागणारे असे डाएट (लापशी ते कुस्करलेली/ मिक्सरमधून काढून आमटीत भिजवलेली पोळी) असायला लागणारे.
परत मे अखेरीपर्यंत माझी ८८ वर्षांची आजी पण घरी असेल आमच्याकडे.
सध्या घरगुती डबा आणतात जेवणाचा. तो उत्तम आहे. पण या ट्रिटमेंटच्या काळात त्याचा उपयोग नाही.

काम करणार्‍या बाईने भाज्या-बिज्या, वस्तू आणणे, ठरवून दिलेल्या डाएटच्या गोष्टी काटेकोरपणे आणि वेळच्या वेळी पाळणे गरजेचे आहे. आणि अर्थातच स्वच्छता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६-७ एवढा वेळ असली तरी चालेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगल सेवा : ०२० २४४७२८६८
टिळक रोडला 'वृंदाज' च्या जवळ एक बाई हे चालवतात.२ वर्षापूर्वी तिथून आमच्याकडे एक बाई यायची. जरा महाग आहे.

साक्षी.

थोडे अर्जंट आहे..... आमच्या एका नातेवाइकांकडे कर्वेनगर/वारजे जकात नाका परिसरात घरकामासाठी स्वयपाकासाठी - बाई पाहिजे. कुणाला माहीत्ती असल्यास इमेलवर कळवावे....

Pages